logo

प्रमुख रोग – वेल वर्गिय पिके व भाजीपाला पिके

होस्ट पिक वातावरण/लक्षणे
अन्थ्रॅक्नोझ Colletotrichum lagenarium

वेल वर्गिय पिके प्रामुख्याने कलिंगड. खरबुज, काकडी.

24 डिग्री.से. तापमान योग्य. वातावरणातील आद्रता गरजेची असते.

 

पानांवर व फळांवर जळाल्या सारखे डाग पडतात.
बॅक्टेरियल विल्ट (Erwinia tracheiphila)

वेल वर्गिय पिके, प्रामुख्याने कलिंगड,काकडी, खरबुज.

 

समर स्क्वॅश आणि गंगाफळ (डांगर, Pumpkin)च्या पानांच्या शिरांमधिल भाग पिवळा पडुन जळाल्यासारखा होतो. कलिंगड, काकडी पिकांत वेल पाणी न मिळाल्या प्रमाणे सुकुन जाते.

फ्युजॅरियम विल्ट Fusarium oxysporum f. sp. Melonis

कलिंगड,खरबुज

जमिनीचे तापमान १७ ते २५ डि.से. असतांना तसेच जमिनीत पाण्याची मात्रा कमी असतांना लागण होते.जमिनीचे तापमान ३० डि.से. पेक्षा जास्त झाल्यास लागण कमी असते. 

 

जास्त प्रमाणात नत्राचा वापर रोगाच्या वाढीस मदत करतो. पिकाची पाने पिवळी पडुन सुकतात.शेतात विखुरलेल्या जागांवर मर दिसुन येते. खोडातुन द्रव स्रवतो.
गमी स्टेम ब्लाईट (Gummy Stem Blight) Didymella bryoniae, Phoma cucurbitacearum)

काकाडी वर्गिय सर्व पिके. विशेष करुन काकाडी, कलिंगड, खरबुज

सतत १ ते १० तास ओलसरपणा आणि ८५ टक्क्यांपेक्षा जास्त आद्रता रोगास पोषक ठरते.

 

पानांच्या शिरांमधिल भाग पिवळा पडतो, खोड चिरल्या सारखे दिसते, पानांच्या पिवळ्या झालेल्या भागात नंतर कोरडेपणा येतो.
फायटोप्थोरा ब्लाईट (Phytophthora capsici, Phytophthora parasitica or P. capsici)

वेल वर्गिय पिके, मिरची, टोमॅटो, वांगी

ओलसर जमिन जीचे तापमान १८ डि.से. असते आणि वातावरणातील तापमान २३ ते २५ डि.से. असतांना रोगाच्या वाढीसाठी अत्यंत अनुकुल हवामान असते.

 

डॅपिंग ऑफ, क्राउन रॉट, पानांवरिल काळसर ठिपके, फळांवरिल डाग, मुळकुज यासारखी लक्षणे दिसतात. वेलीचे खोड पाणी शोषल्या प्रमाणे होते, नंतर सुकुन जाते. वेलीचा शेंडा जळुन जातो. मिरची पिकाच्या कोणत्याही अवस्थेत रोग येवु शकतो. रोप लहान असतांना झालेला हल्ला पिकाला परतवुन लावता येत नसल्याने रोप काही दिवसात मरुन जाते, तर फळ धारणा अवस्थेतील रोपात मर काहीप्रमाणात वाचवता येते. पानांवर, फळांवर, खोडावर हा रोग हल्ला करतो. क्राऊन रॉट,डॅपिग ऑफ,फळकुज यासारखी लक्षणे दिसतात. टोमॅटो पिकांत फळांवर तपकिरी,काळसर पाणी शोषल्यासारखे ठिपके दिसतात.

भुरी Erysiphe cichoracearum, Podosphaera xanthii

वेलवर्गिय पिके

Erysiphe cichoracearumया प्रजातीचा प्रादुर्भाव हा तुलनेने कमी तापमानात आणि उन्हाळाच्या सुरवतीला जास्त दिसुन येतो, तर Podosphaera xanthiiहि जात अधिक उबदार वातावरण पसंत करते. अगदी ५० टक्के इतकी सापेक्षा आद्रता देखिल रोगाच्या प्रादुर्रभावासाठी पुरेसी ठरते. वसाहत निर्मिती, स्पोर्युलेशन (नविन स्पोअर निर्मिती जेणे करुन रोग वाढेल) आणि अशा स्पोअर्स चे वहन यासाठी कोरडे हवामान पोषक ठरते. १० ते ३२ डि.से. तापमानात रोगाची लागण होवु शकते. ३७ डि.से. तापमानापेक्षा जास्त तापमानात रोग सहसा वाढत नाही.

