logo

About Us

Swami Vivekananda, once told that if a poor and downtroden cannot come to education, then education should go to them. Monks and volunteers should carry scientific instruments like maps, lamps and visit them to teach. Education is manifestation of perfection already in man, when we get well informed we are actually taking a step towards that supreme prosperity. Agriculture cannot be made separate from Spirutulality, farmers perhaps the most important community who from generations have kept devinity alive in scoiety.

स्वामी विवेकानंद ह्यांचे जीवन चरित्र वाचले, अभ्यासले तर एक लक्षात येते की, सामान्य व्यक्ती जी तुमच्या आमच्यासारखीच सर्वसाधारण आयुष्य जगली ती व्यक्ती योग्य अशा गुरुंच्या संपर्कात आल्यानंतर, मानावापासुन देवत्वापर्यंतचा प्रवास कसा होतो. त्यांचे पुर्ण आयु्ष्य हे समस्या आणि केवळ समस्यांनी भरलेले होते.

कॉलेज चे शिक्षण पु्र्ण झाल्यानंतर वडिलांचा अकाली झालेली मृत्यु, आणि त्यानंतर नातेवाईकांनी त्यांच्या राहत्या घरावर मिळवलेला बेकायदेशीर कब्जा, घरची परिस्थिती एकेकाळी कलकत्ता मधिल सर्वाधिक श्रीमंत अशा गटात मोडत होती, आणि वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आलेले भिषण दारिद्र. घरच्यांना काहीतरी अन्न खायला मिळेल याचा विचार करुन घरी खोटच सांगणे की, मला आज मित्रा कडे जेवायला बोलावले आहे.

जिथे नोकरी मागायला जायचे तेथुन नकार, काही ठिकाणी तर अशी पण उत्तरे मिळालीत की, तुमच्या ईतक्या प्रतिभावान व्यक्तीसाठी आमच्या कडे उचित काम नाही देण्यास

आणि ह्या सर्वांच्या पार्श्वभुमीवर त्यांची स्वतःची ईश्वर प्राप्तीची प्रचंड ईच्छा.

स्वामीजी जेव्हा त्यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांचे कडे परिवाराच्या हालअपेष्टा मिटाव्यात म्हणुन काली मॉ कडे प्रार्थना करा असे सांगायला गेले तेव्हा, ठाकुरांनी त्यांना सांगितले कि तुच स्वतः का नाही मागत, आई कडे तुला जे हव ते...

स्वामीजी तिन वेळेस दक्षिणेश्वरच्या काली मंदिरात घरच्यांसाठी मदत मागायला गेलेत आणि "हे आई, मला त्याग दे, वैराग्य दे, भक्ति दे" अस काहीतरी मागुन आलेत. शेवटी ठाकुर त्यांना म्हणालेत कि, ज्या अर्थी तु मागु शकला नाहीस त्या अर्थी तुझ्या नशिबात सांसारिक सुख नाही, पण तरिही तुझ्या घरच्यांना जुजबी अन्न आणि वस्राची दादत भासणार नाही.

तरुण विवेकानंद हे ऐकुन आश्वस्त झालेत आणि लवकरात लवकर घरच्या समस्या सोडविण्यासाठी कामाला लागलेत. थोड्याच दिवसांत ते त्यांच्या घरावर जी केस सुरु होती ते जिंकले.

स्वामीजींसोबत त्यांचे ईतर मित्र जे ठाकुरांचे अंतरंगीचे शिष्य होते, ते ठाकुरांच्या लिलासमाप्ती काळात त्यांची आता पुर्ण वेळ सेवा करु शकत होते.

ठाकुरांच्या लिलासमाप्ती नंतर, ह्या सर्व गुरुबधुंनी सेवेचे व्रत स्विकारले. "आत्मनो मोक्षार्थ जगदहितायच"

स्वामी विवेकानंदांचे भारत भ्रमण आणि विश्वधर्म परिषद

ज्या जनतेची सेवा करायची आहे, त्यांच्या समस्या आधी समजुन घ्याव्यात ह्यासाठी विवेकानंद पुर्ण भारत फिरलेत.

ह्या परिव्राजक काळात त्यांना दिसुन आले की, धर्म ह्या देशात जिवंत आहे, तो जिवंत आहे गरिबाच्या, कष्टक-यांच्या, शेतक-यांच्या घरात. केवळ सध्या एक विलक्षण असा जडवाद त्याला झाकुन आहे. गरज आहे ह्या जनतेच्या दैनंदिन गरजा पुर्ण करुन त्यांना माणुस म्हणुन जगण्याचा अधिकार प्राप्त कसा होईल ह्यासाठी कार्य करण्याची.

