logo

Thrips and Viruses

फुलकिडे

टॉसपोव्हायरसे जे पिकावर होणा-या व्हायरस रोगांच्या टॉसपोव्हायरस जीनस मधिल व्हायरस आहेत हे सर्व फुलकिडे (थ्रिप्स) व्दारा पिकांमध्ये वाहुन नेले जातात. फुलकिड्यांच्या जगभरातील 1710 ज्ञात प्रजातींपैकी 14 प्रजाती ह्या व्हायरस पसरवित आहेत.

शाश्वत (Persistent) - पुर्नउत्पादक (प्रोपोगेटिव्ह) पद्धतीने हा व्हायरस फुलकिड्यांव्दारे पसरत असतो.

किडीची अळी (nymph stage) अवस्था हि प्रामुख्याने व्हायरस चे ग्रहण करते, त्यानंतर किडीच्या शरिरात वाढुन हा व्हायरस किडीच्या प्रौढ अवस्थेव्दारे प्रसारित केला जातो. d (Wijkamp et al.1996a, Ullman et al. 1997, Whitfield et al. 2005, Persley et al. 2006) प्रौढ फुलकिडे व्हायरस ग्रहण करु शकतात मात्र त्यांच्या व्दारा, त्यांच्या शरिरात वाढण्यास पुरेसा वेळ न मिळाल्याने तसेच लाळ ग्रंथींपर्यंत न पोहचल्यामुळे त्यांच्या व्दारा व्हायरस चे प्रसारण होत नाही. हा व्हायरस अंड्यांव्दारे एका पिढीतुन दुस-या पिढीकडे जात नाही.

किडीची अळी अवस्था(nymph stage) हि व्हायरस ग्रहण करीत असते हे आपण आधीच बघितले आहे, सर्व साधारणपणे फुलकिडे किडीची प्रौढ अवस्था दृष्टीस पडल्यानंतर त्यावर उपाय योजना केली जाते, मात्र त्या आधीच अळी अवस्थेने व्हायरस ग्रहण करुन तो प्रसारण योग्य तयार करुन ठेवलेला असतो, यामुळे अशा वेळेस किडीचे अनुकुल वातावरणात येणे ग्रृहीत धरुन त्यानुसार उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सर्वसाधरणपणे लक्षात घेता (फुलकिड्यांची प्रत्येक प्रजाती वेगवेगळ्या पद्धतीने जीवक्रम अनुसरत असते)

फुलकिड्यांची मादी हि एका वेळेस 50 अंडी देते, जी पिकाच्या पानांच्या, फुलांच्यास फळांच्या पेशीत दिली जातात. यातुन 5 दिवसांत पिल्ले बाहेर येतात, जी एका दिवसात दुस-या इनस्टार मध्ये रुपांतरीत होतात, 4-5 दिवसांनी प्युपा तयार होतो, यातुन 3 दिवसांत प्रौढ बाहेर येतो, तापमानाचा फुलकिड्यांच्या जीवनक्रमावर विषेश परिणाम होतो. सर्वसाधारणपणे असे 7 ते 22 दिवसांचे आयुष्य हे वातावरणानुसार असते.

विविध फुलकिड्यांमुळे जे व्हायरस पसरतात त्यांची नावे खालिल प्रमाणे

भुईमुगावरिल रिंगस्पॉट व्हायरस ,इप्केशियस नेक्रोटिक स्पॉट व्हायरस, टोमॅटो क्लोरोटिक स्पॉट व्हायरस, टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस, टोमॅटो यलो फ्रुट रिंग व्हायरस, मेलॉन यलो स्पॉट व्हायरस, टरबुजावरिल सिल्व्हर मोटल व्हायरस, भुईमुगावरिल यलो स्पॉट व्हायरस, मिरची वरिल क्लोरोसिस व्हायरस.

Thrips Lifecycle
Thrips Larva and Egg
Infectious Necrotic Spot Virus
TSWV
Infectious Necrotic Spot Virus
Infectious Nectrotic spot virus
TSWV
onion-thrips
Curlytop Virus
Curlytop
Tomato Chlorotic Spot Virus
Tomato Chlorotic Spot Virus
Tomato Spotted Ring SPot Virus
Tomato Spotted Wilt Virus
Tomato TSWV
Tomato Spotted Wilt
Melon Yellow spot Virus
Infectious Necrotic Spot Virus

Control | नियंत्रणाचे उपाय

रस शोषक किडिंच्या नियंत्रणात खालि बाबी महत्वाच्या ठरतात.

