logo

केळी पिकावरिल झॅन्थोमानोस (विल्ट)

केळी पिकावरिल झॅन्थोमोनास हा रोग मुळांकडुन तसेच फुलांकडुन एक सारख्या प्रमाणात प्रसार पावत असतो. या रोगाच्या प्रादुर्भावासाठी काही प्रमाणात उडणारे किटक ज्यात केळीवरिल मावा कीड, तसेच दंश व करणारी मधमाशी यांचा समावेश होतो, हे कारणीभुत असतात, तसेच दुषित अवजारे व जमिनीतुन देखिल प्रसार होतो. रोग ग्रस्त मुनवे किंवा रोपांच्या लागवडीतुन देखिल या रोगाच प्रसार होतो. पानांवर पिवळसर रंगाचे पट्टे पडतात, जे कालांतराने सुकतात व त्यावर सिगाटोका सारखे पट्टे नसतात. तसेच फळांवर देखिल काळसर रंगांचे जाड पट्टे पडतात. खोडास आडवे चिरले असता त्यातुन पिवळसर रंगांचा द्रव पाझरतांना दिसुन येतो. फळ आडवे चिरले असता त्यातुन देखिल काळसर रंगाचे ठिपके दिसुन येतात. या रोगाच्या लक्षणांची छायचित्रे खालिल प्रमाणे -

केळीवरिल झॅन्थोमोनास रोग- उपाययोजना

केळी वरिल झॅन्थोमोनास रोगाच्या नियंत्रणासाठी केळी पिकावर रोगाची लक्षणे दिसत असतांना कॉपर युक्त बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी. यात कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ग्रॅम प्रती लि., किंवा कॉपर हायड्रॉक्साईड २ ग्रॅम प्रती लि., तसेच सोबत ब्रोमोपॉल २० ते ५० पीपीएम, किंवा स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ६-१२ ग्रॅम प्रती १०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी घेता येईल. शिवाय कॅपटन १.५ ते २ ग्रॅम प्रती लि. देखिल फवारणीतुन घेता येईल. केळी पिकांस जमिनीतुन देखिल कॉपर ऑक्सिक्लोराईड २५० ते ५०० ग्रॅम प्रती १०० खोडांस ड्रिप व्दारे देता येईल.

झॅन्थोमोनास साठी उपयुक्त बुरशीनाशके व त्यांच्या प्रतिकारक शक्ती –

कॉपर ऑक्सिक्लोराईड ग्रुप एम १ स्पर्शजन्य क्रिया कमी प्रतिकारक शक्ती
कॉपर हायड्रॉक्साईड ग्रुप एम १ स्पर्शजन्य क्रिया कमी प्रतिकारक शक्ती
कॅपटन ग्रुप एम ४ स्पर्शजन्य क्रिया कमी प्रतिकारक शक्ती
स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ग्रुप २५ आंतरप्रवाही क्रिया जास्त प्रतिकारक शक्ती

पाने पिवळी पडुन सुकतात
काळसर झालेले फळ, घड बाहेर येतांनांच त्यातील फळे काळी होतात.
खोड आडवे चिरले असता त्यातुन येणारा पिवळा द्रव
फळांवरिल लक्षणे - फळ पिवळे पडते.
पाने पिवळी पडुन सुकणे
फळांतील काळसर डाग