logo

कॅल्शियम | Calcium

जमिनीत पुरेस्या प्रमाणात असलेले कॅल्शियम हे अन्नद्रव्य अती जास्त प्रमाणात असल्यास जमिनीतल मुक्त बेस आयन्स सोबत स्थिरकरण होवुन कॅल्शियम कार्बोनेट जे पाण्यात कमी विरघळते आणि कॅल्शियम बायकार्बोनेट तयार होते. ज्यामुळे मातीचा सामु वाढीस लागतो.

पिकातील पेशी विभाजनात आणि पेशी लांब होण्यात कॅल्शियम गरजेचे आहे. कॅल्शियम हे पेशी भित्तिकेचा घटक असल्याने पेशीची लवचिकता ही कॅल्शियमवर अवलंबुन असते. पेशी भित्तिका तयार होण्यात कॅल्शियम गरजेचे असते. कॅल्शियम मुळे पेशी भित्तिकेस टणकपणा येतो, जे पेशी लांब होण्यात उपयोगी ठरत नाही.

कॅल्शियम फुला, फळांची गळ थांबविण्यात देखिल मदत करते. कॅल्शियम पिकाच्या शेंड्याच्या वाढीसाठी जरी मदत करित नसले तरी ते मुळांच्या वाढीसाठी मदत करते.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे फळांत पाण्याचे प्रमाण जास्त वाढते. कॅल्शियम पोटॅश ने तयार केलेल्या स्टार्च च्या वापरात गरजेचे असल्याने असे होत असेल.

अनेक रोगकारक बुरशी आणि जीवाणु पेशी भित्तिकेतील मधला थर विरघळवण्यासाठी प़लिग्लॅक्टुरोनेझ आणि पेक्टोलायचिक एन्झाईम जसे पेक्टेट ट्रान्सलॅमिनेझ स्व्रवतात, पेशी भित्तिकेत योग्य प्रमाणात कॅल्शियम असल्यास या एन्झाईम्स चा प्रभाव कमी होतो.

नायट्रेट स्वरुपातील नत्राच्या शोषणात आणि वापरात कॅल्शियम गरजेचे आहे. युरिया खतासोबत विद्राव्य कॅल्शियमचा वापर केल्यास युरीया खताचे व्होलाटायझेशन व्दारा होणारा –हास कमी करता येतो.

पिकातील एन्झाईम्स च्या क्रियाशिलते साठी गरजेचे आहे, तसेच स्टार्च च्या वापरात गरजेचे आहे.

पिक कॅल्शियम हे आयन एक्सचेंज (एक्टिव ट्रान्सपोर्ट) पध्दतीने वाहुन नेले जाते, ज्यात कॅल्शिम लिग्निन सोबत चिकटते. रसवाहीन्यात मॅग्नेशियम, सोडीयम, पालाश किंवा अमोनियम सोबत परस्पर व्यवहार होवुन त्यांची कॅल्शियमच्या बदल्यात देवाण घेवाण होवुन त्यानंतर कॅल्शियमचे वहन होते. कॅल्शियम जमिनीतुन मास फ्लो आणि रुट इंटरसेप्शन या दोन्ही पध्दतीने ग्रहण केले जाते.

कॅल्शियम पिकात आणि जमिनीत असा दोन्ही ठिकाणी सहजरित्या वाहुन नेले जाणारे चपळ असे अन्नद्रव्य नाही. त्यामुळे नियमित वापर करावा लागतो.

ज्या जमिनीत कॅल्शियम भरपुर आहे अशा जमिनीत मुक्त कॅल्शियम असेलच असे होत नाही, त्यामुळे पिकांस कॅल्शियम चा पुरवठा करणे गरजेचे ठरते, मात्र अशा वेळेस फवारणीतुन गरज पुर्ण करणे फायदेशिर ठरते.

