logo

ढोबळी मिरची पिकाचे खत व्यवस्थापन

ढोबळी मिरची पिकाच्या फळ वाढीच्या काळात अमोनिकल स्वरुपातील नत्राच्या वापरातुन फळांच्या वजनात आणि आकारात घट दिसुन आल्याची नोंद हेक्टर मात्री आणि हॅरि मिल्स ह्या शास्रज्ञांना घेतली आहे. ढोबळी मिरची पिकास १:१ ह्या प्रमाणात अमोनिकल आणि नायट्रेट रुपातील नत्राचा पुरवठा केला असता नायट्रेट रुपातील नत्राचे शोषण जास्त प्रमाणात केले जाते. फळ पोषणाच्या काळात अमोनिकल रुपातील नत्राचा वापर टाळला असता ढोबळी पिकापासुन केवळ ह्या एका बदलामुळे जास्त उत्पादन मिळु शकते का ह्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

ढोबळी मिरची पिकाच्या खत व्यवस्थापनाशी निगडित अनेक प्रयोगातील सरासरी नुसार प्रती १००० किलो (१ मे.टन) उत्पादनासाठी पिकाव्दारा

३ ते ३.५ किलो नत्र,

०.७ ते १ किलो स्फुरद, आणि

५ ते ६ किलो पालाश

अन्नद्रव्याचे शोषण केले जाते.

त्या सोबत १.२३ ते १.५ किलो कॅल्शियम,

आणि १.१५ ते १.७ किलो मॅग्नेशियम

चे शोषण केले जाते.

अमोनिकल रुपातुन नत्राचा पुरवठा करण-या खतांत १२-६१-०० ह्या विद्राव्य खताचा समावेश होतो, तसेच अमोनिमय सल्फेट ह्या नत्रयुक्त खताचा समावेश होतो.

शिवाय ज्या मातीत झिंक ह्या सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असते त्या जमिनीतील रोपांस मर रोगाचा जास्त प्रार्दुभाव होतो. ढोबळी मिरची पिकास लागवडी पुर्वी १० ते १५ किलो झिंक सल्फेट (२१ टक्के) ह्याचा बेसल डोस मधे वापर केला असता, मातीतील झिंक चे प्रमाण वाढण्यात मदत मिळते. ऑक्साईड रुपातील खतांच्या वापरातुन मातीचा पी एच (सामु) वाढण्यात मदत मिळत असल्या कारणाने त्यांचा वापर शक्यतो टाळावा.

ढोबळी मिरची लागवडीपुर्वी बेड तयार करत असतांना ते सुत्रकृमी मुक्त अशा सेंद्रिय पदार्थ आणि माती ह्यांच्या वापरातुनच तयार करावे. बेड तयार करतांना त्यात प्रती एकर ह्या नुसार गांडुळ खत ५०० ते १५०० किलो, निंबोळी पेंड ५०० ते ७५० किलो, करंज पेंड १०० ते २०० किलो, पुर्णपणे कुजलेले शेणखत १ ते ४ टन, काही प्रमाणात कोकोपिट ५०० किलो (माती जास्त प्रमाणात काळी असेल तर) तसेच कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०० ग्रॅम आणि फिप्रोनील दाणेदार २ किलो ह्यांचा वापर करुन तयार करावेत. बेड हा पाण्याचा निचरा कऱण्यात सक्षम असावा तसेच तो रोग व किडिंना थारा देणारा नसावा.

लागवडी पुर्वी बेड मधे सिंगल सुपर फॉस्फेट २५० ते ३०० किलो, एम.ओ.पी. ५० ते ७५ किलो आणि झिंक सल्फेट १०-१५ किलो, फेरस सल्फेट १० किलो ह्यांचा वापर करावा. बेड तयार करत असतांना वापरलेली हि खते पिकास दिर्घकाळापर्यंत अन्न पुरवठा करतात, तसेच बेड ची अन्नद्रव्य क्षमता देखिल वाढवुन त्या बेड ला सुपिक बनवितात.

