logo

पिकावरिल व्हायरस

विविध पिकांवर येणारे व्हायरस हे पिकाच्या पेशीत राहणारे सुक्ष्मजीव आहेत. जगातिल पहिला शेती क्षेत्रात येणारा व्हायरस हा मार्टिनस बेजिरिन्क या डच शास्रज्ञाने १८९८ मधे शोधुन काढला. तंबाखु पिकावरिल टोबॅको मोझॅक व्हायरस चा या शास्रज्ञाने शोध लावला होता, ज्यास ते त्यावेळेस द्रव स्वरुपातील जिवंत संसर्ग करणारे द्रव असा उल्लेख करत.

पिकावरिल व्हायरस च्या कोअर मधे न्युक्लिक असिड असते. न्युक्लिक असिड हे एकतर रायबो न्यक्लिक असिड (RNA) किंवा डि ऑक्सिरायबो न्युक्लिक असिड (DNA) असते. सर्वच प्लांट व्हायरस हे रॉड किंवा आयसोमेट्रिक आकाराचे असतात. व्हायरसच्या कोअर च्या बाहेरिल बाजुस प्रोटिन्स (प्रथिने) चे कवच असते.

पिकावरिल व्हायरस ला पिकामधे शिरण्यासाठी छिद्र लागते, त्याशिवाय ते पिकांस शीरु शकत नाहीत. ह्या अशा जखमा पिकावर नैसर्गिक किंवा मानव निर्मित घटनांनी होत असतात. खालिल ठिकाणी पिकावर विविध नैसर्गिक आणि मानव निर्मित कारणांमुळे होणा-या जखमांची माहीती आहे, यापैकि एकही घटना घडत असेल तर ती पिकात व्हायरस शिरण्यास मदत करेल. त्यानुसार योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे ठरते.

>> मुळांची वाढ होत असतांना, नविन मुळी फुटणे.

>> जोराचा वारा ज्यामुळे पिकाचे अवयव तुटतात अगर त्यांना इजा होते.

>> फवारणी करतांना फांदी, पान वै तुटणे.

>> रसशोषक किडिंचा प्रादुर्भाव

>> मुळांवरिल सुत्रकृमींचा प्रादुर्भाव

>> विविध प्रकारचे कलम करुन पिकांची लागवड करत असतांना.

पिकावर येणारे व्हायरस हे प्रामुख्याने निमॅटोड, रस शोषक किडी, बुरशी, पॅरासिटिक प्लांट याव्दारे पसरत असतात.

यापैकि किडिंमुळे आणि निमॅटोड मुळे शेती पिकांत जास्तीत जास्त प्रमाणात व्हायरस चा प्रसार होतो, यांना व्हेक्टर म्हणुन ओळखले जाते.

हे व्हेक्टर जेव्हा पिकावर हल्ला करतात तेव्हा त्यांच्या शरिरात आधीपासुनच असलेला व्हायरस पिकात शिरतो, हि क्रिया अगदी १ ते ५ सेकंदात पुर्ण होते. त्यामुळे रसशोषक किड पिकांस दंश किंवा जखम करु शकणार नाही असे एखादे किटकनाशक फवारणे किंवा अशा किडिंना रोपांपासुन लांब ठेवणे गरजेचे असते. रसशोषक किडिंसाठी वापरले जाणारे किटनाशक हे किडिवर प्रक्रिया करुन तिला मारण्यासाठी ३० मिनिट ते २ दिवस देखिल लागतात, त्यादरम्यान होणारे व्हायरस चे संक्रमण थांबवणे जड जाते. काही व्हायरस हे फुलांतील परागकण आणि बीयांमुधुन देखिल ट्रान्सिमिट (संक्रमित) होतात.

व्हायरस हे जिवंत पेशीतच राहु शकतात, त्यांना जगण्यासाठी दुस-या कोणत्यातरी पेशीत रहाणे गरजेचे असते. पिकाच्या पेशीत शिरल्यानंतर हे व्हायरस त्याचे बाहेरिल प्रोटिन्स चे कवच गाळुन टाकतात, आणि स्वतःच्या न्युक्लिक असिड च्या प्रतिकृती आणि त्या प्रतिकृती टिकतील व त्यांच्या अजुन जास्त प्रतिकृती तयार होत राहतील या साठी त्यांस गरजेचे असलेले प्रोटिन्स तयार करतात. दोन पेशी मधिल सायटोप्लाझमिक ब्रिज (प्लाझमोडेसॅटा Plasmodesmata) च्या रस्त्याने एका पेशीतुन दुस-या पेशीत जातात. संबंध पिकात फ्लोएम च्या व्दारा मग हे व्हायरस फिरत राहतात. पिकाच्या मुलभुत अशा नियमित वाढीसाठी गरजेच्या अशा न्युक्लिक असिड मधे बदल करुन, त्या ऐवजी भलतेच काहीतरी तयार होत असल्यामुळे मग पिकावर व्हायरस च्या आक्रमणाची लक्षणे दिसतात.

