logo

मधमाशा आणि शेती

अस म्हणतात की, आपण जितक्या प्रकारची शेती उत्पादने ग्रहण करत असतो त्यातील एक तृत्रियांश उत्पादने हि, मधमाशी मुळे मिळत असतात.
अनेक पिके हि, पर परागीभवनावर अवलंबुन असल्या कारणाने, जोवर मधमाशी त्यांचे परागीभवन करुन देत नाही तोवर फळ तयार होणे अशक्य असते. मधमाशा ह्या परागीभवनासोबतच मध, नैसर्गिक मेण आणि निसर्गातील जैव विविधता जपण्यास देखिल मदत करतात.

मधमाशांचे प्रमुख प्रकार खालिल प्रमाणे –

रॉक बी – (Aphis dorsata)

आकाराने मोठ्या आणि स्वभावाने देखिल कडक, चावणा-या ह्या मधमाशा भारतात सर्विधिक प्रमाणात सापडतात. ह्या मधमाशा, मोठी झाडे, बिल्डिंग अशा मोठ्या आणि मोकळ्या ठिकाणी पोळे बनवतात. यांचे पोळे ६ फुट रुंद तर ३ फुट खोल असु शकते. या मधमाशा एका वर्षात ३६ किलो पर्यत मध एका पोळ्यात साठवतात. या वेळोवेळी त्यांच् पोळ्याची जागा बदलवत असतात. या मधमाशांचा उपयोग मधमाशी पालन व्यवसायात करता येत नाही.

लिटल बी (Ahpis florea)

आकाराने लहान असलेल्या या मधमाशा, आकाराने फार लहान पोळे बनतात, यांच्या पोळ्यात एक वर्षात ५०० ग्रॅम इतके मध साठते. या मधमाशा देखिल त्यांच्या पोळयाची जागा वेळोवेळी बदलवत असतात.

इंडियन हाईव्ह बी, किंवा एशियन बी (Aphis cerana indica)

या मधमाशा मध्यम आकाराच्या असतात, आणि मधमाशी पालनासाठी योग्य ठरतात. या मधमाशा एका शेजारी एक असे पोळे बनवु शकतात. एका वसाहतीपासुन एका वर्षात ६ ते ८ किलो मध मिळते. ह्या मधमाशा पळुन जाण्यात पटाईत असतात.

युरोपियन बी किंवा ईटालियन बी (Aphis mellifera)

इंडियन बी पेक्षा आकाराने थोड्या मोठ्या असलेल्या या मधमाशा, युरोपातुन आयात केल्या गेल्यात. या मधमाशी पालनासाठी योग्य ठरतात, आणि इंडियन बी प्रमाणे ह्या पळुन जात नाहीत. या मधमाशांच्या एका वसाहतीपासुन एका वर्षाला २५ ते ४० किलो मध मिळते.

डॅमर बी -

वरिल मधमाशांच्या व्यतिरिक्त डॅमर बी म्हणुन एक डंख मारण्याची क्षमता नसलेल्या आणि परागीभवनात देखिल महत्वाची भुमिका पार पाडणा-या या एक प्रकारच्या मधमाशाच भारतात मोठ्या प्रमाणावर आढळुन येतात. या माशा आकाराने लहान पोळे बनवतात आणि एका वसाहतीतुन मात्र १०० ग्रॅम मध मिळते. ह्या मधमाशा देखिल पाळता येतात. यांचे पोळे हे शक्यतो झाडाच्या खोबणीत, भिंतीवरिल थोड्या मोठ्या छिद्रात असे असते.

मधमाशांचे जीवन चक्र –

मधमाशा ह्या सामाजिक प्राणी आहे. मधमाशांचे वर्गिकरण हे मावा किडिच्या परिवारातच केले जाते. Aphis (अफिस) ह्या जिनस मधिल मधमाशा शेतक-यांच्या उत्तम अशा सोबती आहेत.

मधमाशांचे पोळे हे तिन प्रकारच्या कर्म व्यवस्थेवर आधारलेले आहे.

1) मधमाशींची राणी –

मधमाशींची राणी, हि खरोखर राणीच असते, प्रत्येक पोळ्यात एकच राणी असते, आणि विशेष म्हणजे ती सर्व पोळ्याची आई देखिल असते. पोळ्यातील पुर्ण प्रजा हि राणी माशीने दिलेल्या अंड्यांपासुनच जन्म घेत असते. पोळ्यातील ती एकमेव मादी असते, आणि तिचे काम अंडी देणे ईतकेच असते. एक मधमाशी एका दिवसाला साधारणतः १५०० ते २००० अंडी देते.

