logo

Aphids | मावा किड

मावा किड हि जवळपास सर्वच पिकांवर दिसुन येते. लैंगिक आणि अलैंगिक अशा दोन्ही प्रकारे पुर्नुत्पादन करण्याची क्षमता या किडीत असते. उबदार वातावरणात मादी किड अलैंगिक पध्दतीने दिवसाला जवळपास १२ पिल्लांना जन्म देते. मावा किड चार अवस्थांतुन जाते, आणि या प्रत्येक अवस्थेतुन पुढील अवस्थेत जाण्यापुर्वी कात टाकते. या किडीत सुप्त अशी कोषावस्था नसते. पिल्लु ते प्रौढ अशी अवस्था ५ ते ८ दिवसांत पुर्ण होते. काही जाती या अंडी देखिल देतात.

उबदार आणि काहीशा उष्ण वातावरणात मावा किड पंख असलेले प्रौढ अवस्थेत जाते, तर थंड वातावरणात प्रौढ हे पंख नसलेले असतात. मावा किड पिकातील रस शोषण करते. हा रस शोषत असतांनाच हि किड मधासारखा गोड द्रव देखिल स्रवत असते. या चिकट द्रवावर सुटी मोल्ड ही बुरशी देखिल वाढते ज्यामुळे पान काळसर दिसते.

पार्थिनोजेनेसिस (अलैंगिक)पध्दतीने जन्मलेली मादी २० दिवस पर्यंत जगु शकते, मादीने जन्म दिलेली पिल्ले १० डि.से. तापमानात २० दिवसांत प्रौढ होते, तर ३० डि.से. तापमानात ४ दिवसांत प्रौढ होते. मादी जीवन क्रमात ८५ पिल्लांना जन्म देते.
Alfa Mosaic Virus
Alfa Mosaic Virus
Alfa Mosaic Virus
Alfa Mosaic Virus
Banana Infectious Mosiac Virus
Banana Infectious Mosiac Virus
Cucumber Mosiac Virus
Cotton Leaf Curl Virus
ककुंबर मोझॅक व्हायरस ग्रहण करण्यासाठी मावा किडीस ५ ते १० सेकंद लागतात, तर व्हायरस संक्रमित करण्यास १ मिनीट लागतो, २ मिनीट कालावधी नंतर व्हायरस संक्रमित करण्याची क्षमता कमी होते, आणि २ तासंनी ती नाहीशी होते.

मावा किड हि शाश्वत (Persistent)- पुर्नउत्पादक (प्रोपोगेटिव्ह) किंवा अशाश्वत (Non-Persistent) या पैकि केवळ एकाच पद्धतीने व्हायरस चा प्रसार करु शकते. शाश्वत पद्धतीमध्ये मावा किडीचे केवळ काही वेळ रस शोषण करणे व्हायरसच्या प्रसारास पुरेसे ठरते. मात्र अशाश्वत पद्धतीमध्ये मावा किडीस पानावर जास्त काळ घालवावा लागतो. अशाश्वत पद्धतीत मावा किडीस एका पानावर प्रादुर्भाव केल्यानंतर पुन्हा प्रादुर्भाव करण्यासाठी चार्ज घ्यावा लागतो (स्टायलेट भागात पुन्हा व्हायरस येण्यासाठी), तर शाश्वत पद्धतीत मावा किडीमध्येच व्हायरस वाढत असल्याने किडीस जास्तीत जास्त काळ प्रादुर्भाव करणे शक्य होते. वॉटर मेलॉन १ आणि २, तसेच झुकीनी यलो मोझॅक व्हायरस, पपया रिंग स्पॉट व्हायरस, सेलेरी मोझॅक व्हायरस हे नॉन परसिसटंट पध्दतीने संक्रिमीत केली जातात. कॉटन अन्थोसायनोसिस व्हायरस, कॉटन कर्लीनेस व्हायरस, कॉटन ब्लु डिसीस, कॉटन लिफ रोल आणि पर्पल विल्ट हे व्हायरस परसिसटंट पध्दतीने संक्रमित केले जातात. मावा किड काहि मिनीटातच व्हायरस चे संक्रमण करते, तर किटकनाशकांस मावा किड मारण्यास काही तास लागतात त्यामुळे व्हायरस चे संक्रमण थांबवणे कठिण जाते. उबदार, दमट वातावरणात किडीची वाढ जोमात होते.