ओपन फिल्ड मधे लागवड करत असतांना देखिल वर सुचविल्या प्रमाणे सिंगल सुपर फॉस्फेट वै. खतांचा वापर करावा.

सेंद्रिय पध्दतीने किंवा कमी खर्चाची शेती पध्दतीनुसार लागवड करत असतांना, ती शेड नेट किंवा पॉली हाऊस मधे जर केली जात असेल तर त्या ठिकाणी बाहेरुन आणलेल्या मातीपासुन बेड तयार न करता ते स्थानिक शेतातील मातीच्याच वापरातुन तयार करावेत. बेड तयार करत असतांना त्यात शेणखताचे आणि गांडुळ खताचे प्रमाण १.५ ते ३ पट वाढवुन घ्यावे. शेणखत कोणत्याही पध्दतीत वापरत असतांना ते पुर्णपणे कुजलेलेच वापरावे, अर्धवट कुजलेले शेणखत वापरले असता त्यापासुन रोपांची मर मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका असतो, तसेच हुमणी, सुत्रकृमी, आणि ईतर किडिंचा देखिल हल्ला अत्यंत मोठ्या प्रमाणावर होण्याचा धोका असतो. सर्वच प्रकारची सेंद्रिय उत्पादने वापरत असतांना ती खात्रीशीर स्रोतांकडुनच खरेदी करुन वापरावीत. एक चुक कधिही न सुटणा-या प्रश्नांना देखिल तयार करुन ठेवु शकते. सेंद्रिय पध्दतीने लागवडीत रोपांची संख्या कमी करणे महत्वाचे ठरते.

पिकासाठी माती आणि पाणी हे दोन सर्वात मोठे असे अन्नद्रव्यांचे स्रोत आहेत. पिकासाठी वापरल्या जाणा-या पाण्यातील अन्नघटकांचे जसे नत्र, स्फुरद, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम ह्यांचे प्रमाण माहीत करुन घेणे गरजेचे आहे. पाण्यातुन पिकास मिळणा-या खतांचे प्रमाण हे सर्वाधिक असते. साधरणपणे केवळ १० पीपीएम जरी नायट्रेट नायट्रोजन पाण्यात असला तरी एक एकर क्षेत्रात दर तासाला १८० ग्रॅम नायट्रेट पिकास फुकट मिळत असतो.

शिवाय पिकासाठी वापरल्या जाणा-या पाण्यात जर कॅल्शियम चे प्रमाण जास्त असेल आणि ते माहीत नसतांना खत व्यवस्थापन केले गेले असेल तर पिकांस पुरेसा पालाश देवुन देखिल त्या पिकावर पालाश ची कमतरता दिसते.

शिवाय पिकासाठी वापरल्या जाणा-या पाण्यात जर कॅल्शियम चे प्रमाण जास्त असेल आणि ते माहीत नसतांना खत व्यवस्थापन केले गेले असेल तर पिकांस पुरेसा पालाश देवुन देखिल त्या पिकावर पालाश ची कमतरता दिसते. त्यामुळे कॅल्शियम खतावर केलेला खर्च देखिल अतिरिक्त ठरतो. कॅल्शियम हे केवळ उदाहरण आहे, नायट्रेट रुपातील नायट्रोजन मुळे उद्भवाणा-या समस्या ह्या अजुन वेगळ्या स्वरुपाच्या असु शकतात.

