logo

ईलेक्ट्रिकल कंडक्टिव्हीटी (EC)

मातीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण हे ईलेक्ट्रिकल कंडक्टिव्हीटी वरुन लक्षात येते. ईलेक्ट्रिकल कंडक्टीव्हीटी ही, मिली सायमन्स प्रती मिटर (mS/m) , डेसीसायमन्स प्रती मीटर (dS/m), तसेच मायक्रोसायन्स प्रती सेमी अशा स्वरुपात मोजली जाते.

या विविध मानकांचे रुपांतर dS/m मधे करण्यासाठी खालिल माहीतीचा उपयोग होईल. 1 dS/m म्हणजेच 1mS/cm आणि 1mmhos/cm.

या मानकातुन या मानकात रुपांतर करण्यासाठी हे गणित करा
μS/cm dS/m 1000 ने भागाकार करा.
dS/m μS/cm 1000 ने गुणाकार करा.
dS/m ppm 640 ने गुणाकार करा.

ईलेक्ट्रिकल कंडक्टिव्हीटी हि पिकासाठी हानीकारक ठरणा-या अशा क्षारांचे पाण्यातील विद्राव्यता दर्शविते, ज्यावरुन त्याची वर्गवारी केली जाते.

क्षारता वर्गिकरण ई सी (ds/m) पिकाच्या वाढीवरिल परिणाम
नॉन सलाईन 0-2 पिकावरिल परिणाम नगण्य
किंचित क्षारयुक्त 2-4 संवेदनशील पिकांचे उत्पादन कमी होते.
मध्यम क्षारयुक्त 4-8 बहुतेक पिकांचे उत्पादन घटते.
जास्त क्षारता 8-16 केवळ सहनशिल पिकांचे उत्पादन मिळते.
अती जास्त >16 फार कमी सहनशिल पिकांचे उत्पादन

Ref:Texas A&M Agrilife Extension

सॅण्ड जास्त असलेल्या जमिनीची ईलेक्ट्रिकल कंडक्टिव्हीटी ही क्ले असलेल्या जमिनीपेक्षा कमी असते, ईसी हा पाण्यात विरघळणा-या क्षारांवर अवलंबुन असल्याने जमिनीच्या उतारानुसार जेथे पाणी साचुन राहण्याचे प्रमाण जास्त असते तेथे ईसी हा उंच भागापेक्षा जेथे पाणी साचत नाही त्यापेक्षा जास्तच असतो, जरी मातीचा प्रकार हा एकसमान असेल तरी, पाण्याच्या जास्त प्रमाणामुळे ईसी मधे फरक पडतो.

ज्या जमिनीत पाणी खोलवर वाहुन जाण्याचे प्रमाण कमी असते, तेथे ईसी हा जास्त असतो, कारण क्षार हे जमिनीच्या खालच्या थरात वाहुन जाण्यास अडचण निर्माण होते.

जास्त प्रमाणात ईसी असलेल्या जमिनीत पिकासाठी पाणी देत असतांना त्यापाण्यातील विद्राव्य क्षारांचे प्रमाण माहीत असणे गरजेचे आहे. जास्त प्रमाणातील क्षार असलेले पाणी वापरत असतांना त्याचा ईसी वर विपरित असाच परिणाम होतो. त्यामुळे विद्राव्य क्षारांचे प्रमाण कमी राहील असेच पाणी वापरावे. सिंचनासाठीच्या पाण्यातील क्षार कमी करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा बसवतांना आधी पाण्यात कोणते क्षार जास्त प्रमाणात आहेत ते जाणुन घेवुन त्यानुसार उपाययोजना करावी. चुकिच्या पध्दतीचा वापर केल्याय पाण्यातुन केवळ कॅल्शियम व मग्नेशियम चे क्षार तेवढे निघुन जाऊन त्यात सोडियम क्षारांचे प्रमाण शिल्लक राहते, या अशा हलक्या संबोधल्या जाणा-या पाण्याच्या वापरातुन जमिनीत सोडीयम क्षारांचे तेवढे प्रमाण वाढीस लागते.

जास्त प्रमाणात ईसी असलेल्या जमिनीत सुक्ष्मजीवांच्या वाढीवर, नत्राच्या उपलब्धेतेवर विपरित परिणाम होतात.

विविध पिकांसाठी हानीकारक ठरणार नाही अशा ईसी च्या पातळीची उच्चतम मर्यादा खाली दिली आहे. उत्पादनातील घट (%) म्हणजे जास्तीत जास्त जे ईसी चे प्रमाण दिलेले आहे त्यापेक्षा १ युनिट जरी ईसी वाढला तर पिकाच्या उत्पादनात येणारी घट टक्केवारीत दिलेली आहे.

पिक ई सी (ds/m) उत्पादनातील घट (%)
कापुस 7.7 5.2%
गहु 6.0 7.1%
भुईमुग 3.2 29%
मका 1.7 12%
द्राक्ष 1.5 5.7%
चवळी 1.3 13%
शुगरबीट 7.7 5.9%
सोयाबीन 5 20%
टोमॅटो 2.5 9.9%
बटाटा 1.7 12%
मिरची 1.5 5.7%