logo

हळद | Turmeric

 •   लिफ ब्लॉच   

  ह्या रोगात पानांवर शिरांना समांतर असे ओळीत तपकिरी रंगाचे, गर्द तपकिरि रंगाचे डाग पडतात. डाग पानांच्या खालच्या बाजुने देखिल दिसुन येतात. हा रोग साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर पासुन जास्त प्रमाणात आढळुन येतो. हा रोग Taphrina maculans ह्या बुरशीमुळे होतो. रोगाच्या वाढीसाठी आर्द्रतायुक्त वातावरण पोषख ठरते.

  पानांवरिल ठिपके (Colletotrichum capsici)   

  पानांवर ४ ते ५ सें.मी. लांब आणि २ ते ३ सें.मी. रुंद असे अंडाकृती डाग पडतात. डागांच्या आतिल रंग हा करडा, किंवा हलका पिवळा असा असतो. डागांस पिवळ्या रंगाची किनार असते. २१ ते ३० डि.से. तापमान आणि ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात असलेली आर्द्रता रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरते. हा रोग हळद पिकावर पावसाळ्यानंतर ऑक्टोबर ते नोव्हेंबर नंतर जास्त प्रमाणात आढळुन येतो. रोगाची लागण झाल्यानंतर रोगग्रस्त भाग हा पुर्णपणे वाळलेला देखिल आढळुन येतो.

  कंद सड किंवा रायझॉम रॉट (Pythium graminicolum)   

  ह्या बुरशीमुळे हा रोग होतो. रोगाच्या सुरवातीच्या लक्षणात पिकाची पाने कडेने वाळत जातात, तसेच रोपाचा कॉलर चा भाग हा पाणथळ होतो. कंदावर लागण झाल्यामुळे कंद देखिल कुजतात. ह्या रोगाची लागण झालेल्या कंदास घाणेरडा असा वास येत नाही, ह्याच्या विपरित जीवाणू जन्य कुज किंवा सड असल्यास त्यांस घाणेरडा वास येतो. ह्या रोगात पिकाची पाने पिवळी पडतात, रोगाची लागण जास्त प्रमाणात असल्यास रोप कॉलर रिजन पासुन मरुन पडते. शेतात जास्त प्रमाणात पाणी साचुन राहिल्यास रोगाची लागण वेगात होते. रोगाच्या वाढीसाठी ३० डि.से. पेक्षा जास्त तापमान पोषक ठरते.

  Agriplaza, Turmeric Crop information, farming information in marathi