ह्या उद्देशाने ते अमेरिकेत गेलेत आणि विश्वधर्म परिषदेत काय झाले ते आपण सगळे जाणतातच.

स्वामीजींनी जनसेवा आणि ईश्वरप्राप्ती ह्यांचा सुरेख संगम असलेली जी संस्था त्यानंतर स्थापन केली ती आहे, श्री रामकृष्ण मठ आणि मिशन, जीचे मुख्यालय बेलुड, कोलकाता, पश्चिम बंगाल येथे आहे. श्री रामकृष्ण मठातुन सन्यासी तयार केले जातात ज्यांना ईश्वर प्राप्तीची ईच्छा आहे आणि श्री रामकृष्ण मिशन व्दारा हे सन्यासी आणि गृहस्थ भक्त जनतेच्या सेवेसाठी कार्य करत असतात.

अज्ञान हा असा राक्षस आहे, जो पिढ्याच्या पिढ्या खावुन टाकतो. अज्ञान हे जस अध्यात्मिक जीवनात असते तसेच ते सांसारिक जीवनात देखिल असते. चुकिच्या माहीतीच्या आधारे घेतलेला निर्णय हा अनेक वेळेस घातक ठरतो.

शेती हे असे क्षेत्र आहे, ज्यात कोणताच उपाय हा १०० टक्के बरोबर अगर चुक असत नाही. ह्या क्षेत्रात एकाच समस्येची किमान १० तरी उत्तरे आहेत, आणि ती सर्वच्या सर्व बरोबर आहेत.

अशा परिस्थितीत, आपण जी काही पण शेती करत असतो, त्यात उपलब्ध असलेल्या हजारो पर्यायांनी मनात गोधंळ उडणे हे स्वाभाविक आहे. स्वामी विवेकानंद ह्यांनी स्थापन केलेली संस्था ही जगभरातील जनतेच्या आध्यात्मिक, आरोग्य, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी कार्य करते. एग्रीप्लाझा ह्या पैकी शैक्षणिक क्षेत्रात आपले एक छोटे योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे.

शेतकरी आत्महत्या आणि त्यांची खालावलेली परिस्थिती, हि फार जवळुन बघितली असल्याने नेमक कुठ चुकतय हे थोडफार कळतय असा समज मनात पाळुन आम्ही जास्तीत जास्त प्रकारे शक्य होईल तितकी तांत्रिक माहीती शेतकरी वर्गासमोर मांडायचा प्रयत्न करत आहोत. ह्यातील काही माहीती ही फार वेगळी असेल, सहसा मान्य न होण्याईतकी धाडसी देखिल असु शकते, पण स्वामीजींच्या शिकवणीने प्ररित होवुन, त्यांच्याच आर्शिवादाने, मात्र दोन लोकांची टिम हे कार्य करत असल्याने त्यात काही वैयक्तिक मत असु शकतात, आणि ते असतिल तर त्याबाबत आम्ही क्षमस्व देखिल आहोत.

आधीच सांगितल्या प्रमाणे, शेतीतील प्रत्येक समस्येची किमान १० अगदी अचुक उत्तरे असतातच, त्यापैकी नेमके कोणते निवडायचे असा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा उत्तर एकच असते, केलेल्या उपाययोजनेचा शेतातील पिकाला किती फायदा होईल, आणि त्या अनुशंगाने केलेला खर्च हा शेतातील पिक विकुन वसुल होईल आणि दोन पैसे घरी येतील का?

स्वामीजींचे जीवन चरित्र एकदा वाचावे हि विनंती, जगात अशक्य अस काहीच नाही, आणि बाहेरुन मदत घेवुन फारफार तर पोटाची खळगी भरेल, आणि जे वरदान ठाकुरांनी, विवेकानंदांना दिले कि, जुजबी अन्न वस्राची कमी पडणार नाही, तेच आपल्याला देखिल प्राप्त आहे. ह्याचा विचार करुन शक्तीशाली व्हा, समस्या ह्या संधी घेवुन येत असतात.

स्वामी विवेकानंद म्हणतात तस तुमच्यात अफाट शक्ती आहे, जगात अस काहीच नाही जे तुम्ही करु शकत नाहीत.