काही वेळेस व्हायरस चा प्रादुर्भाव होवुन देखिल पिकावर काहीच लक्षणे दिसत नाहीत, अशा वेळेस तो लॅटंट व्हायरस म्हणुन देखिल ओळखला जातो, उदा. ककुंबर मोझॅक व्हायरस (CMV) आणि काऊपी (Cowpea) मोझॅक व्हायरस (CPMV) हे व्हायरस अनेक अशा पार्टिकल्स पासुन तयार झालेले असतात, संक्रमित झाल्यानंतर यातिल एका जरी पार्टिकल ची वाढ नाही झाली तरी मग व्हायरस चा प्रसार होत नसल्याने पिकावर लक्षणे दिसत नाहीत.

व्हायरस आणि किड

पिकामध्ये व्हायरस ला प्रवेश मिळवुन देण्यासाठी किटकांची गरज भासते. रस शोषण करणारी किड आणि व्हायरस यांच्यातील संबध हे चक्राकार (सर्क्युलेटिव्ह) आणि पुर्नउत्पादक (प्रोपोगेटिव्ह) अशा दोन विभागात मांडले जातात. तसेच किडीव्दारे पिकांत व्हायरस चा प्रादुर्भाव करण्याची पद्धती हि,

>> शाश्वत (Persistent) - चक्राकार (सर्क्युलेटिव्ह),

>> शाश्वत (Persistent) - पुर्नउत्पादक (प्रोपोगेटिव्ह),

>> अर्ध शाश्वत (Semi Persistent) - फोर-गट मधिल व्हायरस आणि

>> अशाश्वत (Non-Persistent)- स्टायलेट (किडीच्या तोंडातील एक भाग) मधिल व्हायरस अशा प्रकारे विभागली जाते.

चक्राकार असलेले व्हायरस आणि किडीचे संबंध

यामध्ये व्हायरस किडीच्या पचन संस्थेमध्ये प्रवेश मिळवुन, तिच्या तोंडाव्दारे जी लाळ गाळली जाते तिच्यात पुन्हा येतो. किड पिकावर भक्षण करित असतांना, तिच्या सोंडेतुन (फुलकिडे असल्यास केवळ लाळ) स्रवणा-या लाळे व्दारे पिकात प्रवेश मिळतात. असा व्हायरस किडीच्या शरिरात केवळ प्रवास करतो, त्याची संख्या वाढवत नाही.

पुर्नउत्पादक असलेले व्हायरस आणि किडीचे संबंध

यामध्ये किडीच्या शरिरात प्रवेश मिळालेला व्हायरस किडीच्या शरिरात वाढतो, आणि तिच्या तोंडातुन स्रवणा-या लाळेव्दारे पिकात प्रवेश मिळवतो.

अशाश्वत (Non-Persistent)

स्टायलेट (किडीच्या तोंडातील एक भाग) मधिल व्हायरस किडीव्दारे पिकाचे भक्षण होत असतांना काही सेंकंदात पिकात प्रवेश मिळवतात. कीडीव्दारे अशा व्हायरस चे दिर्घकाळ वहन केले जात नाही. मावा किड या गटातील व्हायरस चा प्रसार करते.

अर्ध शाश्वत (Semi Persistent)

फोर-गट मधिल व्हायरस किडीव्दारे पिकाचे भक्षण होत असतांना काही मिनीटांत पिकात मध्ये प्रवेश मिळवतात. असे व्हायरस किडीव्दारे जास्त वेळ वहन केले जातात व जास्त रोपांवर प्रादुर्भाव करण्याची क्षमता ठेवतात.

शाश्वत (Persistent)

चक्राकार (सर्क्युलेटिव्ह) या गटातील व्हायरस ला किडीच्या शरिरात प्रवास करुन त्यानंतर लाळे व्दारे पिकात प्रवेश मिळवायचा असल्या कारणाने असे व्हायरस पिकांस कमी काळात प्रादुर्भाव करु शकत नाहीत, कधी कधी तर किडीच्या जिवन क्रमानुसार त्यांचा किडी सोबत अंत देखिल होतो.

शाश्वत (Persistent)

पुर्नउत्पादक (प्रोपोगेटिव्ह) या गटातील व्हायरस हा किडीच्या शरिरातच वाढतो, कधी कधी तर तो किडीच्या अंड्यांत देखिल स्थानांतरित होतो, किडीव्दारे पिकांस प्रादुर्भाव होण्यासाठी जास्त वेळ लागतो.

Alfa Mosaic Virus
Alfa Mosaic Virus
Alfa Mosaic Virus
Alfa Mosaic Virus
Banana Infectious Mosiac Virus
Banana Infectious Mosiac Virus
Cucumber Mosiac Virus
Cotton Leaf Curl Virus
ककुंबर मोझॅक व्हायरस ग्रहण करण्यासाठी मावा किडीस ५ ते १० सेकंद लागतात, तर व्हायरस संक्रमित करण्यास १ मिनीट लागतो, २ मिनीट कालावधी नंतर व्हायरस संक्रमित करण्याची क्षमता कमी होते, आणि २ तासंनी ती नाहीशी होते.

Control | नियंत्रणाचे उपाय

पिकावरिल व्हायरस रोगांच्या नियंत्रणासाठी, रसशोषक किडिंचे नियंत्रण करणे गरजेचे असते.

रस शोषक किडिंच्या नियंत्रणात खालि बाबी महत्वाच्या ठरतात.

पिकात पिवळ्या, निळ्या स्टिकी पॅड चा तसेच ईनसेक्ट नेट चा वापर करावा. ह्या नंतर देखिल किड नियंत्रणात येत नसेल तर रसायनिक किटकनाशकांचा अवलंब करावा.

रसशोषक किडिंचे नियंत्रण करत असतांना ग्रुप ४ मधिल किटकनाशकांचा एका हंगानात जास्तीत जास्त २ वेळेस वापर करावा.

कोणत्याही ग्रुप मधिल किटकनाशकाचा एका हंगामात ३ पेक्षा जास्त वेळेस वापर करु नये, तसे केल्यास किडीमधे प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका कैक पट वाढतो आणि किड नियंत्रणाबाहेर निघुन जाते.

किटकनाशक निवडतांना ते एक पेक्षा जास्त प्रकारच्या रसशोषक किडिंच्या नियंत्रणात उपयोगी ठरेल ह्या नुसार निवडण्याचा प्रयत्न करावा.

पांढरी माशीचे प्रौढ किटकनाशकांच्या फवारणीतुन नियंत्रणात येत नाहीत. त्यामुळे किडिच्या लहान अवस्थेतच नियंत्रण करावे.

किड पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार हल्ला न करता, तापमान आणि आर्द्रता किडिस अनुकुल असल्यास हल्ला करते हे लक्षात ठेवुन फवारणीचे नियोजन करावे.

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी

ऑरगॅनोफॉस्फेट IRAC Group 1

असिफेट X
ईथिऑन X X
क्लोरपायरीफॉस X X
क्विनालफॉस X
डायमेथोएट
प्रोफेनोफॉस
फॅसोलोन X
फोरेट
मोनोक्रोटोफॉस X

कार्बामेट IRAC Group 1

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
कार्बारिल X
कार्बोफ्युरॉन X
कार्बोसल्फान X X

माईट ग्रोथ ईनहिबिटर IRAC Group 10

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
हेक्झाथयोझॉक्स X X X X

IRAC Group 12

डायफेन्थ्युरॉन
प्रोपायरीगेट X X X X

IRAC Group 13

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
क्लोरफॅनपर X X X X

IRAC Group 15

फ्लुफेनॉक्झ्युरॉन X X X X

IRAC Group 16

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
ब्युप्रोफेनझीन X

IRAC Group 2

फिप्रोनिल X

IRAC Group 20

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
फेनपायरॉक्झिमेट X X X X
फेन्झाक्विन X X X X

IRAC Group 23

स्पायरोमॅसिफेन X X X X

पायरॅथ्रॉईडस IRAC Group 3

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
डेल्टामेथ्रीन X X X X
फेनप्रोप्रॅथ्रीन X X X
परमेथ्रीन X X X
फेनवलरेट X X
बीटा सायफ्लुथ्रीन X X X
बायफेनथ्रीन X X X
लॅम्डासाह्यलोथ्रीन X
सायपरमेथ्रीन X X

नीओनिकोनॉटाईडस IRAC Group 4

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
असिटामॅप्रीड X
ईमिडाक्लोप्रीड X
क्लोथीआनीडीन X
थायमेथॉक्झाम X
थायोक्लोप्रीड X X

स्पिनोसिन्स IRAC Group 5

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
स्पिनोसॅड X X X X

अव्हरमेक्टिन्स IRAC Group 6

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
ईमामोक्टिन बेन्झोएट X X X
मिलबेमेक्टिन X X X X

IRAC Group 7

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
पायरीप्रॉक्झिफेन X X X X

IRAC Group 9

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
फ्लोनीसामिड X

IRAC Group UN

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
अझाडिरिक्टिन
बायफेनझेट X X X X
डायकोफॉल X X X X
फ्लुमाईट X X X X
फ्लुव्हॅलिनेट X X X
व्हर्टिसिलियम लिकानी X X X X