logo

बॅक्टोरिलयल स्पॉट | Xanthomonas

Xanthomonas campestris pv dieffenbachiae; Xanthomonas axonopodis pv. dieffenbachiae

झॅन्थोमोनास ह्या जीवाणु मुळे पानांवर शिरांच्या आतिल भागात पिवळसर, तपकिरी रंगाचे पट्टे दिसुन येतात.

रोगाची लागण हि पानांच्या कडांवर असलेल्या हायडॅथोडस आणि पानांवरिल पर्णरंध्रांच्या आत जीवाणू शिरल्याने होते. रोगाची लागण होण्यासाठी जास्त आर्द्रता, आणि उबदार तापमान पोषक ठरते.

Bacterial Spot
Bacterial Spot

ह्या रोगाची लक्षणे हि प्रामुख्याने जुन्या पानांवर लवकर दिसुन येतात. पानांवरिल डागांना अनेक वेळेस पिवळसर अशी कडा असते. रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने वरिल-आतिल बाजुस वाकतात.

Chemical Control | नियंत्रणाचे उपाय

रोगाच्या नियंत्रणासाठी खालिल बुरशीनाशके वापरता येतिल. बुरशीनाशकांच्या प्रतिकारक शक्ती धोका पातळी तसेच त्यांच्या कार्य पध्दतीनुसार वापर करावा.

बुरशीनाशकातील तांत्रिक घटक क्रिया प्रतिकारक शक्ती
कॅपटन स्पर्शजन्य कमी
कॉपर ऑक्सिक्लोराईड स्पर्शजन्य कमी
कॉपर सल्फेट २.६२% आंतरप्रवाही कमी
कासुगामासिन आंतरप्रवाही -
व्हॅलिडामायसिन आंतरप्रवाही -
झिनेब स्पर्शजन्य कमी
झायरम स्पर्शजन्य कमी
मॅन्कोझेब स्पर्शजन्य जास्त