logo

बुरशीनाशके

डीनोकॅप 48% EC ग्रुप 29 I स्पर्शजन्य

व्यापारी नांव केराथेन डिनोकॅप व मॅन्कोझेब चे मिश्रण - डिकार
वर्गिकरण डायनायट्रोफिनिल क्रोटोनेट्स
रासायनिक गट डायनायट्रोफिनिल क्रोटोनेट्स
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप 29
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका माहिती उपलब्ध नाही.
एम ओ ए (MOA) कोड C: श्वसन क्रिया (Respiration)
कार्य प्रकार स्पर्शजन्य बुरशीनाशक, कोळीनाशक गुणधर्म देखिल आहेत

कशासाठी उपयुक्त

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
भेंडी भुरी ०.३ ग्रॅम
मिरची भुरी ०.३ ग्रॅम
बिन्स भुरी ०.३ ग्रॅम
द्राक्ष भुरी ०.३ ग्रॅम
पिच भुरी ३ ग्रॅम प्रती १० लि.
सफरचंद भुरी ३ ग्रॅम प्रती १० लि.
बोर भुरी ३ ग्रॅम प्रती १० लि.
आंब भुरी ५ ग्रॅम प्रती १० लि.
वटाणा भुरी ०.४ ग्रॅम
बीयांसाठी लागवडकेलेली मेथी भुरी ०.४ ग्रॅम
जीरे भुरी ०.४ ग्रॅम
गुलाब भुरी २ मिली १० लि. पाणी

कार्यपद्धती

स्पर्शजन्य बुरशीनाशक प्रतिबंधकात्मक आणि उपचारात्मक क्रिया बुरशीच्या मायटोकॉन्ड्रिया वर हल्ला करते. प्रोटॉन ग्रॅडियन्ट ला निष्क्रिय करुन ऑक्सिडेटिव्ह फॉस्फायरिलेशन ला हतबल करते. बुरशीचा अन्ननिर्मिती थांबल्याने अंत होतो.

पर्यावरण व दक्षता

फवारणीकरतांना काळजीपुर्वक वापरावे. डोळे, त्वचा या साठी हानीकारक. जास्त प्रमाणात, किंवा अव्यवस्थित फवारणी झाल्यास पिकांसाठी अत्यंत हानीकारक आहे. पोटात गेल्यास फुफ्फुसांना इजा संभवनीय. मधमाशांसाठी अत्यंत हानीकारक.