logo

केळी वरिल सिगाटोका

केळी वरिल करपा या सामान्य नावाने ओळखला जाणारा हा रोग मायकोस्पेरेला म्युसिकोला, आणि मायकोस्पेरेला फिजीनिस या बुरशीमुळे होतो. म्युसिकोला जातीमुळे पिवळा सिगाटोका, तर फिजीनिस मुळे काळा करपा होतो. रोगाची लागण अस्कोस्पोआर्स आणि कोनिडीया या स्पोअर्सव्दारे होते. स्पोअर्स पानांच्या खालच्या बाजुने तसेच पानांच्या वरिल बाजुने पानांवर पडल्यानंतर रोगाची जर्म ट्युब तयार करतात. त्यानंतर पानांत प्रादुर्भाव होतो. रोगाच्या वाढीसाठी जास्त प्रमाणातील आद्रता, हलक्या स्वरुपाचे दव पडणे, हलक्या स्वरुपाचा पाऊस, कुपोषित रोप, तसेच गर्दी झालेली लागवड यासारखी परिस्थिती फायदेशिर ठरते.

मोठ्या रोपांच्या तिस-या किंवा चौथ्या पानांच्या खालील बाजुस मध्य शिरेला लागुन पिवळसर ठिपके पडतात. कालांतराने हे ठिपके मोठे होतात, व त्यांचा रंग तपकिरी होतो. काही काळ गेल्यानंतर पानांच्या वरिल बाजुस ठिपके दिसतात, व कालांतराने ते तपकिरी किंवा काळसर बनतात. लहान रोपांच्या पानांवर सहसा गोलसर ठिपके दिसुन येतात, व त्या ठिपक्यांच्या भोवताली तपकिरी रंगाचे हलकेसे वलय दिसुन येते.
केळी पिकाच्या पानांवर लक्षणे दिसण्या च्या 20 ते 70 दिवस अगोदर रोगाची लागण झालेली असते.

ज्या वेळेस रोगाच्या वाढीस पोषक वातावरण असेल त्यावेळेसच बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी. महाराष्ट्रात साधरणपणे अशी परिस्थिती पावसाळ्यात असते, मात्र त्यावेळेस पानांवर काहीच लक्षणे दिसत नसल्याने शेतकरी त्यावर फवारणी घेण्याचे टाळत असतात. रोगाच्या नियंत्रणासाठी शेतात योग्य तेवढीच रोपांची संख्या ठेवावी जेणे करुन शेतात हवा खेळती राहील.

रासायनिक बुरशीनाशके

कॉपर हायड्रॉक्साईड, कॉपर ऑक्सिक्लोराईड, मॅन्कोझेब, मॅनेब, फेनब्युकोनॅझोल, अझॉक्सिस्ट्रोबीन, टेब्युकोनॅझोल, फॉसेटील-ए.एल, फॉस्पोरिक असिड यांचा वापर करावा. कोणतेही बुरशीनाशक 3 पेक्षा जास्त वेळेस वापरु नये.

केळी वरिल सिगाटोका नियंत्रणाचे उपाय

केळी पिकावरिल सिगाटोका नियंत्रणासाठी खालिल प्रमाणे उपाययोजना करावी.

लागवडी नंतर दिवस बुरशीनाशक एफआरएसी कोड प्रतिकारकशक्ती धोका प्रमाण प्रती लि.
२०-३० दिवस कॉपर ऑक्सिक्लोराईड एम १ कमी १.५ ते २ ग्रॅम
३०-६० दिवस क्लोरोथॅलोनिल एम ५ कमी १ ते १.५ ग्रॅम
८०-१०० दिवस हेक्झाकोनॅझोल व मॅन्कोझेब ३ व एम ३ मध्यम व कमी १ ते २ ग्रॅम
१२०-१५० दिवस क्लोरोथॅलोनिल एम ५ कमी १ ते १.५ ग्रॅम
बॅसिलस सबटिलस - - ०.५ ते १ ग्रॅम
१६०-१८० दिवस कॉपर ऑक्सिक्लोराईड एम १ कमी १.५ ते २ ग्रॅम
२१०-२४० दिवस हेक्झाकोनॅझोल व मॅन्कोझेब ३ व एम ३ मध्यम व कमी १ ते २ ग्रॅम
बॅसिलस सबटिलस - - ०.५ ते १ ग्रॅम

केळी पिकावर सिगाटोका ची लक्षणे दिसुन आल्यानंतर देखिल वरिल प्रमाणे क्रमाने आलटुन पालटुन बुरशीनाशकांची फवारणी घेता येईल. वातावरण सिगाटोकासाठी पोषक असतांना वरिल फवारण्या कमी दिवसांच्या अंतराने घ्याव्यात तसेच जमिनीतुन ट्रायक्लाझोल किंवा बावीस्टिन २५० ग्रॅम प्रती १००० खोडांस ड्रिप व्दारे द्यावे. तसेच बॅसिलस सबटिलस चा वापर जमिनीतुन देखिल २०० ग्रॅम प्रती १००० खोडांसाठी ड्रिप व्दारे करावा.

 

 

करप्यामुळे सुकलेले पान
केळी वरिल सिगाटोका
लहान रोपांच्या पानांवर गोलाकार ठिपके
रोग नियंत्रणास कठीण अवस्था
रोगाच्या सुरवातीला पडणारे चट्टे
निरोगी पानांवरिल पक्वतेचे ठिपके हा रोग नाही
सेकंडरी इन्फेक्सन
चट्टे वाढत जावुन मोठे होतात