logo

भाजीपाला पिकावरिल विविध व्हायरस

कंकुबर मोझॅक व्हायरस (CMV)

जगभरात मिरची पिकवारिल हा एक प्रमुख व्हायरस आहे. मावा किडिमुळे नॉन परिस्टंट पध्दतीने हा व्हायरस पसरवला जातो. विविध पिके आणि गवत मिळुन ७७५ प्रजातींवर हा व्हायरस दिसुन येतो. मिरची पिकांस वाढीच्या सुरवातीच्या काळात मावा किडिच्या हल्ल्यापासुन वाचवणे हाच एक व्हायरस प्रतिबंधासाठी उपाय आहे. पिकाच्या लागवड क्षेत्राजवळ तण माजु देवु नये. तसेच जेथे जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसुन येतो अशा ठिकाणी स्विट कॉर्न ची लागवड बांधावर करता येईल ज्यामुळे मावा किड मिरची पिकावर लवकर हल्ला करणार नाही.

पोटॅटो व्हायरस वाय (PVY)

मावा किडी मुळे या रोगाचा प्रसार होतो. पानांच्या शिरांमधिल भाग हा पिवळसर पडत जातो.

टोबॅको इच व्हायरस (TEV)

वरिल व्हायरस ला जोडुनच या व्हायरस ची लागण आणि प्रसार होतो. पोटॅटो व्हायरस वाय आणि टोबॅको इच व्हायरस या दोघांचा प्रसार हा मावा किडिमुळे होतो.

पेपर मोटल व्हायरस (PMV)

पानांच्या शिरांमधिल भाग पिवळा होतो, पान फिक्कट हिरव्या रंगाचे होते. फळांवर देखिल लक्षणे दिसुन येतात.

टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस (TSWV)

थ्रिप्स (फुलकिडे) यांच्या व्दारा रोगाचा प्रसार होतो. निफ्म अवस्थेतच किडीव्दारा व्हायरस ग्रहण केला जातो, ज्या निफ्म ने व्हायरस ग्रहण केला आहे तोच केवळ प्रौढ अवस्थेत व्हायरस चा प्रसार करु शकतो ते देखिल ४ ते १० दिवसांच्या काळानंतरच, हा काळ व्हायरस चा इनक्युबेशन किंवा लॅटंट काळ असतो ज्याकाळात तो किडिच्या शरिरात राहतो. टोमॅटो व इतर पिकांवर देखिल हा व्हायरस दिसुन येतो. टोमॅटो पिकात खोडावर देखिल लक्षणे दिसुन येतात जी लेट ब्लाईट सारखी दिसतात. रोप काही दिवसांत मरुन जाते.

अल्फा मोझॅक व्हायरस (कॅलिको व्हायरस) (AMV)

मावा किडी मुळे या व्हायरस चा प्रसार होतो.

टोबॅको मोझॅक व्हायरस (TMV)

टोमॅटो पिकावर प्रामुख्याने दिसुन येणारा हा व्हायरस संरक्षित, अर्ध संरक्षित आणि खुल्या अशा तिनही शेतातील सहसा आढळुन येणा-या कोणत्याही किडिमुळे संक्रमित होत नाही. टोमॅटो पिकात हा रोग बियांमधुन म्हणजेच लागवडीसाठीच्या रोपांतुन येवु शकतो. माणसा व्दारे केल्या जाणा-या शेतातील विविध गतीविधींव्दारे हा रोग पसरतो. या रोगात काही वेळेस पहिल्या बहारातील पुर्ण विकसित फळांच्या सालीवर तपकिरी रंग येतो, साल सहज काढली जावु शकते.

पोटॅटो लिफ रोल व्हायरस (PLRV)

पिकाच्या पानांच्या कडा वाकतात, हा व्हायरस बटाटा पिकावर प्रामुख्याने दिसुन येत असला तरी काहीवेळेस मावा किडीमुळे प्रसार होत असल्याने टोमॅटो वर देखिल दिसुन येतो. मावा किड हा रोग परसिसटंट पध्दतीने प्रसार करते. त्यामुळे मावा किडीचे नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.

स्क्वॅश मोझॅक व्हायरस (SqMV)

खरबुज पिकात बियांव्दारा हा रोग पसरतो, तर त्यानंतर ककुंबर (स्पॉटेड आणि स्ट्राईप्ड) बिटल व्दारा या रोगाचा पुढे प्रसार केला जातो. पिकाच्या पानांवर पिवळसर पट्टे येतात, जास्त जुन्या पानांना गर्द हिरवा रंग आणि त्यात फिक्कट हिरवा रंग असे दिसुन येते.

वॉटर मेलॉन मोझॅक व्हायरस -२ (WMV-2)

मावा किडिमुळे (नॉन परसिसटंट) या रोगाचा प्रसार होतो. पिकाची पानांवर मोझॅक पॅटर्न दिसुन येतो ज्यात पानाच्या शिरातील अथवा इतर भाग पिवळसर पट्टयांनी व्यापला जातो. क्वचित पिकांस संतुलित पोषण दिल्यास व्हायरस ची लक्षणे कमी दिसुन येतात. मात्र फळांवरिल लक्षणे राहतात.

वॉटर मेलॉन मोझॅक व्हायरस १ (WMV-1)

मावा किडिमुळे (नॉन परसिसटंट) या रोगाचा प्रसार होतो. फळांचा आकार विचित्र बनतो, तसेच पानांवर मोझॅक पॅटर्न दिसुन येतो.