पिकात पिवळ्या, निळ्या स्टिकी पॅड चा तसेच ईनसेक्ट नेट चा वापर करावा. ह्या नंतर देखिल किड नियंत्रणात येत नसेल तर रसायनिक किटकनाशकांचा अवलंब करावा.

रसशोषक किडिंचे नियंत्रण करत असतांना ग्रुप ४ मधिल किटकनाशकांचा एका हंगानात जास्तीत जास्त २ वेळेस वापर करावा.

कोणत्याही ग्रुप मधिल किटकनाशकाचा एका हंगामात ३ पेक्षा जास्त वेळेस वापर करु नये, तसे केल्यास किडीमधे प्रतिकारक शक्ती निर्माण होण्याचा धोका कैक पट वाढतो आणि किड नियंत्रणाबाहेर निघुन जाते.

किटकनाशक निवडतांना ते एक पेक्षा जास्त प्रकारच्या रसशोषक किडिंच्या नियंत्रणात उपयोगी ठरेल ह्या नुसार निवडण्याचा प्रयत्न करावा.

पांढरी माशीचे प्रौढ किटकनाशकांच्या फवारणीतुन नियंत्रणात येत नाहीत. त्यामुळे किडिच्या लहान अवस्थेतच नियंत्रण करावे.

किड पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार हल्ला न करता, तापमान आणि आर्द्रता किडिस अनुकुल असल्यास हल्ला करते हे लक्षात ठेवुन फवारणीचे नियोजन करावे.

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी

ऑरगॅनोफॉस्फेट IRAC Group 1

असिफेट X
ईथिऑन X X
क्लोरपायरीफॉस X X
क्विनालफॉस X
डायमेथोएट
प्रोफेनोफॉस
फॅसोलोन X
फोरेट
मोनोक्रोटोफॉस X

कार्बामेट IRAC Group 1

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
कार्बारिल X
कार्बोफ्युरॉन X
कार्बोसल्फान X X

माईट ग्रोथ ईनहिबिटर IRAC Group 10

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
हेक्झाथयोझॉक्स X X X X

IRAC Group 12

डायफेन्थ्युरॉन
प्रोपायरीगेट X X X X

IRAC Group 13

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
क्लोरफॅनपर X X X X

IRAC Group 15

फ्लुफेनॉक्झ्युरॉन X X X X

IRAC Group 16

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
ब्युप्रोफेनझीन X

IRAC Group 2

फिप्रोनिल X

IRAC Group 20

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
फेनपायरॉक्झिमेट X X X X
फेन्झाक्विन X X X X

IRAC Group 23

स्पायरोमॅसिफेन X X X X

पायरॅथ्रॉईडस IRAC Group 3

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
डेल्टामेथ्रीन X X X X
फेनप्रोप्रॅथ्रीन X X X
परमेथ्रीन X X X
फेनवलरेट X X
बीटा सायफ्लुथ्रीन X X X
बायफेनथ्रीन X X X
लॅम्डासाह्यलोथ्रीन X
सायपरमेथ्रीन X X

नीओनिकोनॉटाईडस IRAC Group 4

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
असिटामॅप्रीड X
ईमिडाक्लोप्रीड X
क्लोथीआनीडीन X
थायमेथॉक्झाम X
थायोक्लोप्रीड X X

स्पिनोसिन्स IRAC Group 5

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
स्पिनोसॅड X X X X

अव्हरमेक्टिन्स IRAC Group 6

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
ईमामोक्टिन बेन्झोएट X X X
मिलबेमेक्टिन X X X X

IRAC Group 7

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
पायरीप्रॉक्झिफेन X X X X

IRAC Group 9

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
फ्लोनीसामिड X

IRAC Group UN

किटकनाशकां तील तांत्रिक घटक तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी
अझाडिरिक्टिन
बायफेनझेट X X X X
डायकोफॉल X X X X
फ्लुमाईट X X X X
फ्लुव्हॅलिनेट X X X
व्हर्टिसिलियम लिकानी X X X X