logo

कोळी किटक (Mites)

अष्टपदी अशा कोळी किटकांच्या 6000 प्रजाती आहेत ज्या विविध पिकांवर हल्ला करतात. या पैकी बहुतांश जाती ह्या ईरियोफायोडिया आणि टेट्रानिकोडिया या परिवारातुन असतात. (Eriophyoidea (e.g. gall mites, erinose mites, bud mites, rust mites) and Tetranychoidea (e.g. spider mites, false spider mites) पिकाच्या तळाकडील पानांवर हि किड पानांच्या खालिल बाजुस वाढते. तसेच फळांवर, कळ्यांवर, फांदीवरिल डोळ्यांवर वाढणारी कोळी किड देखिल आढळुन येते.

ईरियोफायोडिया या परिवारातील २५ जाती ह्या विविध पिकांवर हल्ले करतात. यातील काही जाती पिकाच्या पानांवर फोड आल्यासारखी लक्षणे दाखवतात. तर काही जातींमुळे पानांवर तांबेरा सारखी लक्षणे दिसतात. या परिवारीतील कोळी किटकांस केवळ चार पाय असतात, नुसत्या डोळ्यांनी हि किड अजिबात दिसत नाही. किडीचा आकार हा अळीसारखा निमुळता असा असतो, पाय डोक्याच्या जवळ असतात.

टेट्रानिकोडिया या परिवारातील जवळपास १२०० जाती ह्या विविध पिकांवर हल्ला करतात. या किडीस ८ पाय असतात.

दोन्ही परिवारातील किडी जवळपास एक सारखाच जीवनक्रम अनुसरतात, त्यात कमी अधिक प्रमाणात दिवसांचा फरक असतो.

किडीच्या वाढीसाठी उबदार कोरडे हवामान गरजेचे असते. ज्या ठिकाणी मनुष्य नियंत्रित वातारणात शेती होती अशा ग्रीन हाऊस पॉली हाऊस मधे आद्रता कृत्रिमरित्या वाढवुन देखिल किडीचे नियंत्रण करणे सोपे होते.

लैंगिक संपर्कातुन होणारी पिल्ले हि मादीच असतात, तर अलैंगिक पध्दतीतुन होणारी पिल्ले हि नर असतात. मादी किड तिच्या कडे असलेल्या विषेश अधिकाराअंतर्गत लैंगिक संपर्कातुन होणारी पिल्ले हि मादीच असतिल याची योजना करुन ठेवते. हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा. उबदार वातावरणात अंडी ते प्रौढ हि अवस्था ५ दिवसातं देखिल गाठली जाते. एक मादी दिवसाला जवळपास २० अंडी देते, आणि २-४ आठवडे देत राहते. कमी जीवन दिवस आणि पुर्नुत्पादनाची विशेष क्षमता यामुळे सतत जर एकच कोळीनाशक वापरले तर या किडीत फार कमी काळातच त्या कोळीनाशका विरुध्द प्रतिकारक शकती निर्माण होते.

या किडे डोळे कंपाऊड नसुन साधे असतात, जास्त प्रकाशात ते बघु शकत नाहीत, आणि ईतर वेळेस देखिल त्यांना वस्तु किंवा आकार दिसत नाहीत तर केवळ प्रकाशाचे ठिपके दिसतात.

यात टु स्पॉटेड स्पायडर माईट, व्हाईट माईट, रेड माईट असे प्रकार पडतात.

1. टु स्पॉटेड स्पायडर माईट Tetranychus urticae

या कोळी किटकाची अंडी हि जवळपास पुर्णतः पारदर्शक आणि पांढ-या पिवळसर रंगाची असतात. मादी किड दिवसाला ६ अंडी देते आणि जीवनक्रमात ७० पर्यंत अंडी देते. अंडी गोलाकार असतात. ७ ते १० दिवसांनी लैंगिक प्रजनानातुन केवळ मादी किडीचा जन्म होतो, तर अलैंगिक प्रजनानातुन नर कीडीचा जन्म होतो. अंड्यातुन पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांस सहा पाय असतात, मात्र त्यानंतर अवस्थांतुन गेल्यानंतर त्यास एकुण आठ पाय येतात. पिल्ले हि फिक्कट पिवळसर रंगाची असतात, आकाराने अंडाकृती असतात.

या किडीच्या पाठीवर मध्याच्या दोन्ही बाजुला गर्द रंगाचे दोन ठिपके दिसतात. मादी किड हि सुप्तावस्थेत जाते, सुप्तावस्था ही नारंगी लाल रंगाची असते, सुप्तावस्थेत पिकांस काहीही नुकसान करत नाही.

किडीची लहान आणि प्रौढ अशा दोन्ही अवस्था पिकातुन रसशोषुन घेतात.

2. टोमॅटो रसेट माईट - Aculops lycopersici

टोमॅटो पिकावरिल हि कोळी किड, पानांतुन, फळांतुन, खोडातुन रस शोषुन घेते, 14x शक्तीच्या भिंगाव्दारे हि किड दिसु शकते, अत्यंत लहान अशी हि किड अंडाकृती, पिवळसर, पारदर्शी रंगाची असते. पिकाच्या तळाकडिल भागापासुन सहसा हल्ला करते. ज्यावेळेस किडीने नुकसान केलेली पाने, फळे दिसु लागतात तेव्हाच किडीचा जाणीव होते.

