logo

संजीवकांचे कार्य

डाळींब पीकवाढीच्या प्रत्येक अवस्थेमध्ये मुख्य अन्नद्रव्य, सुक्ष्म अन्नद्रव्य यांचा जसा महत्वपूर्ण वाटा असतो तेवढाच संजीवकांचाही असतो. डाळींब पिकासाठी संजीवकांचा वापर हा फवारणीच्या माध्यमातून केला जातो. पानांच्या माध्यमातून संजीवके पिकात शोषली जाऊन त्यांचा परिणाम लवकर मिळू शकतो. संजिवके निर्माण करण्याची क्षमता निसर्गत: पिकात असते, त्यासाठी जमिनीची उपजक्षमता परिणामकारक असणे आवक्ष्यक असते. झाडांमध्ये संजीवके ही जमिनीचा सामू, जिवाणूंची संख्या, सेंद्रिय कर्ब व नत्राचे प्रमाण यांच्यामुळे निर्माण होण्यास मदत होते.

डाळींब पिकासाठी उपयुक्त संजीवके –

संजीवके (Harmons) सक्रिय घटक फवारणीचा कालावधी प्रमाण पिकाची अवस्था
वाढ रोधक इथेफॅन झाडास ताण बसण्यास चालना देण्यासाठी १०० लि. पाण्यासाठी ५० ते १०० मि.लि. ताणाची अवस्था
आक्झिन्स अल्फा नॅप्थील अँसेटिक असिड पाणी लावल्यानंतर १ ते दीड महिन्याने १०० लि. पाण्यासाठी १० ते २५ मि.लि. फुलोरा अवस्था
जिबेरॅलिन्स प्रोजीब (GA) पाणी लावल्यानंतर २ ते अडीच महिन्यांनी १०० लि. पाण्यासाठी अर्धा ते चार ग्रॅम निंबू आकाराची अवस्था
सायटोकायनिन्स 6-BA पाणीलावल्यानंतर ३ ते साडेचार महीन्यांनी १०० लि. पाण्यासाठी १०० मि.लि. पेरू आकाराची अवस्था
वाढनियंत्रण क्लोरोमेक्वाट क्लोराईटड पाणी लावल्यानंतर ५ ते ६ महिन्यांनी १०० लि. पाण्यासाठी १५० मि.लि. पक्वतेची अवस्था

पालवीची वाढ रोखणे व कार्यक्षमता वाढविण्याच्या फवारण्या

कालावधी संजीवक/अन्नद्रव्ये फवारणीचा हेतू
डाळींबाची फळे लिंबाएवढी असताना पालवी फुटल्यास वाढनियंत्रण (सीसीसी) झाडाची फाजील वाढ रोखण्यासाठी
पहिला फवारणीनंतर ७ ते १० दिवसांनी मुख्य अन्नद्रव्य – 00:52:34 पालवी परिपक्व होण्यासाठी
दुस-या फवारणीनंतर ७ ते १० दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्य + अमिनो अँसिड पालवीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी