logo

मातीचा सामू (Soil pH)

पीएच हा सामु म्हणुन देखिल ओळखला जातो. जमिनीची पीएच हा ईलेक्ट्रिकल पीएच मीटर, पीएच पेपर यावर मोजला जातो. मातीच्या द्रावणाचा पीएच घेतला जातो.

पीएच हा ० ते १४ या मानांकनांवर मोजतात, ७ पीएच हा न्यट्रल पीएच असतो.

७ पेक्षा कमी पीएच हा अँसिडीक पीएच असतो तर ७ पेक्षा जास्त पीएच हा विम्ल धर्मिय पीएच असतो.

पीएच हा मातीतील हायड्रोजन आयन्स (H) चा निगेटिव्ह लॉग असतो. म्हणजे ७ पीएच असलेल्या जमिनीपेक्षा ८ पीएच असलेली जमिन ही १० पट अधिक क्षार युक्त असते.

पीएच म्हणजे आपण जरी ढोबळ मानाने जमिनीची क्षारता असे संबोधत असलो तरी देखिल असे म्हणणे हे शास्रिय दृष्टीकोनातुन चुकीचे ठरते. कारण क्षारता ही अनेक अशा मुलद्रव्यांच्या आणि त्यांच्या संयुगांच्या जमिनीतील प्रमाणावर अवलंबुन असते. पीएच वरुन केवळ मातीच्या कणांवरिल हायड्रोजन आयन्स चे प्रमाण तेवढे कळत असते.

पीएच म्हणजे हायड्रोजन आयन्स चे प्रमाण आणि त्यापासुन आपल्या पिकांस अगर जमिनीसाठी कोणता लाभ होतो हे जाणुन घेणे गरजेचे आहे, जणे करुन पीएच –क्षारता यातील फरक लक्षात येईल. हे कळाल्यानंतर आपण पीएच बाबतीत जी चिंता अवास्तव करत राहतो ती संपेल आणि जमिन सुधारण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांत योग्य तो बदल करुन जास्तीत जास्त उत्पादन कमी खतांत घेता येईल.

मातीच्या सामु वर परिणाम करणारे घटक

प्रकार अँल्युव्हियल माती काळी माती लाल माती
क्ले 30-40% 30-69% 14-53%
स्लिट 20-30% 26-40% 4-19%
सॅण्ड 10-15% 4-25% 35-76%
सेद्रिय कर्ब 0.1-2% 0.1-5% 1-2%
सी.ई.सी. 3-12 meq/100g 47-65 meq/100g 5-26 meq/100g
पीएच 6 to 8 7.5 to 8.5 Mostly Less than 7

जमिनीतील मिनरल्स

ज्यापासुन माती तयार होते, (या आधीच आपण अँल्युव्हियल, लॅटराईट, ब्लॅक सॉईल वै. असे जमिनीचे प्रकार अभ्यासले आहेत), परिसराचे तापमान, पाऊसमान व एकंदरित वातावरण तसेच मातीचा पोत (Texture) ज्यात क्ले, स्लिट, सॅण्ड यांचे प्रमाण मातीत किती आहे, हे नैसर्गिक घटक मातीचा सामु निर्धारित करतात, आणि या मुळे निर्धारित होणारा मातीचा सामु हा सहजा सहजी बदलता येत नाही. वरिल तक्त्यात जमिनीचे मुलभुत प्रकार व त्यांचे गुणधर्म दिलेले आहेत.

पाऊस

ज्या ठिकाणी भरपुर पाऊस होतो त्याठिकाणी जमिनीतुन सामु वाढविणारे बेस कॅटायन्स वाहुन जातात आणि जास्त प्रमाणात हायड्रोजन आणि अँल्युमिनियम शिल्लक राहतात ज्यामुळे सामु कमी होतो. (पावसामुळे जमिनीतील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे मातीच्या खालच्या थरात वाहुन जाते, ज्यामुळे देखिल मातीचा सामु कमी होण्यास मदत मिळते.) तसेच पावसाच्या पाण्याचा सामु देखिल हा काहीसा आम्ल धर्मिय असतो (५.७) ज्यामुळे देखिल सामु कमी होतो. पावसाचे पाणी हवेतील कार्बन डाय ऑक्साईड (CO₂) सोबत रासायनिक अभिक्रिया होवुन कार्बोनिक अँसिड (H₂CO₃) तयार होते, जे एक अशक्त असे आम्ल असल्याने, त्याचे विघटन होवुन एक हायड्रोजन चा एक (H⁺) आयन आणि बायकार्बोनेट (HCO₃) तयार होते. मुक्त झालेला हायड्रोजन मातीच्या सुक्ष्म कणांवरिल कॅल्शियमची (Ca⁺⁺) जागा घेतो, हा मुक्त झालेला कॅल्शियम त्यानंतर बायकार्बोनेट सोबत संयुग पावुन त्यापासुन पाण्यात विरघळणारे आणि जमिनीत खोलवर वाहुन जाणारे असे कॅल्शियम बायकार्बोनेट तयार होते. मुक्त झालेल्या हायड्रोजन मुळे मातीचा सामु कमी होतो.

सेंद्रिय पदार्थ

ज्या जमिनीत सेंद्रिय पदार्थांच आणि क्ले चे प्रमाण कमी असते अशा जमिनीत (pH) बदलास मदत होते. जास्त प्रमाणातील पावसाने अशा जमिनीत मुलद्रव्य वाहुन जाण्याचे प्रमाण हे जास्त असल्याने, अशा जमिनी असिडीक होण्यास मदतच मिळते. याच्या विपरित ज्या जमिनीत क्ले आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीत सामु बदलास प्रतिकारक असतात.

रासायनिक खते

ज्या नत्र युक्त खतात अमोनियम आहे अशा खतातील अमोनियम चे नायट्रेट मधे रुपांतर होतांना जमिनीत हायड्रोजन सोडला जातो, ज्यामुळे सामु कमी होतो. या शिवाय ईतरही अनेक खते अशी आहेत की ज्यामुळे मातीचा सामु कमी होतो. या अशा खतांचा वारंवार केलेला वापर हा मातीचा सामु कमी करण्यास सक्षम असतो.

खते ज्यामुळे मातीचा सामु कमी होतो

रासायनिक खताचे नांव नायट्रोजन (%) सामु वर परिणाम
अमोनियम नायट्रेट ३३% आम्ल
अमोनियम सल्फेट २०-२१% अती आम्ल
युरिया ४६ % आम्ल
डाय अमोनियम फॉस्फेट(DAP) १८% मध्यम आम्ल
Soil pH and Nutrient Availability

मातीचा सामु हा पिकांस उपलब्ध होणा-या अन्नद्रव्यांचे प्रमाण निर्धारित करित असतो.

नायट्रोजन

पिकांस नायट्रोजन ची उपलब्धता ही, ५.५ पासुन तर ८.० च्या सामु पर्यंत उपलब्ध असते, त्या पलिकडिल मर्यादेत नायट्रोजन ची उपलब्धता कमी कमी होत जाते.

स्फुरद (फॉस्फोरस)

फॉस्फोरस ची उपलब्धता हि ६ पासुन तर ७.५ पर्यंत जास्तीत जास्त राहते, त्यानंतर ती ८.५ पर्यंत थोडी कमी होवु पुन्हा वाढते. त्यामुळे सामु बदलाचा फॉस्फोरस उपलब्धतेवर जास्त विपरित परिणाम होत नाही. फॉस्फोरसची उपलब्धता ही ६ पासुन तर ७.५ पर्यंत होत राहते त्यानंतर कमी कमी होत जावुन पुन्हा ९.५, १० पर्यंतच्या सामु ला होत राहते.

पालाश (पोटॅश)

पोटॅश ची उपलब्धता देखिल फॉस्फोरस प्रमाणेच सामु चा बदल अनुसरते, पोटॅश ची उपलब्धता ही ८.५ च्या पुढिल सामु ला वाढुन जाते आणि १० पर्यंत कायम राहते.

सल्फर आणि मॉलिब्डेनियम ची उपलब्धता हि ६.५ पासुन तर १० पर्यंत वाढत जाते.

कॅल्शियम- कॅल्शियम ची उपलब्धता ही ६.५ ते ७.५ च्या सामु दरम्यान सर्वाधिक असते. आम्ल आमि विमल् धर्मिय मातीत ती कमी असते.

बोरॉन – बोरॉन ची पिकांस उपलब्धता हि सामु वर फार जास्त प्रमाणात अवलंबुन असते. बोरॉन ची उपलब्धता ही ५ ते ७.५ च्या सामु रेंज मध्ये जास्त राहते आणि त्यानंतर ती जवळपास उपलब्ध होणार नाही अशा स्थितीत जावुन पोहचते.

फेरस – फेरस ची उपलब्धता ही ४.५ ते ६.५ सामु दरम्यान राहते व त्यानंतर कमी होते.

कॉपर व झिंक – कॉपर व झिंक ची उपल्बधता ही, ५ ते ७ पर्यंत होत राहते.

ह्या ठिकाणी देण्यात आलेला पीएच आणि अन्नद्रव्य उपलब्धता चार्ट हा युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यांचे कडुन घेतलेला आहे.

मातीची एक कोणत्याही बदला प्रती बफर कॅपेसिटि असते.

जस काही माणस फार सहनशील असतात तर काही शिघ्र कोपी. मातीच देखिल तसच असत.

ह्या क्षमतेला बफर कॅपेसिटि म्हणतात. मातीस हि बफर कॅपेसिटि प्राप्त होते, सेंद्रिय पदार्थ यांचे पासुन.

सेंद्रिय पदार्थ त्यांच्या कडे (आणि सोबत मातीतील क्ले कण) असलेल्या भरपुर कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटि आणि शोषुन घेण्याच्या, चिलेट करण्याच्या, तसेच मातीच्या सरफेस एरिया ला (कणांचा मिळुन बनणारा पृष्ठभाग) वाढविण्याच्या क्षमतेमुळे मातीत कोणताही बदल लवकर घडु देत नाहीत. हा बदल मग कमी पीएच कडुन जास्त करण्याचा असो, किंवा जास्त पीएच कडुन कमी पीएच करण्याचा असो. हि बफर कॅपेसिटि, मातीत असलेल्या एकुण पाण्याच्या प्रमाणापैकी किती पाणी पिकाच्या मुळांना द्यायचे हे देखिल ठरवत असते