चुनखडी जमिनीत कॅल्शियम जास्त आहे असे समजले जाते मात्र हे कॅल्शियम, जमिनीत कॅल्शियम कार्बोनेट या दुर्मिळ विरघळणा-या घटकाच्या स्वरुपात असते जे पिकास उपलब्ध होत नाही. अशा जमिनीत कॅटायन एक्सचेंज च्या जागेवरिल कॅल्शियम पिकांस उपलब्ध असते, तसेच जमिनीत पाण्याचे प्रमाण कमी असल्यास हा कॅल्शियम देखिल पिकास उपलब्ध होत नाही. चुनखडी युक्त जमिनीत सोडियम चे प्रमाण असलेले पाणी वापरल्यास जमिनीतील कॅटायन एक्सचेंज वरिल कॅल्शियम ची जागा सोडीयम घेतो ज्यामुळे पुन्हा कॅल्शियम मुक्त होवुन कॅल्शियम कार्बोनेट तयार होण्यात मदत मिळते. कॅल्शियम कार्बोनेट मुळे जमिनीस एक विशिष्ट असा कडकपणा येतो, ज्यामुळे पाण्याचे जमिनीत खाली होणारे वहन अनियमित होते. अशा जमिनीचा सामु हा जास्त असतो, त्यामुळे जवळपास सर्वच अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेत अडचणी येतात. प्रामुख्याने स्फुरद ची उपलब्धता कमालीची कमी होते.

कॅल्शियम हे एक धनभार असलेले अन्नद्रव्य आहे, जास्त प्रमाणातील पालाश च्या वापराने कॅल्शियम चे शोषण कमी होते.

ब्रोकोली, कोबी, फुलकोबी (फ्लावर), संत्री, कापुस, काकडी वर्गिय पिके, कलिंगड, खरबुज, द्राक्ष, कडधान्ये, भुईमुग, मिरची, बटाटा, तंबाखु, आणि टोमॅटो ही पिके कॅल्शियमच्या पुरवठ्यास चांगला प्रतिसाद देतात.

पिकाव्दारा कॅल्शियम चे शोषण झाल्यानंतर, रस वाहिन्यातुन त्याचा प्रवास आणि एकंदर वाहतुक होते असते. पिकाच्या जुन्या पानांव्दारा केवळ रसवाहिन्यांच्या व्दारा पाण्याचे वहन होत असल्या कारणाने, त्या पानांत किंवा तळा कडच्या भागात कॅल्शियम चा पुरवठा हा सुव्यवस्थित रित्या होत असतो, मात्र पिकाची नवीन वाढ, आणि फळे हि अन्नवाहीन्या आणि रस वाहिन्या या दोघांच्या व्दारा पाणी मिळवत असल्या कारणाने, रस वाहीन्यातुन होणा-या पाणी पुरवठ्यास मर्यादा किंवा स्पर्धा निर्माण होते, ज्यामुळे नवीन वाढीस कॅल्शियम कमी प्रमाणात मिळतो.

पिकाव्दारा रसवाहीन्यातुन पाण्याचे शोषण हे, पानांतुन होणा-या बाष्पीभवनावर अवलंबुन असल्या कारणाने, कमी सापेक्ष आर्द्रता असते तेव्हा पिकाव्दारा जास्त प्रमाणात पाण्याचे शोषण होते, तर जास्त सापेक्ष आर्द्रता असतांना बाष्पीभवनाचा वेग कमी असतो ज्यामुळे पाण्याचे वहन देखिल कमी प्रमाणात होते. परिणामी सोबत कॅल्शियम चे वहन देखिल कमी होवुन पिकाच्या नवीन आणि शेंड्या कडच्या वाढीस कॅल्शियम कमतरता जाणवते. फळांव्दारा देखिल कमी प्रमाणात बाष्पीभवन होत असल्या कारणाने, फळांत कॅल्शियम चा पुरवठा हा कमी प्रमाणात होतो.

पिकाच्या प्रत्येक पेशीत कॅल्शियम चे प्रमाण योग्य प्रमाणात राखले जाते, त्यामुळे काही पेशीत जर कॅल्शियम कमी झाले तर तेवढ्याच पेशींवर कॅल्शियम कमतरता राहते.

कॅल्शियम ची कमतरता ही पिकानुसार बदलत जाते. मिरची व टोमॅटो पिकावर ती ब्लॉसम एंड रॉट म्हणजेच फळावर पाणी शोषुन घेतल्यासारखा काळा डाग पडणे अशी दिसुन येते. तर बहुतेक पिकांत ती शेंड्याची वाढ निट न होण्याच्या स्वरुपात दिसुन येते. मका पिकातील येणारे नविन पान लवकर मोकळे होत नाही, किंवा अव्यवस्थित असे होते. तर केळी पिकात येणारे पान हे व्यवस्थित मोकळे होत नाही, त्यावर काळसर डाग पडतात. अनेक फळ पिकांत फळांना तडे जातात, फळांचा आकार वाढत नाही.