logo

द्राक्ष घडावरिल विविध प्रकारची कुज

agriplaza, agriculture information, farming, grapes

बोट्रायटीस किंवा कुज हा रोग द्राक्षवेलीवरील पाने, व घडांवर दिसुन येतो. तसेच हा रोग वेलीच्या शेंड्यांवर देखिल दिसुन येतो. या रोगांस ग्रे-मोल्ड किंवा पानांवर तसेच शेंड्यावर व फुलो-यातील घडावर आल्यास त्यांस ब्लाईट म्हणुन देखिल संबोधतात.

रोगाची बुरशी जुन्या किंवा मेलेल्या फांद्या, पाने तसेच इतर अवषेशांवर वास करते.

हा रोग वेलीच्या शेंड्याकडील पानांवर दिसुन येतो, तसेच फुलो-यातील घडावर देखिल दिसुन येतो.

घड परिपक्व झाल्यावर दिसणारी लक्षणे सर्वश्रुत अशीच आहेत, मात्र घड लहान असतांना त्यावर सतत पाणी साचुन राहील्यास या रोगाची लागण होते, या रोगाच्या नियंत्रणासाठी, बॅसिलस सबटिलिस, इप्रिडीऑन, कॅपटन, मॅन्कोझेब ची शिफारस केली गेली आहे.

फवारणी करतांना घडावर तसेच टोकाकडील पानांवर पुर्णपणे फवारणी होईल याची काळजी घ्यावी. यादीत दिलेल्या रोगांच्या व्यतीरिक्त अग्युलर लिफ स्कॉर्च हा रोग देखिल द्राक्ष वेलींवर दिसुन येतो. बोटट्रायटीस सारखं हा रोग मण्यांवर न येता घडाच्या देठावर व काडीवर दिसुन येतो.

गुणधर्म ब्लॅक रॉट अग्युलर लिफ स्कॉर्च बिटर रॉट बोटट्रायटीस
घड वाढीचा काळ परिपक्व किंवा रंग बदलण्याची अवस्था केवळ घडाच्या काडीवर देठावर दिसुन येतो. घड अपरिपक्व किंवा हिरवा असतांना फुलोरा अवस्थेपासुन तर काढणी नंतर देखिल
मण्यांवरिल लक्षणे तपकिरी, पाणी शोषुन घेतल्यासारखे ठिपके घडाची काडी व फांद्या सुकतात.(अशा काड्या ज्यांना मणी येतात) लहान आकाराचे, गोलसर पांढुरके पट्टे ज्यांच्या भोवताली तपकिरी रींग तयार होते. सुरवातीच्या काळात प्रादुर्भाव ग्रस्त मणीच्या खालील भाग नरम होतो व त्यातुन आतला गर निघतो.
काडीवरील, पानांवरिल लक्षणे पानांवर लालसर तपकिरी रंगांचे पट्टे दिसुन येतात. पाने सुरवातीला शिरांमधील भागात पिवळ्या होतात व नंतर तपकिरी होतात. जुन्या पानांवर जास्त प्रमाणात लक्षणे दिसुन येतात. पानांवरिल शिरांच्या बाजुला पाणी शोषुन घेतल्या प्रमाणे पट्टे पडतात, व असे पट्टे सुरवातीला पांढरे असतात व त्यानंतर तपकिरी होतात. काडीची वाढ खुंटते व ती सुकुन जाते. बुरशी शेंड्यावर किंवा फुलो-यावर हल्ला करते, ज्यामुळे गळ होते.
हवामान सतत पानांवर पाणी साचुन राहणे गरजेचे आहे. सतत पावसाळा, व आद्रता बुरशीचे स्पोअर्स उबदार, आद्रता, व पावसामुळे तयार होतात, व पावसामुळे पसरतात. फुलोरा काळात पावसाचे वातावरण व 15 ते 20 डिग्री तापमान, 90 टक्के आद्रता.
नियंत्रण बोड्रो मिश्रण, कॉपर युक्त बुरशीनाशके.   रोव्हरॉल, बेकॉर, थायोफिनाईट मिथाईल मॅन्कोझेब, कॅपटन, बॅ.सबटीलीस, रोव्हरॉल