 

भुरीसारखी लक्षणे दिसुन येतात. पानांवर पाढ-या रंगाची पावडर जमा झालेली दिसुन येते. तापमानात फेर बदल तसेच फळधारणे नंतर नियमुत पणे शेताची पाहणी करावी. रोगासाठी पोषक वातावरण असतांनाचा एकात्मिक रोग नियंत्रण पध्दतीचा वापर करुन दर ७ ते १० दिवसांनी नियमित फवारणी घ्यावी. पानांच्या खालुन फवारणी होईल अशा पध्दतीने फवारणी करावी. उत्तम प्रतीच्या नोझल चा वापर करावा. रोगाची लागण आणि लक्षणे दिसण्याचा काळ यातील फरक हा केवळ ३ ते ७ दिवसांचा आहे. कोनिडियांची निर्मिती फार वेगाने होत असल्याने रोग झपाट्याने वाढतो. फळ धारणेनंतर रोगाची लागण जास्त प्रमाणात होते. पिकातील पालाश ची मात्रा योग्य राखावी.

सडन विल्ट (Acremonium cucurbitacearum, Pythium spp., and Rhizopycnis vagum)

वेलवर्गिय पिके

पिथियम मुळे होणारी मर हि पाऊस, थंड हवामान, किंवा भरपुर पाणी दिल्यानंतर दिसुन येते.
तर एक्रॅमोनियम आणि राझोपायनिस मुळे होणारी मर हि उबदार वातावरणात दिसुन येते.

 

पिक सहसा माल काढणी अवस्थेत असतांना रोगाची लागण फार झपाट्याने होते, आणि काही दिवसातंच पुर्ण शेतात पसरते. पिकाची तळाकडिल पाने पिवळी पडतात, पाने कडक होतात, मुळांच्या रंग काहीसा गर्द होतो. पिक फेरपालट हाच एक चांगला उपाय आहे, रोग कोणतिही पुर्व सुचना न देता फार वेगाने पसरतो. त्यामुळे रोगास पोषक ठरेल असे काहीही घडले तरी लागलिच उपाययोजना करावी. मर रोगांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा, आणि बॅसिलस सबटिलस चा वापर हा पिक लागवड करत असतांनाच सुरवातीस आणि नियमित पणे जेव्हा जेव्हा रोगासाठी पोषक वातावरण असेल तेव्हा करावा.

क्राउन ब्लाईट (वाईन डिक्लाईन) Monosporascus cannonballus

कलिंगड, खरबुज, काकडी

ऊमायसिटीस मुळे पसरणारा हा रोग पिक काढणीच्या काही दिवस आधी दिसुन येतो. उबदार वातावरण रोगासाठी पोषक ठरते. मातीच्या २३ ते २९ डि.से. तापमानात रोगाची लागण वेगात होते. रोगाचे अस्कोस्पोअर्स २० डि.से. तापमानात देखिल रुजु शकतात.

रोगाच्या सुरवातीच्या लक्षणात तळाकडिल पाने पिवळी पडतात, जळाल्या सारखी भासतात. प्रथम लक्षणांनंतर काही दिवसांतच रोग वाढुन पुर्ण रोप पिवळे पडुन मरुन जाते. रोगाच्या मुळे रोप मेल्यानंतर काही दिवसांनी मुळांवरिल लक्षणे दिसुन येतात ज्यात,मुळांवर तपकिरी रंगाचे डाग दिसुन येतात. बुरशीच्या पुर्नउत्पादक अवस्था म्हणजे अस्कोस्पोअर्स ह्या केवळ एका प्रादुर्भावग्रस्त रोपाच्या मुळांवर ४ लाख इतक्या प्रचंड सख्येत तयार होतात.

व्हर्टिसिलियम विल्ट Verticillium dahlia

सर्व वेल वर्गिय पिके, टोमॅटो, मिरची व इतर भाजीपाला पिके

उबदार, ओलसर वातावरणात रोगाची लागण जास्त असते.

पिक तणावाखाली असतांना तसेच फळ तयार होत असतांना रोगाची लागण होते. या रोगात पिकाच्या तळाकडील पाने पिवळी पडतात व हा पिवळेपणा शेंड्याकडे वाढत जातो. रोगाची बुरशी पिकाच्या मुळांत शिरते, आणि पिकाची रसवाहीनी बंद करते ज्यामुळे पाने पिवळी पडतात. व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा, आणि बॅसिलस सबटिलस चा वापर हा पिक लागवड करत असतांनाच सुरवातीस आणि नियमित पणे जेव्हा जेव्हा रोगासाठी पोषक वातावरण असेल तेव्हा करावा.

बॅक्टेरियल स्पॉट (Xanthomonas campestris)

मिरची,टोमॅटो

वातावरणातील आद्रता आणि पावसामुळे किंवा दव पडल्यामुळे पानांवर पाणी साचुन राहील्यास रोगाच्या लागण होण्यात मदत मिळते.

रोगाचा जीवाणू पिकांत पर्णरंध्र, आणि जखमांतुन प्रवेश मिळवतो. रोगाचा प्रसार हा पाणी, जोराचा वारा, तसेच मानवामुळे सतत पिक हातळल्याने होतो. पानांवर फळांवर खरबडीत, उंचवटे असे तपकिरी रंगाचे डाग पडतात. पिकावर कॉपर चे संरक्षक कवच ठेवणे गरजेचे आहे.

भुरी (Leveillula taurica (imperfect stage = Oidiopsis taurica))

मिरची,टोमॅटो

१८ ते ३३ डि.से. तापमानात रोगाची लागण होते. कमी आणि जास्त अशा दोन्ही प्रकारच्या आद्रतेमधे लागण होते.

