logo

केळी | केळीला सेंद्रिय खते किती द्यावीत?

  • ◉ केळी खोडास किमान दहा किलो शेणखत वापरणे अत्यंत गरजेचे आहे. शेणखत कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास इतर सेंद्रिय स्रोतांचाही वापर करणे आवश्‍यक आहे.
  • ◉ गांडूळ खतात सर्वसाधारणपणे 0.75 ते 2.0 टक्के नत्र, 0.50 ते 0.82 टक्का स्फुरद आणि 0.65 ते 1.25 टक्का पालाश असते. केळीसाठी प्रत्येक खोडास किमान पाच किलो गांडूळ खत देणे आवश्‍यक आहे.
  • ◉ गांडूळ खत विकत घेऊन टाकण्यापेक्षा स्वतःच्याच शेतात तयार करून वापरल्यास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. केळीसाठी प्रत्येक खोडास एक किलो निंबोळी पेंड देणे फायद्याचे दिसून आले आहे. तसेच सूत्रकृमींचा प्रादुर्भाव असल्यास निंबोळी पेंडीमुळे त्यांचाही प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. केळीची पिल-पत्ती व घड काढल्यानंतर केळीचे खांब शेताच्या कडेलाच खड्डा घेऊन त्यात कुजविल्यास उत्तम प्रकारचे केळीचे कंपोस्ट खत तयार होते.
  • ◉ त्यात सर्वसाधारणपणे 0.70 ते 1.90 टक्का नत्र, 0.50 ते 0.70 टक्का स्फुरद आणि 1.00 ते 1.50 टक्का पालाश असते.

जिवाणू खतांचा वापर

जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी व केळी पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी "ऍझोस्पिरीलम' या नत्र स्थिर करणाऱ्या व "पी.एस.बी.' या स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खतांचा प्रत्येकी 25 ग्रॅम प्रतिझाड (एकूण 50 ग्रॅम प्रतिझाड) केळी लागवडीच्या वेळेसच सेंद्रिय खतासोबत वापरावे. जिवाणू खतांच्या वापरामुळे वातावरणातील नत्र स्थिर करून तो पिकाला उपलब्ध करून दिला जातो, तर जमिनीतील स्थिर झालेला स्फुरद पिकाला उपलब्ध करून दिला जातो.