logo

Tomato Spotted Wilt Virus (TSWV)| टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस

हा व्हायरस अनेक पिकांवर दिसुन येतो. फुलकिडे (थ्रिप्स) व्दारा ह्या व्हायरस चा प्रसार होतो. पुलकिड्यांची अळी (निफ्फल) अवस्थेत किड व्हायरस चा चार्ज घेते, त्यानंतर प्रौढ अवस्थेत पिकास व्हायरस ची लागण मोठ्या प्रमाणावर होते.

हा व्हायरस पर्सिस्टंट पध्दतीने प्रसार पावतो. या पध्दतीत किडिने एकदा व्हायरस चा चार्ज ग्रहण केल्यानंतर त्या किडीस एकदा व्हायरस पिकात संक्रमित केल्यानंत पुन्हा व्हायरस चा चार्ज घेण्याची गरज भासत नाही. त्यामुळेच हा रोग नियंत्रणात आणणे जास्त कठिण असते.

फुलकिड्यामुळे पसरणारा हा व्हायरस ढोबळी मिरचीच्या व्यतिरिक्त तंबाखु, भुईमुग, टोमॅटो, बटाटा, वांगी, चवळी, बिन्स, काकडी, फुलकोबी, सिलेरी, पालक आदी पिकांवर देखिल दिसुन येतो.
Tomato Spotted Wilt Virus
Tomato Spotted Wilt Virus

उबदार वातावरण असल्यास थ्रिप्स चा प्रादुर्भाव देखिल मोठ्या प्रमाणावर वाढतो, अशा परिस्थितीत किडीचे नियंत्रण त्वरीत करणे गरजेचे असते. ह्या रोगाच्या लक्षणात पिकाची पाने आकुंचन पावतात, पानांच्या शीरा जाड होतात, तसेच खोडावर लेट ब्लाईट सारखे काळसर तपकिरी पट्टे देखिल दिसुन येतात.