logo

जमिनीचे प्रकार

आपण ज्या जमिनीत शेती करत आहोत, आधी तीचे नैसर्गिक गुणधर्म आणि त्या जमिनीचे रासायनिक व भौतिक गुणधर्म माहीत असणे गरजेचे आहे.

ब-याच वेळेस असे होते कि, आपण माती परिक्षण करतो आणि त्यात आपल्याला असे कळते की जमिनीचा सामु, ईसी वै. सर्वच समस्या ग्रस्त आहे. हे असे कळल्या नंतर मग आपण काहीतरी उपाययोजना करत असतो. या सर्वच उपाययोजना ह्या साहजीकच खर्चिक असतात, आपला उद्दशे जरी जमिनीचे गुणधर्म बदलवुन त्यायोगे जास्त उत्पादन मिळवणे हा असला तरी, ज्या पदार्थांपासुन आणि ज्या नैसर्गिक वातावरणात जमिन तयार झालेली आहे, ती तशी तयार होण्यात शेकडो-लाखो वर्ष लागलेले असतात. आपण करत असलेल्या उपाययोजनांमुळे जमिनीचे गुणधर्म किती बदलतील आणि ते तसे बदलण्यासाठी किती खर्च येईल याची हिशेब मांडणे गरजेचे आहे.

जमिनीच्या पीएच नुसार खतांचे स्वरुप बदलवणे, जिप्सम किंवा सल्फर चा वापर करणे यासर्वच गोष्टी कमी अधिक प्रमाणात आपण सर्वच जण करत असतो. पण याने मुलभुत प्रश्न बदलत नाही, कारण जी माती तयार होण्यात शेकडो-लाखो वर्ष लागलित ती अशी १-२ वेळेस उपाययोजना करुन खरच बदलेल का? आणि आपणास हवी तशीच बदलेल का?

कि आपण जसे सुरु आहे तसेच व्यवस्थापन करुन देखिल हवे तसे उत्पादन मिळवु शकतो?

कधी आपण असा विचार केला आहे का, ठिक आहे माती परिक्षण रिपोर्ट मधे पीएच , ईसी वै. सर्वच समस्या ग्रस्त आलेले आहे, पण तरी देखिल मला मी जे पिक करतो त्याचे उत्पादन हे गेली अनेक वर्ष चांगलेच मिळालेले आहे.

हा विचार केल्या नंतर कदाचित आपली माती सुधारणा प्रक्रिया थोडी बदलेले. या कोर्स मधे आपण जमिनीचे मुलभुत गुणधर्म त्यासाठीच जाणुन घेणार आहोत.

भारतीतील जमिनींचे प्रामुख्याने ७ प्रकार पडतात.