logo

केळी वरिल बंची टॉप व्हायरस

रोगाची लक्षणे

प्रादुर्भावग्रस्त मातृवृक्षापासुन निपजणा-या रोपांची वाढ खुंटंते. अशा रोपांची पाने विस्तार पावत नाहीत, तसेच पाने जवळ जवळ येतात. पाने रुंदीला तसेच लांबीला लहान असतात. पाने सपाट न राहता, त्यांच्या कडेला लाटा तयार झाल्या सारख्या लहरी तयार होतात. प्रादुर्भाव ग्रस्त मातृवृक्षांच्या पिल्लांना फळ धारणा होत नाही.

प्रौढ वृक्षास लागण झाल्यास पाने बाहेर येतांना अडचण निर्माण होते, पाने जवळ जवळ येतात. केळी पिकांत कॅल्शियम कमतरतेमुळे देखिल पाने जवळ जवळ येतात, मात्र अशी पाने आकारने सर्वसामान्य पानांसारखीच असतात, तसेच पाने सपाट असतात. बंची टॉप लागण ग्रस्त पाने रुंदीला आखुड असतात, व ती आकाशाच्या दिशेला सरळ वाढतात, त्यांचा रंग पिवळसर असतो. लागण ग्रस्त रोपांस फळधारणा होत नाही, जर फळधारणा झालीच तर फळे वाकडी तयार होतात, त्यांचा आकार सर्वसामान्य नसतो.

पानांच्या मुख्य शीरेला लागुन इंग्रजी अक्षर – जे – आकाराचे हुक तयार होतात जे पिवळसर रंगाचे असतात. बंची टॉप रोगाची लागण होतांना पानांच्या तळाकडील भागात, मुख्य शिरेला लागुन, मोर्स कोड (तार पाठवितांना वापरला जाणारा कोड) सारखे अत्यंत लहान आकारचे ठिपके किंवा रेषांपासुन बनलेल्या सुक्ष्म रेषा तयार होतात. या रेषा गडद हिरव्या रंगाच्या असतात.

बंची टॉप व्हायरस ची लागण आणि प्रसार हा केळी पिकावरिल मावा किडी मुळे होतो. रोगाच्या नियंत्रणासाठी मावा किडीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.
केळी वरिल मावा किड ही चमकणारी, लालसर, गडद तपकिरी किंवा काळसर रंगाची किड आहे, प्रौढ मादी दिवसाला 4 पिल्लांना जन्म देते, जिवन कालात 14 पिल्लांना जन्म देते. या किडीच्या 7 ते 10 पिढ्यांना पंख नसतात, त्यानंतर तयार होणा-या पिढींस पंख असतात. पंख असलेले प्रौढ सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते अंधार होई पर्यंत उडतात. ही किड वसाहत तयार करुन राहते. केळीच्या पानांच्या देठावर, कोवळ्या पानांवर मावा किडीची अनेक पिल्ले व प्रौढ दिसुन येतात.

केळी वरिल बंची टॉप नियंत्रणाचे उपाय

केळी पिकाची रोपांव्दारे किंवा बेण्यांव्दारे (मुनव्यांव्दारे) लागवड होणार असेल तर लागवडी पुर्वी पोटॅशियम सिलिकेट (२ टक्के द्रावण) प्रती लि. १ मिली घेवुन रोप किंवा बेणे त्यात ५ ते १० मि. बुडवुन त्यानंतर लागवड करावी. रोप बुडवुन लागवड करणे शक्य नसल्यास रोपांस पहिले पाणी देतांना त्यात प्रती १००० खोडासाठी पोटॅशियम सिलिकेट (२ टक्के द्रावण) २५० मिली ते ५०० मिलि ड्रिप व्दारे द्यावे.

केळी वरिल मावा किडी मुळे या रोगाचा प्रसार होत असल्याने मावा किडिच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट, इमिडाक्लोप्रिड, असिटामॅप्रिड, थायमेथॉक्झाम वै. मावा नाशकांची फवारणी आलटुन पालटुन घ्यावी. रोग ग्रस्त रोपे शेतीतुन बाहेर काढावीत.

 

मारेस कोड सारखे बारीक ठिपक्यांनी बनलेल्या रेषा
बंची टॉप ची लागण मावा किडी मुळे होते.
पंख असलेली 8 वी पिढी
प्रादुर्भाव ग्रस्त पाने सरळ वाढतात व पिवळसर असतात
लागण ग्रस्त लहान रोप, पाने आकाशाच्या दिशेने वाढतात.
केळी वरिल मावा किडीची वसाहत
पानांच्या देठावर देखिल मोर्स कोड दिसुन येतो.
कोवळ्या पानांवरिल मावा
जवळ जवळ पाने येतात.
पानांची रुंदी कमी दिसुन येते.
पाने सपाट न राहता त्यांच्या किनारी लाटा दिसुन येतात.
इंग्रजी अक्षर - जे - आकाराचे पट्टे मुख्य शिरेला लागुन