logo

Root Rot Crown Rot| मुळ कुज, क्राऊन रॉट

फायटोप्थोरा कॅपसिसी या उमायसिटस हा रोग होतो. या रोगात रोप वेगात सुकते व मरुन जाते.

रोगाच्या निदानापुर्वी काळजी पुर्वक परिक्षण करणे गरजेचे आहे. रोगाची लागण झाल्यानंतर रोपाचे सोटमुळ व लहान उप मुळ यांच्या वर पाणी शोषुन घेतल्या सारखे पट्टे पडतात.

मुळाच्या आतिल भाग हा गर्द तपकिरी रंगाचा बनतो. पिकाच्या कोणत्याही अवस्थेत या रोगाची लागण होवु शकते.

रोपाच्या जमिनीलगतच्या खोडावर देखिल लक्षणे दिसुन येतात. खोड सुरवातीला गर्द हिरवे बनते, पाणी शोषुन घेतल्या सारखे नरम बनते व नंतर तपकिरी पडुन कोरडे होते.

जमिनीत सतत ५ ते ६ तास भरपुर पाणी साचुन राहणे तसेच तापमान २४ ते ३३ डि.से. असणे रोगाची लागण होण्यास सक्षम ठरते. उबदार ओलसर वातावरणात लागण त्वरित होते.
Collar Rot
Collar Rot

Chemical Control | नियंत्रणाचे उपाय

या रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा, मेटालॅक्झिल,कॉपर युक्त बुरशीनाशके यापैकि एकाचा वापर करता येतो.

हा रोग उमायसिटस मुळे होत असल्या कारणाने बुरशीनाशके निवडतांना ती ऊमायसिटस नाशक अशीच निवडावीत.

रोगाची लागण न होवु देणे हाच या रोगाच्या नियंत्रणाचा भक्कम उपाय आहे, त्यासाठी जमिनीत ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर करावा. रोग आल्यानंतर रोगाच्या नियंत्रणासाठी बॅसिलस सबटिलस हा जीवाणू देखिल अत्यंत प्रभावी ठरतो.

बुरशीनाशकातील तांत्रिक घटक क्रिया प्रतिकारक शक्ती
मेटालॅक्झिल आंतरप्रवाही जास्त
कॅपटन स्पर्शजन्य कमी
कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य कमी
मॅन्कोझेब स्पर्शजन्य जास्त