logo

Cercospora Leaf Spot| सर्कोस्पोरा लिफ स्पॉट

(Ralstonia solanacearum / Pseudomonas solanacearum)

सर्कोस्पोरा लिफ स्पॉट हा सर्कोस्पोरा या बुरशीमुळे होणारा रोग आहे. या रोगात पानांवर लंबाकार, गोलाकार असे करड्या रंगाचे ठिपके पडतात, या ठिपक्यांच्या कडा ह्या गर्द रंगाच्या असतात. काही दिवसांनंतर मधिल करडा भाग कोरडा होवुन तो गळुन पडतो व त्यामुळे तेथे छिद्र पडलेले दिसुन येते. पान पिवळसर होते. हा रोग पिकाच्या पानांवर, खोडावर तसेच देठावर देखिल दिसुन येतो.

२० ते २५ डिग्री सेल्सियस तापमानत रोगाचा वाढ हि झपाट्याने होते. रोगाच्या वाढीसाठी आद्रता पोषक ठरते. तापमान ५ डीग्री सेल्सियस पेक्षा कमी व ३५ डिग्री पेक्षा जास्त असल्यास रोगाची वाढ कमी होते. रोगाचा प्रसार हा बाष्प मिश्रित वारा वाहणे, अवजारे, स्पर्श, वारा यामुळे वेगाने होतो.

Cercospora Leaf Spot

Control | नियंत्रणाचे उपाय

नियंत्रण व उपाययोजना – रोपांची लागवड जास्त दाट करु नये. रोपांच्या पानांवर जास्त वेळ पाणी साचुन राहत असेल तर रोगाच्या लक्षणांचा अभ्यास करावा. रोगाच्या नियंत्रणासाठी खालिल बुरशीनाशके वापरता येतिल. बुरशीनाशकांच्या प्रतिकारक शक्ती धोका पातळी तसेच त्यांच्या कार्य पध्दतीनुसार वापर करावा.

बुरशीनाशकातील तांत्रिक घटक क्रिया प्रतिकारक शक्ती
कॅपटन स्पर्शजन्य कमी
कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य कमी
कॉपर सल्फेट २.६२% आंतरप्रवाही कमी
प्रोपीनेब स्पर्शजन्य कमी
मायक्लोब्युटॅनील आंतरप्रवाही मध्यम
झिनेब स्पर्शजन्य कमी
झायरम स्पर्शजन्य कमी
मॅन्कोझेब स्पर्शजन्य जास्त
क्लोरोथॅलोनिल स्पर्शजन्य कमी
थायोफिनेट मिथाईल स्पर्शजन्य जास्त
डायफेनकोनॅझोल आंतरप्रवाही मध्यम
बेनोमिल स्पर्शजन्य जास्त