logo

फॉस्फोरस (स्फुरद) | Phosphorus

पिकातील उर्जा निर्मितीतील एक अविभाज्य घटक म्हणजचे फॉस्फोरस, नत्राच्या वापरातुन जे हरितलवक तयार झाले तथे होणा-या प्रकाश संश्लेषण क्रियेत फॉस्फोरसच्या वापरातुनच उर्जा संपन्न अशा अडीनोसाईन ट्राय फॉस्फेट (ATP) ची निर्मिती केली जाते. या क्रियेत फॉस्फोरस हा गरजेचा असतो.

शिवाय फॉस्फोरस हा उर्जा निर्मिती भरपुर प्रमाणात करित असल्याने त्या उर्जेच्या वापरातुन पिक भरपुर प्रमाणात फुलधारणा करु शकते.

फॉस्फोरस पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी देखिल गरजेचा असतो.

फॉस्फोरस प्रथिनांच्या निर्मितीत, बीज निर्मितीत गरजेचा असतो. गहु, ऊस तसेच ईतर पिकांत जेथे पिकांस फुटवे येणे गरजेचे असते त्या पिकांत फॉस्फोरस फुटवे येण्यात महत्वाचे कार्य करते.

पिकाच्या मुळांव्दारा अन्न द्रव्ये शोषुन घेण्यासाठी फॉस्फोरस व्दारा निर्मित एटीपी चा गरज भासते. फॉस्फोरस मुळे पानांचा आकार वाढण्यात, पिकास फांद्या येण्यात मदत होते. पेशी विभाजनात फॉस्फोरस महत्वाचे ठरते.

फॉस्फोरस कमतरतेमुळे पिकांच्या मुळांच्या वाढीवर परिणाम होतो. पिकांस कमी प्रमाणात फुले लागतात, तसेच ज्या फळांत बी असते अशा फळांचा आकार लहान राहतो, व पिक फळ वेळेवर परिपक्व होत नाही. कणसातील दाणे भरत नाहीत. पानांचा रंग जांभळा निळसर होतो.

पिक फॉस्फोरस हा ऑर्थोफॉस्फेट (H₂PO₄⁻, HPO₄⁻⁻) च्या स्वरुपात शोषुन घेत असते . ज्या जमिनीचा सामु जास्त असतो त्या जमिनीत HPO₄⁻⁻ च्या स्वरुपात जास्त प्रमाणात शोषण होते.

जमिनीत फॉस्फोरस कॅल्शियम, अँल्युमिनीयम व फार कमी प्रमाणात फेरस सोबत स्थिर होते.

फॉस्फोरस च्या अधिक मात्रेमुळे कॅल्शियम आणि सल्फर ची कमतरता जाणवते.

फॉस्फोरस हा एक ऋणभार असलेला घटक असल्याने इतर धनभार असलेल्या आयन्स सोबत त्याचे वितुष्टच राहते.

यास मॅग्नेशियम मात्र अपवाद ठरते, फॉस्फोरस कमी प्रमाणात असल्यास मॅग्नेशियमची देखिल कमरतता जाणवते.

ज्या जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीत फॉस्फोरस कॅल्शियम सोबत स्थिर होवुन फॉस्फोरसची आणि त्यामुळे कॅल्शियमची देखिल कमतरता जाणवते.

जमिनीत फॉस्फोरस विद्राव्य स्वरुपात फार कमी प्रमाणात (0.001 ते 1 मिलीग्रॅम प्रती लि.) असतो.

पिक फॉस्फोरस हा डिफ्युजन पध्दतीने शोषुन घेत असते. डिफ्युजन पध्दती म्हणजे जास्त प्रमाणाकुन कमी प्रमाण असलेल्या भागाकडे वहन होणे. यामुळे पिक केवळ मुळांच्या परिसरातील फॉस्फोरस शोषुन घेवु शकते. ज्यामुळे कमी प्रमाणात मुळांची वाढ असलेल्या पिकात फॉस्फोरसचे सहाजीकच कमी प्रमाणात शोषण होते.

फॉस्फोरस ची पिकांस शिफारस करत असतांना ती P (पी) च्या स्वरुपात केली जाते, आणि बाजारात मिळणा-या खतांच्या गोणीवर पी असा फॉस्फोरसचा उल्लेख कधी नसतो. त्या बॅगेवर P₂O₅ असा उल्लेख असतो. या फॉस्फोरस म्हणजे P चे P₂O₅ च्या स्वरुपात रुपांतर करणे गरजेचे असते, किंवा याच्या उलट करुन P₂O₅ चे रुपांतर P मधे करावे.

