logo

ककुंबर मोझॅक व्हायरस

लक्षणे

  • ◉ मावा किडीमुळे पसरणारा हा व्हायरल रोग आहे.
  • ◉ या रोगाची लक्षणे नविन पानांवर प्रथम दिसुन येतात.
  • ◉ पानांचा आकार लहान होतो तसेच पानांवर लाटांसारखे पिवळसर, तपकिरी काळे पट्टे हे मुख्य शीरेला समांतर पडतात.
  • ◉ या रोगाच्या नियंत्रणासाठी मावा किडीचे नियंत्रण आधी पासुनच करावे.

मावा किड नियंत्रण

  • ◉ लागवडीनंतर १-२ पान अवस्थेत इमिडाक्लोप्रीड १७.५ टक्के ०.७५ मिली प्रती लि. , किंवा अँसिटामॅप्रिड ०.७५ ग्रॅम, किंवा थायमेथॉक्झाम ०.५ ग्रॅम प्रती लि. पाण्यातुन फवारणी करावी.
  • ◉ त्यानंतर डायमेथोएट २ मिली ची फवारणी ७ ते १५ दिवसांनी घ्यावी.
  • ◉ मावा किडी चे पंख असलेले प्रौढ जर शेतात उडतांना दिसत असतिल तर वरिल दोन फवारणी घेत असतांनाच त्यासोबत डायक्लोरोव्हॉस १.५ मिली, किंवा क्लोरोपायरीफॉस २ मिली घ्यावे.
  • ◉ सदरिल फवारणी आलटुन पालटुन दोन किंवा तिन वेळेस घेता येण्यासारखी आहे.
  • ◉ जमिनीतुन किटकनाशकांचा वापर फायदेशिर ठरत नाही.
  • ◉ रोगग्रस्त रोपे काढुन नष्ट करावीत.

 

ककुंबर मोझॅक व्हायरस
ककुंबर मोझॅक व्हायरस
ककुंबर मोझॅक व्हायरस