logo

बुरशीनाशके

कार्बेन्डाझिम ग्रुप 1 I आंतर प्रवाही

व्यापारी नांव बावीस्टीन, द्रव स्वरुपात - पर्ल
वर्गिकरण मिथिल बेन्झीमिडॅझोल कार्बामेटस् (MBC)
रासायनिक गट बेन्झीमिडॅझोल
एफ आर ए सी (FRAC) कोड ग्रुप १
बुरशीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्याचा धोका  जास्त
एम ओ ए (MOA) कोड  बी १, मायटॉसीस मधिल बीटा ट्युबिलीन असेंब्ली वर क्रिया करते.
कार्य प्रकार आंतर प्रवाही
   

कशासाठी उपयुक्त

 

कार्बेन्डाझिम ५% GR

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
भात ब्राऊन लिफ स्पॉट -

कार्बेन्डाझिम 46.27%

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
द्राक्ष भुरी १ मिली
आंबा भुरी १ मिली

कार्बेन्डाझिम 50% WP

पिक रोगाचे नांव व्यापारी उत्पादनाचे प्रमाण प्रती ली.
भात ब्लास्ट ०.३ ते ०.६ ग्रॅम
शिथ ब्लाईट १ ग्रॅम प्रती कि. बीज (बीज प्रक्रिया)
एरियल फेस ०.३ ते ०.६ ग्रॅम
गहु लुझ स्मट १ ग्रॅम प्रती कि. बीज (बीज प्रक्रिया)
बार्ली लुझ स्मट १ ग्रॅम प्रती कि. बीज (बीज प्रक्रिया)
टॉपिओका सेट रॉट १ ग्रॅम
कापुस लिफ स्पॉट ०.३ ग्रॅम
ज्युट सिडलिंग ब्लाईट १ ग्रॅम प्रती कि. बीज (बीज प्रक्रिया)
भुईमुग टिक्का ०.३ ग्रॅम
शुगर बीट लिफ स्पॉट ०.५ ग्रॅम
भुरी ०.५ ग्रॅम
वाटाणे भुरी ०.५ ग्रॅम
बिन्स भुरी ०.५ ग्रॅम
काकडी भुरी ०.५ ग्रॅम
अन्थ्रॅक्नोझ ०.५ ग्रॅम
वांगी लिफ स्पॉट ०.५ ग्रॅम
फळ कुज ०.५ ग्रॅम
सफरचंद स्कॅब २.५ ग्रॅम प्रती झाड १० लि. पाण्यातुन फवारणी
द्राक्ष अन्थ्रॅक्नोझ ०.५ ग्रॅम
सुपारी डाऊनी लिफ स्पॉट ३ ग्रॅम प्रती १० लि. पाण्यातुन प्रती झाड फवारणी
गुलाब भुरी ०.५ ग्रॅम
बोर भुरी ५ ग्रॅम प्रती १० लि. पाण्यातुन प्रती झाड फवारणी

कार्यपद्धती

आंतर प्रवाही क्रिया, उपचारात्मक आणि प्रतिबंधकात्मक क्रिया. पिकांच्या पानांद्वारा आणि मुळांद्वारा शोषुन घेतले जाते. प्रतिबंधकात्मक म्हणुन वापर केला असता, बुरशीच्या स्पोअर्स (बीजाणू) ला मारण्याची क्षमता आहे. बुरशीचा शारीरीक वाढ थांबवते, डिएनए निर्मिती थांबवते. बुरशीच्या शारीरीक वाढीसाठी गरजेच्या अशा पेशी विभाजनांस थांबवते, बुरशीच्या पेशीतील टयुबीलिन्स ची निर्मिती थांबवते, बुरशीची पचन क्रिया बिघडवते, पेशी भित्तिका कमजोर करते. नविन स्पोअर्स ची निर्मिती थांबवते

पर्यावरण व दक्षता

कार्बेन्डाझिम च्या प्रती रोगग्रस्त भागावरिल काही बुरशी ह्या प्रतिकारक असु शकतात. जर वापरुन नियंत्रण झाले नाही, तर पुन्हा वापर करु नये. तसेच या गटातील बेनोमिल, थायबेन्डाझोल, थायोफिनेट मिथाईल या बुरशीनाशकांचा देखिल वापर करु नये. असे केल्याने बुरशीच्या मध्ये जास्त प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होणे थांबवले जाईल. रोग दिसण्याच्या अगोदर फवारणी घ्यावी. पिकांच्या पानांवर १४ ते २१ दिवस रेसिड्युअल (बुरशीनाशक) परिणांम दाखवते. (रेसिड्युअल या शब्दाचा अर्थ रासायनिक अवषेश असा येथे अभिप्रेत नाही.) जमिनीतील पाणीसाठ्यास काही प्रमाणात घातक ठरते.