समजा एखाद्या पिकांस 27 किलो फॉस्फोरसची (P) शिफारस केलेली आहे तर त्या पिकास P x 2.29 = 57 kg इतके P₂O₅ ची शिफारस केलेली आहे हे कळेल. सध्या आपण करतो काय कि समजा वरिल मात्रा हि सिंगल सुपर फॉस्फेट मधुन पुर्ण करावयाची आहे ज्यात 16 टक्के P₂O₅ आहे, तर गणित करुन आपण ते सरळ रित्या 168 किलो सिंगल सुपर फॉस्फेट असे उत्तर काढुन खत देतो. मात्र पिकास शिफारस केलेला स्फुरद हा P₂O₅ मधे रुपांतर केल्यास तो येतो 57 किलो, आणि हा P₂O₅ सिंगल सुपर फॉस्फेट मधुन देण्याचा झाल्यास त्यासाठी 356 किलो सिंगल सुपर फॉस्फेट लागेल. ज्या खतात फॉस्फोरस चे प्रमाण हे P च्या स्वरुपात आहे त्यावेळेस 168 किलो हेच उत्तर बरोबर राहील मात्र ज्या पिकांत प्रमाण हे P₂O₅ च्या स्वरुपात आहे तेथे 356 किलो हेच उत्तर राहील.

फॉस्फेट युक्त खते हि रॉक फॉस्फेट पासुन तयार केली जातात. यामधे कोरडी प्रक्रिया जी अत्यंत महाग आहे, ती आणि रॉक फॉस्फेट सोबत अँसिड ची प्रक्रिया करुन ज्यात बाय प्रोडक्ट म्हणुन रॉक फॉस्फेट तयार होते त्याचा समावेश होतो. या दोन्ही प्रक्रियेत सारख्याच टक्केवारीचे फॉस्फोरीक असिड (H₃PO₄) तयार होते.

कोरड्या पध्दतीने तयार केले जाणारे फॉस्फोरिक अँसिड हे पांढ-या रंगाचे असते. जे अत्यंत शुध्द स्वरुपातील असल्याने महाग असुन केवळ मानवांव्दारा वापरल्या जाणा-या उत्पादनांसाठी कच्चा माल म्हणुन वापरले जाते.

वरिल दोन्ही पध्दती तयार झालेले फॉस्फोरिक अँसिड मग तापवले जाते आणि त्यापासुन सुपर फॉस्फोरिक अँसिड मिळवले जाते ज्यात 71 ते 76 टक्के फॉस्फोरस असतो. यापासुन नंतर विविध प्रमाणात फॉस्फोरस असलेले खत बनविले जाते, त्यात अमोनिया टाकला असता नत्र युक्त आणि स्फुरद युक्त खत बनविले जाते.

बाजारात मिळणारे फॉस्फोरिक अँसिड हे 85 टक्के फॉस्फोरिक अँसिड असते, म्हणजे त्यात 85 टक्के फॉस्फोरिक अँसिड (H₃PO₄) असते. त्यात फॉस्फोरस चे प्रमाण हे 51 टक्के इतके असते, म्हणजेच 1 लि. फॉस्फोरिक अँसिड मधुन पिकांस 510 मिली फॉस्फोरस मिळतो जो की 1160 मिली इतका P₂O₅ असतो.

85 टक्के फॉस्फोरीक असिड ची बल्क डेन्सिटी ही 1.685 ग्रॅम प्रती मिलि. इतकी असते, म्हणजेच 1 लि. द्रावणाचे वजन हे 1.685 किलो इतके भरेल. शिवाय 0.1N द्रावणाचा ( 2.28 मिली 85 टक्के फॉस्फोरिक अँसिड 1 लि. डि आयोनाईज पाण्यात विरघळुन तयार होणारे द्रावण) पीएच हा 1.5 इतका असतो.

डायअमोनियम फॉस्फेट (डिएपी) हे खत जमिनीचा सामु वाढवतीते तर फॉस्फोरिक अँसिड मुळे पीएच कमी होण्यास मदत मिळते.

कोणत्या स्वरुपातील फॉस्फोरस खत द्यावे हे सर्वस्वी त्याची किंमत, त्यातील फॉस्फोरसचे प्रमाण आणि वाहतुक खर्च तसचे वापरण्यातील सुविधा यावर अवलंबुन आहे.