कामकरी माशा ह्या लहान पिल्लातुन एखादी धष्टपुष्ट अळी निवडुन तिला राणीचा दर्जा देतात. अर्थात हि एक प्रकारची लोकशाहीच झाली. कामकरी माशा ह्या राणी माशीला रॉयल हनी म्हणजेच राज मधच केवळ खाऊ घालतात, हे मध कामकरी माशांच्या डोक्याजवळ असलेल्या भागात तयार होते, जर ह्या माशीला रॉयल हनी खाऊ नाही घातले तर ती देखिल इतर कामकरी माशांसारखीच बनते.

मधमाशीची अंडी अवस्था ही ३ दिवसांची असते, त्यानंतर अळी अवस्था हि ८.५ दिवसांची असते, त्यानंतर कोषावस्था हि १७ दिवसांपर्यत असते. राणी माशी त्यानंतर नॅप्ट्युअल फ्लाईट (थोडक्यात नर माशीच्या शोधात) पोळ्यातुन बाहेर पडते. ह्या काळात सुर्य प्रकाश आणि उबदार वातावरण असावे लागते. नरासोबतचे मिलन हे उडतांनाच होते. राणी माशी १२ ते १५ नरांसोबत (यांना ड्रोन्स म्हणतात) मिलन करुन तिच्या शरिरातील एका भागात ६० लक्ष स्पर्म जमा करुन ठेवते. असे होई पर्यंत राणी माशी एक दोन वेळेस पोळ्यातुन बाहेर जावुन उडत असते. राणी माशीला हवे तसे स्पर्म जमा झाले कि, ती पुढील २ ते ७ वर्ष हे स्पर्म अंडी देण्यासाठी वापरते. राणी माशी हि एकदा मर माशी सोबत मिलन झाले कि, दिवसाला १५०० ते २००० अंडी देते.

केवळ एकटी राणीमाशी पोळे तयार करु शकत नाही, तर ती, अनेक कामकरी माशांना सोबत घेवुन स्थलांतर करते, अनेक वेळेस, कामकरी माशांनी पाहुन ठेवलेल्या जागेवर पोळे तयार होत नाही तोवर राणी माशीचे स्थलांतर केले जात नाही, त्यानंतर पुर्ण सुरक्षा बंदोबस्तात राणी माशीचे स्थलांतर केले जाते.

2) ड्रोन्स किंवा नर माशी –

नर माशी हि कामकरी माशी किंवा राणी माशीने ठरवुन अनफर्टिलाईझ अंडी दिल्यामुळे जन्माला येतात. नर माशी ची अंडी अवस्था हि ३ दिवसांची असते, त्यानंतर अळी अवस्था, कोषावस्था. कोषावस्था संपल्यानंतर २४ व्या दिवशी नरमाशी तयार होते. नरमाशी ३८ व्या दिवसापासुन राणी माशी सोबत मिलनासाठी तयार होते. राणी माशी सोबत मिलन झाल्यानंतर त्यांचा मृत्यु होतो. नर माशीचा सर्वसाधारण जीवन कालावधी हा ९० दिवसांचा असतो, तेव्हाच जेव्हा त्याचे कोणत्याच राणी माशी सोबत मिलन होत नाही. कामकरी माशी, ह्या नर माशांना हिवाळ्याच्या आधी पोळ्यातुन बाहेर हाकलुन लावतात, तर उबदार आणि उन्हाळा सुरु होण्याच्या आधी त्यांचे पुन्हा संगोपन सुरु करतात.

ड्रोन्स पोळ्यात राहत नाहीत, तर ते अशा एखाद्या ठिकाणी उडत राहतात, जेथे राणी माशी येवुन मिलन होवु शकेल. असा परिसर कशा प्रकारे निवडला जातो हे एक कोडेच आहे.

3) कामकरी माशी-

कामकरी माशी हि, पोळ्यासाठी झटणारी, त्याला भरवणारी, आणि रक्षण करणारी अशी महत्वाची माशी असते. परागीभवनासाठी बाहेर जाणारी हि माशी शेतक-यांसाठी देखिल महत्वाची असते.