Control | नियंत्रणाचे उपाय

रस शोषक किडिंच्या नियंत्रणात खालि बाबी महत्वाच्या ठरतात.

पिकात पिवळ्या, निळ्या स्टिकी पॅड चा तसेच ईनसेक्ट नेट चा वापर करावा. ह्या नंतर देखिल किड नियंत्रणात येत नसेल तर रसायनिक किटकनाशकांचा अवलंब करावा.

रसशोषक किडिंचे नियंत्रण करत असतांना ग्रुप ४ मधिल किटकनाशकांचा एका हंगानात जास्तीत जास्त २ वेळेस वापर करावा.

कोणत्याही ग्रुप मधिल किटकनाशकाचा एका हंगामात ३ पेक्षा जास्त वेळेस वापर करु नये, तसे केल्यास किडीमधे प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका कैक पट वाढतो आणि किड नियंत्रणाबाहेर निघुन जाते.

किटकनाशक निवडतांना ते एक पेक्षा जास्त प्रकारच्या रसशोषक किडिंच्या नियंत्रणात उपयोगी ठरेल ह्या नुसार निवडण्याचा प्रयत्न करावा.

पांढरी माशीचे प्रौढ किटकनाशकांच्या फवारणीतुन नियंत्रणात येत नाहीत. त्यामुळे किडिच्या लहान अवस्थेतच नियंत्रण करावे.

किड पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार हल्ला न करता, तापमान आणि आर्द्रता किडिस अनुकुल असल्यास हल्ला करते हे लक्षात ठेवुन फवारणीचे नियोजन करावे.

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी

ऑरगॅनोफॉस्फेट IRAC Group 1

असिफेट X
ईथिऑन X X
क्लोरपायरीफॉस X X
क्विनालफॉस X
डायमेथोएट
प्रोफेनोफॉस
फॅसोलोन X
फोरेट
मोनोक्रोटोफॉस X

कार्बामेट IRAC Group 1

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
कार्बारिल X
कार्बोफ्युरॉन X
कार्बोसल्फान X X

माईट ग्रोथ ईनहिबिटर IRAC Group 10

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
हेक्झाथयोझॉक्स X X X X

IRAC Group 12

डायफेन्थ्युरॉन
प्रोपायरीगेट X X X X

IRAC Group 13

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
क्लोरफॅनपर X X X X

IRAC Group 15

फ्लुफेनॉक्झ्युरॉन X X X X

IRAC Group 16

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
ब्युप्रोफेनझीन X

IRAC Group 2

फिप्रोनिल X

IRAC Group 20

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
फेनपायरॉक्झिमेट X X X X
फेन्झाक्विन X X X X

IRAC Group 23

स्पायरोमॅसिफेन X X X X

पायरॅथ्रॉईडस IRAC Group 3

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
डेल्टामेथ्रीन X X X X
फेनप्रोप्रॅथ्रीन X X X
परमेथ्रीन X X X
फेनवलरेट X X
बीटा सायफ्लुथ्रीन X X X
बायफेनथ्रीन X X X
लॅम्डासाह्यलोथ्रीन X
सायपरमेथ्रीन X X

नीओनिकोनॉटाईडस IRAC Group 4

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
असिटामॅप्रीड X
ईमिडाक्लोप्रीड X
क्लोथीआनीडीन X
थायमेथॉक्झाम X
थायोक्लोप्रीड X X

स्पिनोसिन्स IRAC Group 5

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
स्पिनोसॅड X X X X

अव्हरमेक्टिन्स IRAC Group 6

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
ईमामोक्टिन बेन्झोएट X X X
मिलबेमेक्टिन X X X X

IRAC Group 7

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
पायरीप्रॉक्झिफेन X X X X

IRAC Group 9

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
फ्लोनीसामिड X

IRAC Group UN

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
अझाडिरिक्टिन
बायफेनझेट X X X X
डायकोफॉल X X X X
फ्लुमाईट X X X X
फ्लुव्हॅलिनेट X X X
व्हर्टिसिलियम लिकानी X X X X