जमिन कोणत्याही प्रकारची असली तरी देखिल त्यात फॉस्फोरस चे स्थिरिकरण हे होतच असते. त्यामुळे फॉस्फोरस ची उपलब्धता वाढावी म्हणुन स्फुरद विरघळवणारे जीवाणू वापरणे हे गरजेचेच आहे.

जमिनीत स्फुरद युक्त खत टाकल्यानंतर ते पाण्यात विरघळते, खतातील पाण्यात विरघळणारे स्फुरद जे प्रमाण दिलेले आहे ते विरघळुन त्या खताच्या कणांपासुन अत्यंत म्हणजे 0.002 सेमी प्रती दिवस या गतीने दुर जाते, संथ गती मुळे हे स्फुरद जमिनीतील कॅल्शियम, अँल्युमिनियम, फेरस आणि मॅग्नेशियम सोबत स्थिर होते. यापैकी पाण्यात जलद विरघळणारे स्वरुप पुन्हा पिकास स्फुरद लवकर उपलब्ध करुन देते, मात्र पाण्यात लवकर न विरघळणारे स्वरुप जमिनीत स्थिर होत जाते, साचत जाते.

जमिनीचा सामु हा 6 ते 7 च्या दरम्यान असतांना फॉस्फोरसची उपलब्धता जास्त असते, आणि या मर्यादेच्या बाहेर ती कमी कमी होत जाते. तशा परिस्थितीत स्फुरद ची उपलब्धता वाढावी म्हणुन विशेष प्रयत्न करावे लागतात.

युनाईटेड स्टेटस डिपार्टमेंट ऑफ अँग्रीकल्चर च्या वेबसाईट वर (http://plants.usda.gov/npk/main) विविध पिकांच्या व्दारा जमिनीतुन किती प्रमाणात अन्नद्रव्ये शोषुन घेतली जातात आणि त्यानुसार किती खत दयावे याचे एक सॉव्टवेअरच तयार केले गेले आहे. यात अन्नद्रव्य जमिनीत स्थिर होण्याचे प्रमाण, वाहुन जाण्याचे प्रमाण वै सर्व गृहित दरुन मग शिफारस केली जाते. अर्थात तेथिल हवामानाचा व एकंदर परिस्थितीचा विचार करता ते आपल्या देशासाठी पण लागु पडेल हे सांगता येत नाही, आणि ते डिपार्टमेंट देखिल तसेच सांगते. मात्र काही पिकांसाठी जेव्हा माहीती गोळा केली गेली त्यातुन जो निष्कर्श आला तो फार चमत्कारीक आणि आता पर्यंत स्फुरद या अन्नद्रव्याच्या बाबतीत जे आपण जाणुन घेतले त्यास अनुसरुन असाच होता.

ज्या पिकांत दाणे असण्याचे प्रमाण (उदा. मका, भात गहु, सोयबीन, करडई) जास्त असते त्या पिकांस एकुण नत्र, एकुण स्फुरद व एकुण पालाश च्या गरजे पैकी नत्राची गरज ही 72 टक्के तर स्फुरद ची गरज 12 टक्के आणि पालाश ची गरज ही 16 टक्के इतकी असते. म्हणजे या पिकांस नत्राची गरज हि सर्वाधिक असते तर स्फुरद ची गरज ही जवळपास पालाश इतकीच असते. यामागचे कारण असे असु शकते की, अधिक नत्राच्या वापरातुन पिकांस कमी वेळेत शाकिय वाढ पुर्ण करुन त्यापासुन दाणे तयार करावयाचे असतात, तर दाण्यांसाठी स्फुरद ची गरज असते हे आपण आधीच बघितले आहे. सोबत हा चार्ट देखिल दिलेला आहे. माहीती घेतांना आम्ही अमेरिकन मोजमापाचे मानक भारतीय पध्दतीने किलो मध्ये रुपांतर केलेले आहे, त्यामुळे आपण जेव्हा माहीती घ्याल तेव्हा हा मुद्दा लक्षात ठेवावा. याऊलट भाजीपाला आणि फळ पिकांचे हेच गुणोत्तर मात्र फार वेगळे आले आहे, या पिकांत नत्र 37 टक्के तर स्फुरद केवळ 4 टक्के आणि पालाश मात्र 58 टक्के असे गुणोत्तर आलेले आहे.

Sources of Phosphorus to plants

तापमान मातीत किती दिवस पाणी तुंबुंन होते डी नायट्रिफिकेशन
10-15°C 5 10%
10-15°C 10 25%
23-26°C 3 60%
23-26°C 5 75%
23-26°C 7 85%
23-26°C 9 95%