या पिकांवरिल येणारी भुरी हि ईतर पिकांपेक्षा वेगळी आहे, ईतर पिकावरिल भुरी हि पानांच्यावर वाढते, तर मिरची वरिल लेव्हेल्युला हि बुरशी पानांच्या आत वाढते. पानांवर पांढ-या रंगाची पावडर जमा झालेली दिसुन येते.

अल्टरनॅरिया स्टेम कॅंकर (Alternaria alternata f. sp. Lycopersici)

टोमॅटो

२५ डि. से. तापमानात रोगाची वाढ झपाट्याने होते. रोगाच्या रुजण्यासाठी पाणी गरजेचे आहे. प्रसार होण्यात आद्रता किंवा दव पुरेसे होते.

पिकाच्या जमिनीलगत असलेल्या खोडावरिल भागावर तपकिरी काळसर रंगाचे पट्टे पडतात, खोड त्याठिकणी कुजुन जाते, व रोप मरते. रोगाचा प्रसार मातीतुन होतो.

बॅक्टेरियल स्पेक (Pseudomonas syringae pv. Tomato)

टोमॅटो

थंड, ओलसर वातावरणात रोगाचा प्रसार जास्त होतो. रोगाच्या प्रसारासाठी पाऊस, स्प्रिंकलर इरिगेशन मदत करते. उष्ण वातावरणात रोगाची वाढ थांबते.

पिकाच्या पानांवर, फळांवर, फुलांवर अनियमित असे काळसर चट्टे पडतात. पानांच्या कडा जळाल्यासारख्या दिसतात. अपक्व फळांवर काळे ठिपके पडतात, जे आकाराने लहान असतात, तसेच पक्व फळांवर मोठ्या आकाराचे उंचवटा असलेले खरबडीत डाग पडतात.

ब्लॅक मोल्ड (Alternaria alternata)

टोमॅटो

पाऊस, अथवा जास्त प्रमाणात आद्रता असल्यास रोगाची लागण होते. बुरशीच्या स्पोअर्स ला जर्मिनेट होण्यासाठी ३ ते ५ तास ओलावा गरजेचा असतो.

फळांवर हलक्या ते गर्द तपकिरि रंगाचे लहान मोठे खोलगट असे ठिपके पडतात, रोगाच्या वाढीसाठी पोषक वातावरण असल्यास प्रादुर्भाव बाहेरील सालीच्या आतुन बियांपर्यंत देखिल पसरतो.

अर्ली ब्लाईट (Alternaria solani)

टोमॅटो, बटाटा

थंड आणि ओलसर वातावरणात रोगाची लागण होते. रोगाची वाढ जास्त तापमानात थांबते.

पानांवर पिवळसर किनार असलेले ठिपके पडतात, ठिपक्यांच्या आतिल भाग पुर्णपणे जळुन जातो. अशाच प्रकारची लक्षणे फांदीवर, फळांवर देखिल दिसुन येतात. लक्षणे सहसा जुन्या पानांवर प्रथम दिसुन येतात.

लेट ब्लाईट (Phytophthora infestans)

टोमॅटो, बटाटा

ज्यावेळेस तापमान १५ ते २५ डि.से. आणि ९० टक्क्यांपेक्षा जास्त आद्रता असते त्यावेळेस प्रादुर्भाव जलद होतो, अगदी १० तासात प्रादुर्भाव होतो.

पानांवर ओलसर असे हिरवट गर्द, काळसर तपकिरी चट्टे पडतात. ह्या चट्ट्यांना तेलकट असा प्रभाव दिसुन येतो. वातावरण पोषक असल्यास पांढ-या रंगाचे स्पोअर्स दिसुन येतात. फळांच्या देठा जवळिल भाग तपकिरी होतो, जोवर दुस-या एखाद्या बुरशी हल्ला होत नाही तोवर ते घट्ट असेच राहतात.फांदीवर देखिल गर्द तपकिरी रंगाचे पट्टे दिसुन येतात. 

सेप्टोरिया लिफ स्पॉट (Septoria lycopersici)

टोमॅटो

१५ ते २७ डि.से. तापमानात रोगाची लागण होते. ४८ तासात स्पोअर्सचे जर्मिनेशन होते, पाणी गरजेचे असल्याने खुप जास्त आद्रता (१०० टक्के) किंवा पाऊस रोगाच्या लागण होण्यात मदतनीस ठरतो.

 

रोगाच्या लक्षणात पानांवर खालील बाजुने तपकिरी काळसर ठिपके पडतात, त्या ठिपक्यांच्या आतिल भागात बुरशीचे स्पोअर्स वाढलेले दिसुन येतात.

अथ्रॅकन्कोज (Colletotrichum coccodes)
टोमॅटो

रोगाच्या वाढीसाठी उबदार वातावरण पोषक ठरते.

फळांवर खोलगट असे गोलाकार, अंडाकृती मोठ्या आकाराचे खोलगट पट्टे पडतात. पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके दिसुन येतात जे जळालेल्या सारखे दिसतात.