3. अंजीरावरिल कोळीकिड Aceria ficus (Fig Bud Mite)

अंजीर पिकावरिल ह्या कोळी किडी मुळे अंजीर पिकावरिल फिग मोझॅक व्हायरस हा रोग पसरतो. हि कीड पिवळ्या रंगाची अती सुक्ष्म अशी किड आहे. किड कळ्यांवर, डोळ्यांवर, तसेच पानांवर हल्ला करते. ज्यामुळे पानाचा आकार लहान राहणे, फांदीची वाढ न होणे या सारख्या समस्या दिसुन येतात.

मादी किड पानांच्या खालील बाजुस, पानांवरिल केसांच्या पायाशी देते. अंडी ते प्रौढ अवस्था ७ दिवसांत पुर्ण होते.

4. सिट्रस रस्ट माईट (Phyllocoptruta oleivora)

संत्री पिकावरिल हि कोळी किट, पिकाच्या पानांतुन, फळांतुन रस शोशुन घेते, उघड्या डोळांनी देखिल हि किड दिसत नाही. 14X, 20X भिंगाचा वापर करुन हि किड दिसु शकते.

Mites Typical Life Cycle
Citrus Rust Mite
Citur RustMite Egg and Larva
Citurs Red Mite Egg and Nymph
Citurs Red Mite
Damage due to Tomato Mites
Damage due to Tomato Mites
Mosaic
Bud Mite (अंजीर वरिल कोळी किड)
Citrus Rust Mite
Pomogrante Leaf Roll Mite
Pomogrante Leaf Roll Mite
Tomato Russet Mite
Two spotted Spider Mite
Two spotted SPider Mite with eggs

Control | नियंत्रणाचे उपाय

रस शोषक किडिंच्या नियंत्रणात खालि बाबी महत्वाच्या ठरतात.

पिकात पिवळ्या, निळ्या स्टिकी पॅड चा तसेच ईनसेक्ट नेट चा वापर करावा. ह्या नंतर देखिल किड नियंत्रणात येत नसेल तर रसायनिक किटकनाशकांचा अवलंब करावा.

रसशोषक किडिंचे नियंत्रण करत असतांना ग्रुप ४ मधिल किटकनाशकांचा एका हंगानात जास्तीत जास्त २ वेळेस वापर करावा.

कोणत्याही ग्रुप मधिल किटकनाशकाचा एका हंगामात ३ पेक्षा जास्त वेळेस वापर करु नये, तसे केल्यास किडीमधे प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका कैक पट वाढतो आणि किड नियंत्रणाबाहेर निघुन जाते.

किटकनाशक निवडतांना ते एक पेक्षा जास्त प्रकारच्या रसशोषक किडिंच्या नियंत्रणात उपयोगी ठरेल ह्या नुसार निवडण्याचा प्रयत्न करावा.

किड पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार हल्ला न करता, तापमान आणि आर्द्रता किडिस अनुकुल असल्यास हल्ला करते हे लक्षात ठेवुन फवारणीचे नियोजन करावे.

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी

ऑरगॅनोफॉस्फेट IRAC Group 1

असिफेट X
ईथिऑन X X
क्लोरपायरीफॉस X X
क्विनालफॉस X
डायमेथोएट
प्रोफेनोफॉस
फॅसोलोन X
फोरेट
मोनोक्रोटोफॉस X

कार्बामेट IRAC Group 1

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
कार्बारिल X
कार्बोफ्युरॉन X
कार्बोसल्फान X X

माईट ग्रोथ ईनहिबिटर IRAC Group 10

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
हेक्झाथयोझॉक्स X X X X

IRAC Group 12

डायफेन्थ्युरॉन
प्रोपायरीगेट X X X X

IRAC Group 13

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
क्लोरफॅनपर X X X X

IRAC Group 15

फ्लुफेनॉक्झ्युरॉन X X X X

IRAC Group 16

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
ब्युप्रोफेनझीन X

IRAC Group 2

फिप्रोनिल X

IRAC Group 20

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
फेनपायरॉक्झिमेट X X X X
फेन्झाक्विन X X X X

IRAC Group 23

स्पायरोमॅसिफेन X X X X

पायरॅथ्रॉईडस IRAC Group 3

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
डेल्टामेथ्रीन X X X X
फेनप्रोप्रॅथ्रीन X X X
परमेथ्रीन X X X
फेनवलरेट X X
बीटा सायफ्लुथ्रीन X X X
बायफेनथ्रीन X X X
लॅम्डासाह्यलोथ्रीन X
सायपरमेथ्रीन X X

नीओनिकोनॉटाईडस IRAC Group 4

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
असिटामॅप्रीड X
ईमिडाक्लोप्रीड X
क्लोथीआनीडीन X
थायमेथॉक्झाम X
थायोक्लोप्रीड X X

स्पिनोसिन्स IRAC Group 5

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
स्पिनोसॅड X X X X

अव्हरमेक्टिन्स IRAC Group 6

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
ईमामोक्टिन बेन्झोएट X X X
मिलबेमेक्टिन X X X X

IRAC Group 7

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
पायरीप्रॉक्झिफेन X X X X

IRAC Group 9

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
फ्लोनीसामिड X

IRAC Group UN

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
अझाडिरिक्टिन
बायफेनझेट X X X X
डायकोफॉल X X X X
फ्लुमाईट X X X X
फ्लुव्हॅलिनेट X X X
व्हर्टिसिलियम लिकानी X X X X