logo

फायटोप्थोरा

फायटोप्थोरा यास आपण एक बुरशी म्हणुन जरी ओळखत असलो तरी तो शास्रिय आणि पेशीय रचने नुसार बुरशी नाही. फायोटोप्थोरा ऊमायसिटीस या गटात मोडतात. यांच्या पेशी भित्तिकेत सेल्युलोज असते तर बुरशीच्या पेशीत चिटिन. यांचे क्रोमोसोम डिप्लॉईड असतात तर बुरशीचे हॅप्लॉईड. थोडक्यात हे वनस्पतीच्या पेशीच्या फार जवळचे असे स्टक्चर बाळगतात. फायटोप्थोरा साठी साधारण बुरशीनाशकांतील केवळ ब्रॉडस्पोकट्रम बुरशीनाशके चालतात, त्याच्यासाठी नविन संशोधित ऊमायटीसाईडस वापरणे जास्त फायदेशिर ठरते. (द्राक्ष शेतीत डाऊनीसाठी विशेष रुपाने शिफारस केलेली सर्व बुरशीनाशके वापरता येतात, एफ आर ए सी कोड बघुनच)

फायटप्थोरा जीनस मधे ६४ असे स्पेसिज आहेत ज्या सोयाबीन, तुर, मुग, उडीद, मका, नारळ, कांदा, मिरची, स्ट्रॉबेरी, टोमॅटो वेलवर्गिय भाजीपाला वै. पिकांवर हल्ला करतात.

प्रामुख्याने मुळांशी निगडीत रोग या ऊमायसिटस मुळे होतात. परंतु पानांवर होणारे रोग देखिल कमी नाहीत. ज्याठिकाणी पाणी साचुन राहते, निचरा होत नाही अशा ठिकाणी रोगाची लागण जास्त होते.

फायटोप्थोरा झुस्पोअर्स या अलैंगिक स्पोअर्स ने प्रजनन करतात. हे झुस्पोअर्स फ्लॅजेला मुळे पाण्यात पोहु शकतात अगर वा-यात उडु शकतात.

पिकावर फायटोप्थोरा चा हल्ला हा जास्त पाणी, पाण्याचा निचरा कमी होणे, जास्त आर्द्रता ह्या परिस्थितीत होतो. फायटोप्थोरा ही एक पाणी पसंत करणारी बुरशी असल्याने, जास्त पाणी पिकासाठी हानीकारक ठरत असतांना, अशक्त झालेल्या पिकावर त्वरित हल्ला करते.

शेतातील सखल भागात जेथे पाणी साचुन राहते अशा ठिकाणी ह्या बुरशीचा हल्ला प्रथम होतो.

रोगाची बुरशी पाण्यासोबत, तसेच शेतात काम करणा-या व्यक्तिंच्या बुट,चपलांच्या सोबत, तसेच शेतात वापरल्या जाणा-या अवजारांच्या सोबत वाहुन नेले जाते.

सोयाबीन पिकातील खोड आणि मुळ कुज हा रोग फायटोप्थोरा सोजे (Phytophthora sojae) ह्या बुरशीमुळे होतो.

रोगाच्या लक्षणांत खोड आणि पिकाचे मुळ कुजलेले दिसुन येते. खोडावर लालसर तपकिरी रंगाचे भाग दिसुन येतो. खोडावरिल लक्षणे हि, जमिनीपासुन वर दिसुन येतात. पिकाच्या फुलोरा आणि त्यानंतरच्या अवस्थेत, रोपाची तळाकडिल पाने पिवळी पडतात.

टोमॅटो, मिरची पिकावरिल लेट ब्लाईट हे रोग देखिल फायटोप्थोरा मुळे होतात.

टोमॅटो, स्ट्रॉबेरी, पपई, कांदा, अंजीर या पिकाच्या फळांवर देखिल फायटोप्थोराचा प्रादुर्भाव दिसुन येतो.

फळांवर गर्द तपकिरी, लाल-काळसर रंगाचा पट्टा दिसुन येतो. रोग फळाच्या आत वाढत असतांना फळाची साल मात्र टणकच राहते, रोगाच्या प्रादुर्भावाच्या जवळपास शेवटच्या अवस्थेत फळ नरम पडते. फळांवर पडणारे हे डाग ओलसर दिसुन येतात. जास्त आर्द्रता तसेच जास्त पाणी ह्यामुळे रोगाच्या प्रार्दुभावास चालना मिळते.