logo

सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया

भारतात नत्र, स्फुरद, पालाश, नंतर आज जर सर्वाधिक प्रमाणात जर कोणते अन्नद्रव्य वापरले जात असेल तर ते सल्फर आहे. भाजीपाला, फळ उत्पादक शेतकरी ह्या अन्नद्रव्याचा वापर करतांना सहज आढळुन येतात. पिकास उपलब्ध स्वरुपात नसले तरी इलिमेटंल सल्फर आज भरपुर प्रमाणात वापरले जाते. इलिमेंटल सल्फर “S” म्हणजे केवळ एस “S” ह्या स्वरुपात असलेला सल्फर हा पिकास अजिबात उपलब्ध होत नाही. इलिमेंटल सल्फर “S” चे रुपांतर हे सल्फेट म्हणजेच SO4 स्वरुपात झाल्यानंतरच पिक त्याचे ग्रहण करु शकते. इलिमेंटल सल्फर च्या एका घटकास ऑक्सिजनचे चार घटक लागुन नविन असे सल्फेट स्वरुप तयार होते, ह्या रासायनिक अभिक्रियेस ऑक्सिडेशन म्हणतात.

थायोबॅसिलस हे जीवाणू सल्फर, हायड्रोजन सल्फाईड, थायोसल्फेट यांचे देखिल ऑक्सिडेशन करुन त्यापासुन सल्फेट तयार करण्याची क्षमता ठेवतात. ह्या शिवाय हे जीवाणू फेरस तसेच झिंक ची देखिल उपलब्धता वाढवतात.

थायोबॅसिलस थायोऑक्सिडन्स हे जीवाणू ग्रॅम निगेटिव्ह, चपळ (motile) असतात. हे जीवाणू २८ ते ३० डिग्री सेल्सियस तापमानात वाढतात. त्यापेक्षा कमी किंवा जास्त तापमानात वाढीचा आणि स्लफर ऑक्सिडेशनचा वेग कमी होतो, तापमान ५५ ते ६० डि.से. झाल्यास मात्र जीवाणूंचा मृत्यु होतो. हे जीवाणू हवेच्या अनुपस्थितीत देखील वाढु शकतात, तसेच हवेच्या उपस्थितीत देखिल वाढु शकतात.