logo

header-ad
header-ad

भुईमुग (Groundnut) लागवड पध्दती

जमिन आणि हवामान –

भुईमुगाची उत्तम निचरा होणा-या जमिनीत करावी. ज्या जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची जास्त क्षमता असते, अशा जमिनीत पाण्याचा निचरा न होण्याने उत्पादन घटते. २० ते ३० डिग्री सेल्सियस इतक्या जमिनीच्या तापमानाला भुईमुगाची उगवण चांगल्या प्रकारे होते. १८ डिग्री पेक्षा कमी तापमानात उगवण शक्ती कमी होते.

भुईमुगांस फुल धारणा होण्यासाठी दिवस आणि रात्रीचे तापमान यातील फरक २० डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त असु नये. सर्वसाधारण पणे दिवसाचे तापमान २७ ते २९ डिग्री सेल्सियस आणि रात्रीचे तापमान २३ डिग्री सेल्सियस असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात शेंगा आणि दाणे तयार होतात.

भूईमुगाची लागवड ३.५ ते ८.० इतक्या सामु मध्ये केलेली चालते.

भुईमुगाच्या लागवडीनंतर तृणधान्याची लागवड केल्यास भुईमुगावरिल रोग व किडींचे निर्मुलन करण्यास चालना मिळते. जमिनीतुन होणारे रोग टाळण्यासाठी तंबाखु, तसेच कापुस लागवड केलेल्या शेतात भुईमुगाची लागवड करु नये.

बियाणे आणि लागवड –

भुईमगाची लागवड हि जुन चा शेवटचा आठवडा ते जुलै चा पहिला आठवडा आणि जानेवारी शेवटचा आठवडा ते फेब्रुवारी चा पहिला आठवडा या काळात केली जाते.

भुईमुगाच्या प्रामुख्याने तिन प्रकारच्या जाती आहेत.

  • पस-या : या जातीतील भुईमुग जमिनीवर पसरतो. त्यामुळे शेंगा तयार होण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच फुल धारणा काळात पिकावर ड्रम फिरवण्याची जास्त गरज भासत नाही. एकरी बियाणे २८ ते ३२ किलो लागते.
  • निम पस-या : या जातीतील रोप कमी प्रमाणात पसरते, त्यामुळे फुलांच्या टोकाचा जमिनीशी जास्त संपर्क येण्यासाठी पिकावर हलक्या प्रमाणात ड्रम फिरवणे योग्य ठरते. एकरी बियाणे ३२ ते ३६ किलो लागते.
  • उपट्या : या जातीतील रोपे जवळपास सरळ वाढतात. एकरी बियाणे ४० ते ४८ किलो लागते.

कोरडवाहु क्षेत्रात एकरी ६०,००० रोप बसेल या पद्धतीने लागवड करावी, तर बागायती क्षेत्रात १,२०,००० रोप प्रती एकर राहील या पद्धतीने लागवड करावी.

दोन ओळीतील अंतर ७० ते ९० से.मी. ठेवावे. दोन रोपांतील अंतर ३० ते ४५ से.मी. ठेवावे.