विद्राव्य खतांतुन पिक संगोपन

पुर्नलागवडीनंतर दिवस खताचा प्रकार प्रमाण प्रती एकर
५ दिवस १९-१९-१९ ५ किलो
१२ दिवस १९-१९-१९ ५ किलो
मिक्स मायक्रोन्युट्रिएंट २ किलो
१९ दिवस १२-६१-०० ५ किलो
युरिया १० किलो
२६ दिवस १२-६१-०० ५ किलो
कॅल्शियम नायट्रेट १० किलो
सोल्युबोर २५० ग्रॅम
३३ दिवस १३-४०-१३ ५ किलो
४० दिवस १२-६१-०० ५ किलो
४७ दिवस १३-००-४५ ५ किलो
ईडिटिए झिंक ५०० ग्रॅम
ईडिडिएचए फेरस ५०० ग्रॅम
मॅग्नेशियम सल्फेट १० किलो
५४ दिवस १२-६१-०० ५ किलो
एस.ओ.पी. २५ किलो
६१ दिवस १२-६१-०० ५ किलो
बोरॉन २५० ग्रॅम
६८ दिवस १२-६१-०० ५ किलो
ईडिटिए झिंक ५०० ग्रॅम
ईडिडिएचए फेरस ५०० ग्रॅम
७५ दिवस १३-००-४५ ५ किलो
मॅग्नेशियम सल्फेट १० किलो
८२ दिवस १३-००-४५ ५ किलो
८९ दिवस १२-६१-०० ५ किलो
कॅल्शियम नायट्रेट १० किलो
बोरॉन ५०० ग्रॅम
९६ दिवस युरिया १० किलो
एस.ओ.पी. २५ किलो
१०३ दिवस १३-४०-१३ ५ किलो
ईडिटीए झिंक ५०० ग्रॅम
ईडिडिएचए फेरस ५०० ग्रॅम
११० दिवस १२-६१-०० ५ किलो
११७ दिवस १३-००-४५ ५ किलो
१२४ दिवस १३-००-४५ ५ किलो
मॅग्नेशियम सल्फेट १० किलो
१३१ दिवस ००-५२-३४ ५ किलो
१३८ दिवस ००-५२-३४ ५ किलो
१४५ दिवस १२-६१-०० ५ किलो
००-००-५० ५ किलो
मॅग्नेशियम सल्फेट १० किलो
१५२ दिवस १३-००-४५ ५ किलो
कॅल्शियम नायट्रेट १० किलो
बोरॉन २५० ग्रॅम
१५९ दिवस १२-६१-०० ५ किलो
१६६ दिवस ००-५२-३४ ५ किलो
१७३ दिवस १२-६१-०० ५ किलो
१८० दिवस १३-४०-१३ ५ किलो

वरिल खतांच्या शेड्युल मधुन पिकास ३५ किलो नत्र, ७२ किलो स्फुरद आणि ७४ किलो पालाश अन्नद्रव्य मिळते. (मातीच्या स्थितीनुसार बदल संभव)

अंदाजे खर्च हा रु. ३६००० ते ४०००० प्रती एकर असा येवु शकतो. ह्या ठिकाणी वापरण्यात येणा-या उत्पादनांचे सरासरी किंवा थोडे जास्त प्रमाणात रेट गृहीत धरण्यात आलेले आहेत, प्रत्यक्षात यात वाढ किंवा घट होवु शकते.

वरिल खतांच्या शेड्युल नुसार ढोबळी मिरची पिकाव्दारा प्रती १ मे.टन उत्पादनासाठी जितके अन्नद्रव्य जमिनीतुन वापरले जाते, त्याच्याशी तुलना केली असता. ह्या शेड्युल मध्ये फॉस्फोरस चे प्रमाण हे जास्त होत आहे. ढोबळी मिरची पिकाव्दारा १ मे.टन उत्पादनासाठी ३ किलो नत्र, ०.७ किलो स्फुरद आणि ५ किलो पालाश गरजेचा असतो असा जरी हिशेब केला तरी वरिल शेड्युल च्या वापरातुन १० ते १६ टन उत्पादन प्रती एक एकर क्षेत्रातुन मिळु शकते. पॉली हाऊस, शेडनेट यात असलेल्या वातावरणामुळे उत्पादनात १.५ ते २ पट वाढ होवु शकते.