खरबुज, कलिंगड, स्क्वॅश, झुकिनी या पिकांवर जास्त प्रमाणात व्हायरस चा प्रसार होतो. मोझॅक पॅटर्न दिसुन येतो, लक्षणे जवळपास वॉटर मेलॉन व्हायरस सारखिच दिसुन येतात. नॉन परसिसटंट पध्दतीने मावा किडी व्दारे प्रसार होतो.

टोबॅको रिगं स्पॉट व्हायरस (TRSV)

खरबुज, कलिंगड, काकडी पिकांवरिल सुत्रकृमींमुळे रोगाचा प्रसार होतो.

टोमॅटो रिंगस्पॉट व्हायरस (TmRSV)

सुत्रकृमींमुळे प्रसार होतो.

अस्टर यलो मायकोप्लाझमा (AY)

तुडतुड्यांमुळे व्हायरस चा प्रसार होतो. पिकाची वाढ खुटंते आणि पान पिवळसर दिसुन येते.

फुलकिड्यांमुळे पसरणारे व्हायरस

टोमॅटो क्लोरोटिक स्पॉट व्हायरस, टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस, टोमॅटो यलो फ्रुट रिंग व्हायरस, मेलॉन यलो स्पॉट व्हायरस, टरबुजावरिल सिल्व्हर मोटल व्हायरस, मिरची वरिल क्लोरोसिस व्हायरस.

Control | नियंत्रणाचे उपाय

पिकावरिल व्हायरस रोगांच्या नियंत्रणासाठी, रसशोषक किडिंचे नियंत्रण करणे गरजेचे असते.

रस शोषक किडिंच्या नियंत्रणात खालि बाबी महत्वाच्या ठरतात.

पिकात पिवळ्या, निळ्या स्टिकी पॅड चा तसेच ईनसेक्ट नेट चा वापर करावा. ह्या नंतर देखिल किड नियंत्रणात येत नसेल तर रसायनिक किटकनाशकांचा अवलंब करावा.

रसशोषक किडिंचे नियंत्रण करत असतांना ग्रुप ४ मधिल किटकनाशकांचा एका हंगानात जास्तीत जास्त २ वेळेस वापर करावा.

कोणत्याही ग्रुप मधिल किटकनाशकाचा एका हंगामात ३ पेक्षा जास्त वेळेस वापर करु नये, तसे केल्यास किडीमधे प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका कैक पट वाढतो आणि किड नियंत्रणाबाहेर निघुन जाते.

किटकनाशक निवडतांना ते एक पेक्षा जास्त प्रकारच्या रसशोषक किडिंच्या नियंत्रणात उपयोगी ठरेल ह्या नुसार निवडण्याचा प्रयत्न करावा.

पांढरी माशीचे प्रौढ किटकनाशकांच्या फवारणीतुन नियंत्रणात येत नाहीत. त्यामुळे किडिच्या लहान अवस्थेतच नियंत्रण करावे.

किड पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार हल्ला न करता, तापमान आणि आर्द्रता किडिस अनुकुल असल्यास हल्ला करते हे लक्षात ठेवुन फवारणीचे नियोजन करावे.

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी

ऑरगॅनोफॉस्फेट IRAC Group 1

असिफेट X
ईथिऑन X X
क्लोरपायरीफॉस X X
क्विनालफॉस X
डायमेथोएट
प्रोफेनोफॉस
फॅसोलोन X
फोरेट
मोनोक्रोटोफॉस X

कार्बामेट IRAC Group 1

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
कार्बारिल X
कार्बोफ्युरॉन X
कार्बोसल्फान X X

माईट ग्रोथ ईनहिबिटर IRAC Group 10

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
हेक्झाथयोझॉक्स X X X X

IRAC Group 12

डायफेन्थ्युरॉन
प्रोपायरीगेट X X X X

IRAC Group 13

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
क्लोरफॅनपर X X X X

IRAC Group 15

फ्लुफेनॉक्झ्युरॉन X X X X

IRAC Group 16

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
ब्युप्रोफेनझीन X

IRAC Group 2

फिप्रोनिल X

IRAC Group 20

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
फेनपायरॉक्झिमेट X X X X
फेन्झाक्विन X X X X

IRAC Group 23

स्पायरोमॅसिफेन X X X X

पायरॅथ्रॉईडस IRAC Group 3

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
डेल्टामेथ्रीन X X X X
फेनप्रोप्रॅथ्रीन X X X
परमेथ्रीन X X X
फेनवलरेट X X
बीटा सायफ्लुथ्रीन X X X
बायफेनथ्रीन X X X
लॅम्डासाह्यलोथ्रीन X
सायपरमेथ्रीन X X

नीओनिकोनॉटाईडस IRAC Group 4

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
असिटामॅप्रीड X
ईमिडाक्लोप्रीड X
क्लोथीआनीडीन X
थायमेथॉक्झाम X
थायोक्लोप्रीड X X

स्पिनोसिन्स IRAC Group 5

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
स्पिनोसॅड X X X X

अव्हरमेक्टिन्स IRAC Group 6

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
ईमामोक्टिन बेन्झोएट X X X
मिलबेमेक्टिन X X X X

IRAC Group 7

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
पायरीप्रॉक्झिफेन X X X X

IRAC Group 9

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
फ्लोनीसामिड X

IRAC Group UN

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
अझाडिरिक्टिन
बायफेनझेट X X X X
डायकोफॉल X X X X
फ्लुमाईट X X X X
फ्लुव्हॅलिनेट X X X
व्हर्टिसिलियम लिकानी X X X X