logo

रेड सॉईल (लाल माती)

जास्त प्रमाणातील लोह (फेरिक ऑक्साईड) असलेल्या या जमिनींना लोहामुळेच नैसर्गिक असा लाल रंग प्राप्त होतो. भारतात या जमिनी जवळपास ३० मिलीयन हेक्टर वर पसरलेल्या आहेत.

भरपुर प्रमाणत पाणी वाहुन गेल्यामुळे झिज झालेल्या या जमिनीत माती जास्त खोल वर नसते.

प्रामुख्याने यात स्लिट (०.५ ते ०.०२ मिमी) आणि सॅण्ड (०.१ ते २ मिमी) यांचे प्रमाण जास्त असते.

क्ले (०.००२ पेक्षा कमी आकाराचे कण) यांचे प्रमाण कमी असते.

या जमिनी ह्या नैसर्गिक रित्या अँसेडिक (सामु ७ पेक्षा कमी) असतात. या जमिनीत तेलबीया, कडधान्ये घेतली जातात.