logo

केळी | Banana

 

 • (बोट्रोडिप्लोडीया, ग्लोईओस्पोरियम आणि फ्युजॅरियम बुरशी)

  लक्षणे

  केळीच्या नविन येणा-या मधल्या पानाचा एखादा भाग नसतो, किंवा एखादा भाग हा कुजलेला असतो.

  जास्त प्रमाणात रोगाची लागण झालेली असल्यास शेंडा पिवळा पडतो आणि त्यानंतर तपकिरी होवुन पुर्णतः जळुन जातो.

  नियंत्रण

  केळी फळींवरती कॅपटन २ ग्रॅम, किंवा एम ४५ २.५ ग्रॅम किंवा झेड-७८ १.५ ग्रॅम प्रती लि. पाण्यातुन फवारणी करावी.

 

 

 •    बॅक्टेरियल विल्ट किंवा मोको रोग   

  केली पिकावरिल मोको हा रोग जीवाणू मुळे होतो. (Ralstonia (Pseudomonas) solanacearum) हा रोग केळी पिकाच्या कोणत्याही अवस्थेत पानांवर, खोडावर, मुळांवर तसेच फळांवर येवु शकतो.

  रोगाचा जीवाणु हा पिकाच्या रस व अन्न वाहीन्यांमधे वाढतो, ज्यामुळे पिकांस अन्नाचा व पाण्याचा पुरवठा बंद होवुन पिक कमजोर बनते, व पाने सुकतात, फळांवर तशाच प्रकारचे नुकसान दिसुन येते. केळी च्या खोडामधे काळसर लाल रंगाची रिंग दिसुन येते, तसेच फळांत काळसर लाल रंगाचे टिपके फळ चिरले असता त्यात दिसुन येतात.

  या रोगाच्या नियंत्रणासाठी जीवाणू नाशकांचा वापर करावा.

  बॅक्टेरियल विल्ट किंवा मोको रोग
  बॅक्टेरियल विल्ट किंवा मोको रोग
 • विषाणूजन्य (व्हायरस) रोगांच्या नियंत्रणासाठी प्रभावी रासायनिक उपाय नसल्याने त्यांचा प्रसार रोखणे तसेच त्यापासून होणाऱ्या नुकसानाची पातळी नियंत्रणात राहील याबाबत योग्य उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

  विषाणूजन्य (व्हायरस) रोगांचा प्राथमिक प्रसार प्रामुख्याने कंदांमार्फत होत असल्याने लागवडीसाठी निरोगी बागेतील कंद निवडावेत.

  उतिसंवर्धित रोपांपासून लागवड करताना नोंदणीकृत उतिसंवर्धित प्रयोगशाळेकडून विषाणू निर्देशांक तपासलेली, निरोगी व जोमदार रोपे खरेदी करावीत.

  रोपेनिर्मितीसाठी स्वतंत्र मातृबाग असणे आवश्‍यक आहे. मातृबागेची देखील आनुवंशिक शुद्धता आणि विषाणू निर्देशांक नियमितपणे तपासणे आवश्‍यक आहे.

  रोगांची लक्षणे दिसताच रोगट झाडे कंद व मुळांसकट उपटून नष्ट करावीत.

  रोगवाहक किडींच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्‍झाम 7 ग्रॅ. किंवा क्लोरापायरीफाॅस 20-30 मि.लि. किंवा इमिडॅक्‍लोप्रिड (17.5%) 7 मि.लि. किंवा डायमिथोएट 30 मि.लि किंवा अॅसिटामाप्रिड 7-10 ग्रॅ. प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या कीटकनाशकांची आलटून- पालटून 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

  केळीबाग आणि बागेचे बांध नेहमी स्वच्छ ठेवावेत.

  केळी पिकात वेलवर्गीय पिके आंतरपीक म्हणून किंवा केळी बागेच्या परिसरात घेऊ नयेत.