logo

जमिनीचे प्रकार - अल्युव्हियल सॉईल

अल्युव्हियल सॉईल
अल्युव्हियल सॉईल
या जमिनी ह्या नदीच्या पाणलोट क्षेत्रात तयार होतात. नदीच्या प्रवाहातील, आणि नदी जेथे समुद्रास मिळते अशा आसपासच्या भागात जेथे पुराचे पाणी वाहुन जाते अशा ठिकाणी या जमिनी तयार होतात.

गंगा, ब्रह्मपुत्रा, कृष्णा, कावेरी गोदावरी, तापी, कोयना अशा मोठ्या नद्यांच्या किनारपट्टी वर तसेच जेथे नदी समुद्रास मिळते अशा ठिकाणी या जमिनी आहेत .

भारतात अशा जमिनींचे क्षेत्र हे ४८ मिलियन हेक्टर इतके आहे.

या जमिनीत नैसर्गिक रित्या जास्त प्रमाणात पालाश असतो, तर कमी प्रमाणात स्फुरद असते. तसेच या जमिनीत सेंद्रिय पदार्थ आणि नत्राचे प्रमाण देखिल कमी असते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे ०.१ ते ०.५ टक्के इतके असते.

उंचावरिल जमिनी या आल्म धर्मिय (अँसेडिक) असतात तर सखल भागीतील जमिनी या न्युट्रल ते अल्कलाईन असतात.
जमिनीच्या १० इंच थरा पर्यंत पीएच हा ७ ते १० ईतका असतो, पण जसे जसे जमिनीत खोलवर जाऊ तितका पीएच वाढत जातो.
या जमिनीतील मातीत स्लिट (०.०५ ते ०.००२ मिमी आकारचे कण) चे प्रमाण हे, सॅण्ड (०.१ ते २ मिमी आकाराचे कण) जवळपास सारखेच असते.
काळ्या मातीच्या तुलनेत या जमिनीत क्ले (०.००२ मिमी पेक्षा कमी आकाराचे कण) यांचे प्रमाण कमी असते. शक्यतो हे प्रमाण १० ते २० टक्के ईतके असते.
या जमिनींची कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी ही ३ ते १२ meq/100g इतकी असते.
या पैकी कॅल्शियम ५० ते ८० टक्के जागा व्यापुन राहते.
सोडीयम चे प्रमाण हे २ ते १६ टक्के असते.

या जमिनीत भारतातील काही प्रमुख पिके घेतली जातात ज्यात भात, गहु, कापुस, मका, ऊस, भाजीपाला पिके, ज्युट, तेलबिया, तृणधान्ये (ज्वारी, बाजरी वै. गटातील केवळ), कडधान्ये तसेच काही फळे देखिल होतात.