logo

बुरशींच्या वाढीवर परिणाम करणारे घटक

१. सामु (pH) –

अनेक बुरशी ह्या ३ ते ७ च्या दरम्यान सामु असला तर त्या मर्यादेत उत्तम वाढतात. काही बुरशी, जसे अँस्परगिलस फ्लॅव्हस, पेनिसिलियम फ्युनिक्युलोझम सामु २ असला तरी देखिल त्यात वाढु शकतात. बुरशी त्यांच्या वाढीच्या काळात त्यांच्या आसपासचा सामु बदलत असल्या कारणाने बुरशीच्या वाढीसाठी नक्की किती सामु गरजेचा असतो हे सांगणे कठिण आहे. बुरशी त्यांच्या परिस्थितीनुसार सामु बदलत असल्या कारणाने त्या काही प्रमाणात, गरजेपेक्षा कमी किंवा अधिक जरी सामु असला तरी त्यात हवा तसा बदल घडवुन आणण्याची क्षमता ठेवतात. तरी साधारणतः आपण अस नक्की म्हणुन शकतो की, बुरशी सहसा आम्लधर्मिय (अँसेडिक) सामु मध्ये जास्त चांगल्या प्रकारे वाढतात.

२. पाणी किंवा आर्द्रता –

बुररशीच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात म्हणजेच स्पोअर्स रुजण्याच्या काळात पाण्याची किंवा आर्द्रतेची गरज ही जास्त असते. बुरशीच्या रुजण्याच्या काळात, स्पोअर्स त्याच्या सभोवताली असलेले पाणी ग्रहरण करुन फुगतात, आणि त्यांच्या तील रुजण्याच्या प्रक्रियेस चालना मिळते. त्यांनंतर जेव्हा बुरशीच्या हायपी ह्या होस्ट च्या आत वाढतात आणि बुरशीच्या पुर्नउत्पादनाचा काळ असतो त्यावेळेस कमी प्रमाणात आर्द्रता असली तर बुरशीसाठी तयार झालेले स्पोअर्स दुरवर हवे व्दारे वाहुन नेणे सोपे जाते. बुरशीच्या वाढीसाठी ७५ ते ९० टक्के आर्द्रता असणे फायदेशीर ठरते.

३. हवा –

या ठिकाणी हवा असे संबोधण्याऐवजी ऑक्सिजन असे संबोधण जास्त योग्य ठरले असते. बुरशी ह्या अरोबिक म्हणजेच ऑक्सिजनच्या उपस्थितीत वाढणा-या असतातस तशाच त्या ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत वाढणा-या देखिल असतात. काही बुरशी ह्या ऑक्सिजन ची गरज असेल मात्र तो उपलब्ध नसेल तर त्याच्या अनुपस्थितीत देखिल वाढतात.

इंटरनॅशनल बायोटेक्नोलॉजी सेंटर, मॉस्को स्टेट युनिर्व्हसिटी, मॉस्को येथील काही शास्रज्ञांनी जमिनीत भरपुर प्रमाणत पाणी साचुन राहीलेले असतांना कोणत्या प्रकारच्या बुरशी वाढतात याचा अभ्यास केला. त्यांनी कृत्रिम रित्या देखिल ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत कोणत्या प्रकारच्या बुरशी वाढतात ह्याचा अभ्यास केला. त्यांना असे आढळुन आले की, फ्युजॅरियम सोलानी, फ्युजॅरियम ऑक्झिस्पोरियम, ट्रायकोडर्मा व्हिरिडे, ट्रायकोडर्मा हरजॅनियम, ट्रायकोडर्मा अरोव्हिरिडे, ट्रायकोडर्मा पॉलीस्पोरम, ट्रायकोडर्मा कोनिंगी ह्या बुरशी फॅकलटेटिव्ह अँरोबिक म्हणजेच ऑक्सिजनच्या अनुसपस्थितीत तसेच उपस्थितीत देखिल वाढण्याची क्षमता ठेवतात. तपासल्या गेलेल्या एकुण बुरशींच्या संख्येत ह्या बुरशींची संख्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात आढळुन आली होती. तर पॅसिलोमायसिस लिलासिनस, व्हर्टिसिलियम लिकानी ह्यांची संख्या ७ टक्के पेक्षा कमी प्रमाणात आढळुन आली होती.

४. रासायनिक खते व सेंद्रिय कर्ब –

जमिनीत असलेल्या सेंद्रिय पदार्थांतुन बुरशींना त्यांच्या वाढीसाठी गरजेचा असलेला सेंद्रिय कर्ब मिळत असतो. ज्यावेळेस जमिनीत जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असतात अशा वेळेस जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजविणा-या बुरशींची संख्या ही जास्त प्रमाणात वाढते. आपण आधीच बघितले आहे की, बुरशी ह्या वनस्पती जन्य सेंद्रिय पदार्थांना कुजविण्यात जीवाणंपेक्षा जास्त प्रमाणात सक्षम ठरतात.

पिकाच्या मुळांव्दारा स्रवले जाणारे सेंद्रिय कर्ब हे मुळांच्या सभोवताली वाढणा-या बुरशींसाठी उत्तम असा सेंद्रिय कर्बाचा स्रोत म्हणुन कार्य करतात. जमिनीत असलेल्या अन्नद्रव्यांच्या उपल्धतेनुसार आणि पिकाच्या प्रकारानुसार, पिकाच्या मुळांव्दारा किती प्रमाणात सेंद्रिय कर्ब जमिनीत सोडला जात असतो ह्याचा परिणाम जमिनीतील मुळांच्या परिसरात वाढणा-या बुरशींवर होत असतो. (Singh and Pandey 2003).

रासायनिक खतांतुन मिळणा-या नत्रामुळे देखिल बुरशींच्या वाढीस चालना मिळते. जमिनीतील कमी असलेल्या फॉस्पफोरस (स्फुरद) चा बुरशीच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. बुरशीच्या वाढीत नत्र, स्फुरद आणि सेंद्रिय पदार्थ हे फायदेशीर ठरतात.

जास्त प्रमाणात रासायनिक पदार्थ जमिनीत टाकले गेल्यास त्यांचा मात्र बुरशींच्या वाढीवर विपरित परिणाम होत असतो.

५. रासायनिक बुरशीनाशके –

बुरशी ह्या युकॅरियोटिक गटातील पेशींपासुन बनलेल्या असतात हे आपण बघितले आहे. बाजारात उपलब्ध असणारी बुरशीनाशके ही बुरशी गटातील सर्वच बुरशींना मारण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे उपयुक्त बुरशींचा वापर करत असतांना, रासायनिक बुरशीनाशकांचा वापर हा किमान ५ ते १० दिवस करु नये.