logo

Banana Weed Management / तण व्यवस्थापन

 

तणनाशकाचे तांत्रिक नांव व केव्हा वापरावे उत्पादक कंपनी किंवा व्यापारी नांव अधिक माहीती
डायुरॉन डायुरेक्स उगवणीपुर्वी आणि उगवणीनंतर वापरता येते. केळी पिकाच्या पानांवर तसेच खोडावर पडणार याची काळजी घ्यावी.
ग्लायफोसेट ग्लायसेल केळी लागवडीपुर्वी शेत तयार करतांना वापर करावा. शेतास पाणी देवुन तण उगवुन घ्यावे. उगवुन आलेल्या तणांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. अधिक परिणांमासाठी ग्लायफोसेट पाण्यात मिसळण्याच्या अगोदर अमोनियम सल्फेट पाण्यात टाकुन मिसळुन घ्यावे. गवत ७ ते १४ दिवस कापुन काढु नये. केळी पिकाच्या पानांवर तसेच खोडावर पडणार याची काळजी घ्यावी.
ऑक्सिफ्लोरफेन गोल रुंद पान वर्गिय तणांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त. केळी पिकाच्या पानांवर तसेच खोडावर पडणार याची काळजी घ्यावी.
पॅराक्वेट ग्रामोक्झोन केळी पिकांतील सर्वच तणांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. केळी पिकाच्या पानांवर तसेच खोडावर पडणार याची काळजी घ्यावी.

केळी पिकांत तणनाशकांचा वापर हा तणनाशक बनविणा-या कंपनी च्या तांत्रिक प्रतिनिधीशी संपर्क करुन त्यांच्या मार्गदर्शना खालीच करावा.

केळी पिकावर कोणत्याही अवस्थेत पिक असतांना तणनाशकांचा वापर हा पिकासाठी अत्यंत धोकेदायक ठरतो. त्यामुळे या पिकास तणनाशकांचा वापर करण्याची शिफारस आमच्या वतिने करण्यात येत नाही. केळी पिकातील तणनाशके जरी याठिकाणी माहीती स्वरुपात दिलेली असली तरी देखिल केळी पिकाच्या पानांवर जरासे जरी तणनाशक उडाले तरी ते पिकाची कधीही भरुन निघणार नाही असे नुकसान करते, त्यामुळे या पिकात तणनाशक पुर्णतः स्वतःच्या जबाबदारीवर आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच वापरावे.
केळी पिकात तणनाशकांचा वापर करुच नये हेच आम्ही सुचित करत आहोत.