logo

झिंक | Zinc

पिकातील ऑक्झिन्स च्या निर्मितीसाठी झिंक गरजेचे आहे. पिकाच्या शेंड्याच्या वाढीसाठी गरजेच्या इंडॉल अँसेटिक अँसिड ची निर्मिती ही झिंक पासुन होते. त्यासाठी ट्रिप्टोफॅन हे अँमिनो अँसिड कार्य करते, जे झिंक च्या वापराने तयार होते.

पिकाची नत्राचे दुष्परिणाम न भोगता, शाकिय वाढ करावयाची झाल्यास झिंक व मॅग्नेशियम सल्फेट चांगले पर्याय ठरु शकतात.

झिंक हे प्रथिनांच्या निर्मितीस चालना देणा-या एन्झाईम्स ला उत्तेजित करतात. तसेच झिंक हे पिकाव्दारा निर्मित साखरेच्या वापरासाठी गरजेचे आहे. झिंक हे स्टार्च च्या निर्मितीत गरजेचे आहे. ज्यामुळे झिंक फळांच्या विकासात देखिल कार्य करित असतात.

झिंक मुळांच्या वाढीसाठी देखिल गरजेचे आहे. पिकाच्या पक्वतेवर झिंक परिणाम करते. पिकातील हरितलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीसाठी झिंक गरजेचे आहे. पिकांत उचित मात्रेत झिंक असल्यास पिक कमी तापमान सहन करु शकते.

ज्या जमिनीत झिंक चे प्रमाण कमी असते, अशा जमिनीत पिकाच्या मुळांवर हल्ला करणारे रोग यांचे प्रमाण जास्त असते. झिंक कमतरता असलेल्या पिकास मुळांवरिल रोग हे जास्त प्रमाणात होतात.

पिकाच्या मुळांव्दारा झिंक चे शोषण हे डिफ्युजन तंत्राने केले जाते. झिंक आणि कॉपर पिकांत एकाच जागेवरुन शिरत असल्या कारणाने दोघांत पिकांच्या मुळांत शिरण्यासाठी स्पर्धा निर्माण होते. पिक झिंक हे Zn⁺⁺ च्या स्वरुपात शोषुन घेते.

झिंक जास्त सामू असलेल्या जमिनीत उपलब्ध होत नाही, मात्र हे सर्वच जमिनींवर होत नाही, झिंक सल्फेट, किंवा तत्सम अँसेडिक खतांच्या माध्यामातुन आणि मुळांच्या परिसरात झिंक देवुन हि कमतरता दुर करता येते.

जमिनीतील स्फुरद चे जास्त प्रमाण झिंक चे शोषण कमी करते.

जमिनीतील विविध सेंद्रिय पदार्थ झिक चे चिलेशन करतात, ज्यामुळे झिंक चे कार्बोनेटस, बायकार्बोनेटस सोबत होणारे स्थिरकरण कमी होते व पिकांस उपलब्धता वाढते.

पिकांस नत्राची कमतरता असल्यास साहजीकच पिकाची वाढ कमी होते, व त्यामुळे ईतर अन्नद्रव्यांची देखिल कमतरता जाणवते, ज्यात झिंक चा देखिल समावेश होतो.

मॅग्नेशियम च्या वापराने झिंक चे शोषण देखिल वाढते.

मका, कापुस, फळ पिके, मधु मका, ज्वारी, कडधान्ये, भात या पिकांस झिंक दिल्यास उत्पादनात वाढ होते.

पिकावरिल झिंक अन्नदर्व्याची कमतरता दुर करण्यासाठी अथवा पिकास झिंक चा पुरवठा करण्यासाठी सध्या जास्त प्रमाणात झिंक असलेल्या झिंक ऑक्साईड खतांचा वापर करण्याची पध्दत वाढत आहे. आपण जर माती परिक्षण केले असेल तर त्यातील झिंक चे प्रमाण हे नत्र,स्फुरद ह्यासारख्या मुख्य अन्नद्रव्यांप्रमाणे किलो प्रती हेक्टर असे न देता, ते पीपीएम म्हणजेच १० लाखात १ अशा नुसार दिले जाते. वास्तविक पाहता पिकाची झिंक ची गरज देखिल हि ५० पीपीएम पेक्षा कमी असते. अशा वेळेस मातीच्या रासायनिक गुणधर्मांशी खेळुन त्यात झिंक ऑक्साईड टाकुन झिंक चे प्रमाण जास्त वाढवणे हे शेती, माती आणि त्या शेतातील पाणी पिणारे ह्या सर्वांसाठीच दुरगामी रुपात अत्यंत हानीकारक ठरणार आहे. ऑक्साईड रुपातुन भरपुर झिंक मिळेल हि आपली भोळी आशा असते, मात्र पाण्यात न विरघळणारे ऑक्साईड रुपातील झिंक मातीत पडुन असलेल्या विविध मुलद्रव्यांसोबत संयोग तरी पावते, किंवा त्याचे रुपांतर झिंक कार्बोनेट, झिंक बायकार्बोनेट, झिंक क्लोराईड, झिंक नायट्रेट, झिंक सल्फेट यात तरी होत असते. शिवाय ऑक्साईड रुपातील मोठा भाग हा जमिनीत तसाच पडुन राहुन देखिल मातीतील झिंक चे प्रमाण धोकादायक पातळी पेक्षा जास्त प्रमाणात वाढवु शकतो. ऑक्साईड रुपातील झिंक चा वापर करावयाचा असेलच तर तो वर्षातुन जास्तीत जास्त एक वेळेस करायला हरकत नाही.

कमतरतेची लक्षणे

पिकाची शेंड्याची वाढ कमी होते. शेंड्या कडील पाने पिवळी पडतात. पानांच्या शिरांमधिल भाग पिवळा होतो.

फळ धारणा कमी प्रमाणात होते.

फळ पिकांत कमतरता सतत राहील्यास टोकाकडील फांद्या मरतात.

पानांचा आकार लहान राहतो.

झिंक युक्त खते आणि त्यातील झिंक चे प्रमाण

खताचे नांव सल्फर (%)
झिंक सल्फेट (हेप्टाहायड्रेट) 21%
झिंक सल्फेट (मोनो हायड्रेट) 33%
ई डि टि ए झिंक 12%
फेरस सल्फेट 12%
झिंक ऑक्साईड(अविद्राव्य) 65-70%