logo

header-ad
header-ad

कापुस पिकावरिल अस्कोशिया ब्लाईट (स्टेम कँकर, वेट वेदर ब्लाईट)

फोमा एक्झ्युगा (पुर्वीचे नाव अस्कोशिया गॉसिपी) ह्या बुरशीमुळे हा रोग होतो. हि बुरशी कापुस पिकाच्या व्यतिरिक्त सोयाबीनसृ, मका, आणि बीन्स पिकांवर देखिल दिसुन येते. पानांवर तपकिरी अथवा करड्या रंगाचे ठिपके दिसुन येतात.

ह्या ठिपक्यांच्या भोवताली लालसर रंगाचे वलय दिसुन येते. रोग वाढीस लागल्यास पाने तपकिरी रंगाचे हावुन मरतात. खोडावर असलेल्या डोळ्यांच्या भाग हा काळसर रगांचा होतो, तसेच त्यावर बुरशीची वाढ दिसुन येते. ज्या ठिकाणी पानांची मर झालेली आहे त्याच्या पासुन सहसा खालील बाजुस अशा प्रकारे खोडावर बुरशीची वाढ दिसुन येते.

रोगाच्या वाढीसाठी थंड आणि आर्द्रतापुर्ण वातावरण पोषक ठरते. जास्त काळ रोगासाठी पोषक वातावरण राहील्यास बुरशीमुळे खोडास छिद्र देखिल पडुन, रोप मरुन जाते.

नियंत्रण

सध्या तरी ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी लेबल क्लेम असलेले बुरशीनाशक उपलब्ध नाही.

लेबल क्लेम नसल्या कारणाने ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी बहु आयामी बुरशीनाशके जसे कॅपटन, मॅन्कोझेब, बावीस्टिन, कॉपर ऑक्सिक्लोराईड, कॉपर हायड्रॉक्साईड, बेनोमील (बंदी आहे का ते तपासुन घेणे), थायोफिनेट मिथाईल ह्या पैकी एकाचा वापर करता येईल.

अस्कोशिया ब्लाईट (फोमा एक्झ्युगा)
अस्कोशिया ब्लाईट (फोमा एक्झ्युगा)