अंदाजे खर्च हा रु. ३६००० ते ४०००० प्रती एकर असा येवु शकतो.

रु. ४०००० ईतका खर्च जर गृहीत धरला आणि अंदाजे १२ टन उत्पादन गृहित धरुन सरासरी रेट १० रु. प्रती किलो ईतका असला तर खतांच्या खर्चाशी मिळकतीची तुलना करता Cost : Benefit Ratio ३ ते ३.३२ ईतका येतो. हा रेशो केवळ जमिनीतुन देण्यात आलेल्या खतांचा असुन, त्यात लागवड, बियाणे, फवारणीचा खर्च समाविष्ट नाही तसेच ईतर खर्च जे जमिनीतुन खते किंवा ईतर उत्पादनांसाठी केला जातो तो देखिल ह्यात समाविष्ट नाही, ह्याची नोंद घ्यावी.

पिकास केवळ आपण देतो ती खते मिळत नसतात, तर मातीत देखिल अन्नद्रव्ये असतात शिवाय, पाण्यातुन देखिल पिकास अन्नद्रव्ये मिळत असतात. फवारणीतुन देण्यात आलेली खते हि देखिल उत्पादन वाढविण्यात मदत करतात. तेव्हा ह्या ठिकाणी एक प्रार्थमिक गाईडलाईन्स म्हणुन ह्या माहीतीचा वापर करणे योग्य ठरेल, हे असे आणि असेच होईल, असे शेतीत कधी नसते.माहीतीच्या आधारे अंदाज बांधणे, त्यानुसार खर्चाचे नियोजन करणे ह्यात मदत होत असते, माहीतीचा उपयोग हा जय-परायज आणि चुक-बरोबर हे ठरविण्यासाठी शेतीत कधीच होवु शकत नाही. आज अनेक असे शेतकरी असतिल ते ह्या पेक्षा कमी खते वापरुन देखिल येथे नमुद केल्या पेक्षा जास्त उत्पादन घेत असतिल, किंवा ह्या पेक्षा कमी उत्पादन घेत असतिल, ह्यात कोण चुकिचे आणि कोण बरोबर असा निर्णय देणे चुकिचे ठरेल. ज्यावेळेस काहीतरी शास्रीय पाया उपलब्ध असतो तेव्हा अवांतर खर्च कमी करणे किंवा योग्य तो खर्च करणे ह्यात काही मदत होत असेल तर ते ज्ञान महत्वाचे आहे.

स्थानिक परिस्थिती आणि मातीच्या अन्नद्रव्य पातळी, ढोबळी मिरची लागवडीचा हंगाम, पिकाचा वाण आणि पिकावरिल किड व रोगांचा हल्ला, आणि ईतर घटकांच्या परिणामांतुन ह्यात घट किंवा वाढ होवु शकते. ह्या बाबतीत कोणतिही जबाबदारी घेतली जात नाही ह्याची नोंद घ्यावी.

ह्या ठिकाणी देण्यात आलेली माहीती किंवा खतांचे शेड्युल हे केवळ मार्गदर्शक स्वरुपाचे आहे. त्यात वातावरण, पिकाचा हंगाम, मातीचा प्रकार, लागवडीचा प्रकार, लागवडीचे अंतर, पिकाचा वाण, मातीतील आणि पाण्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण ह्यानुसार योग्य तो बदल करावा. लेखक कोणत्याही स्वरुपाचे कौतुक अगर आभार किंवा टिका ह्यांची अपेक्षा न ठेवता शेतकरी वर्गास मोफत माहीती देण्यात केवळ रस दाखवतात, ह्या माहीतीचा वापर केल्यानंतर उदभवणा-या कोणत्याही परिस्थितीची आम्ही कोणतिही जबाबदारी घेत नाहीत, ह्याची कृपया नोंद घ्यावी.