Tomato

Thrips

Thrips Tabaci
Thrips Tabaci

Thrips

Thrips Tabaci
Thrips Tabaci

Thrips

Thrips Tabaci
Thrips Tabaci

Thrips

Thrips Tabaci
Thrips Tabaci

Thrips

Thrips Tabaci
Thrips Tabaci

Thrips

Thrips Tabaci
Thrips Tabaci

Thrips

Thrips Tabaci
Thrips Tabaci

Thrips

Thrips Tabaci
Thrips Tabaci

Thrips

Thrips Tabaci
Thrips Tabaci

Thrips

फुलकिडे हे अनेक धान्य, तेलबिया, कापुस, भाजीपाला आणि फळ पिकांवर हल्ला करतात. उबदार वातावरण, कमी आद्रता आणि पिकावरिल कोवळी फुट आणि फुलांची वाढलेली संख्या यामुळे फुलकिडे पिकाकडे आकर्षले जातात. फुलकिडे किडीची मादी ही पानांत किंवा पानांच्या वर, कळ्यांच्या देठाजवळ, फळांच्या देठा जवळ किडनीच्या आकाराची किंवा गोलसर अंडाकृती आकाराची अंडी देतात. अंड्यातुन पिल्ले बाहेर आल्यानंतर ते दोन अशा अवस्थांतुन जातात ज्यामुळे ते पिकांस हानी पोहचवतात, त्यानंतर कोषपुर्व अवस्था आणि कोष अवस्था अशा दोन गैर नुकसानकारक अशा अवस्थांतुन जावुन प्रौढ अवस्थेत जाते. कोषावस्था हि जमिनीत किंवा पानांवर पुर्ण केली जाते, अर्थात या अवस्थेत पुर्ण अशी कोषावस्था जी ईतर किडीत दिसुन येते ती नसते.

फुलकिडे हे एका वर्षात ८ पर्यंत पिढ्या तयार करुन शकतात, वातावरण पोषक असे उबदार असेल तर एक पिढी २ आठवड्यात देखिल पुर्ण होते.

या किडीची तोंडाची रचना हि एका विशिष्ट प्रकारची असते, ज्यात करवतीसारखे पाते असलेला भाग असतो जो, पानांना, फळांना, कळ्यांना खरवडतो आणि तसे खरवडल्यानंतर त्यातुन जो रस स्रवतो तो रस हि किड ग्रहण करते. असे खरवडल्याने फळांवर, पानांवर डाग पडतात

टॉसपोव्हायरसे जे पिकावर होणा-या व्हायरस रोगांच्या टॉसपोव्हायरस जीनस मधिल व्हायरस आहेत हे सर्व फुलकिडे (थ्रिप्स) व्दारा पिकांमध्ये वाहुन नेले जातात. फुलकिड्यांच्या  जगभरातील 1710 ज्ञात प्रजातींपैकी 14 प्रजाती ह्या व्हायरस पसरवित आहेत.

शाश्वत (Persistent) - पुर्नउत्पादक (प्रोपोगेटिव्ह) पद्धतीने हा व्हायरस फुलकिड्यांव्दारे पसरत असतो. किडीची अळी (nymph stage) अवस्था हि प्रामुख्याने व्हायरस चे ग्रहण करते, त्यानंतर किडीच्या शरिरात वाढुन हा व्हायरस किडीच्या प्रौढ अवस्थेव्दारे प्रसारित केला जातो. d (Wijkamp et al.1996a, Ullman et al. 1997, Whitfield et al. 2005, Persley et al. 2006) प्रौढ फुलकिडे व्हायरस ग्रहण करु शकतात मात्र त्यांच्या व्दारा, त्यांच्या शरिरात वाढण्यास पुरेसा वेळ न मिळाल्याने तसेच लाळ ग्रंथींपर्यंत न पोहचल्यामुळे त्यांच्या व्दारा व्हायरस चे प्रसारण होत नाही. हा व्हायरस अंड्यांव्दारे एका पिढीतुन दुस-या पिढीकडे जात नाही.

किडीची अळी अवस्था(nymph stage)  हि व्हायरस ग्रहण करीत असते हे आपण आधीच बघितले आहे, सर्व साधारणपणे फुलकिडे किडीची प्रौढ अवस्था दृष्टीस पडल्यानंतर त्यावर उपाय योजना केली जाते, मात्र त्या आधीच अळी अवस्थेने व्हायरस ग्रहण करुन तो प्रसारण योग्य तयार करुन ठेवलेला असतो, यामुळे अशा वेळेस किडीचे अनुकुल वातावरणात येणे ग्रृहीत धरुन त्यानुसार उपाययोजना करणे गरजेचे आहे. सर्वसाधरणपणे लक्षात घेता (फुलकिड्यांची प्रत्येक प्रजाती वेगवेगळ्या पद्धतीने जीवक्रम अनुसरत असते) फुलकिड्यांची मादी हि एका वेळेस 50 अंडी देते, जी पिकाच्या पानांच्या, फुलांच्यास फळांच्या पेशीत दिली जातात. यातुन 5 दिवसांत पिल्ले बाहेर येतात, जी एका दिवसात दुस-या इनस्टार मध्ये रुपांतरीत होतात, 4-5 दिवसांनी प्युपा तयार होतो, यातुन 3 दिवसांत प्रौढ बाहेर येतो, तापमानाचा फुलकिड्यांच्या जीवनक्रमावर विषेश परिणाम होतो. सर्वसाधारणपणे असे 7 ते 22 दिवसांचे आयुष्य हे वातावरणानुसार असते.

 फुलकिड्यांमुळे जे व्हायरस पसरतात त्यांची नावे खालिल प्रमाणे -

भुईमुगावरिल रिंगस्पॉट व्हायरस ,इप्केशियस नेक्रोटिक स्पॉट व्हायरस, टोमॅटो क्लोरोटिक स्पॉट व्हायरस, टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस, टोमॅटो यलो फ्रुट रिंग व्हायरस,  मेलॉन यलो स्पॉट व्हायरस, टरबुजावरिल सिल्व्हर मोटल व्हायरस, भुईमुगावरिल यलो स्पॉट व्हायरस, मिरची वरिल क्लोरोसिस व्हायरस. (संदर्भ -Nagata and de A´ évila 2000, Nagata et al. 2004, Wijkamp et al. 1995, Sakurai et al. 2004, Whitfield et al. 2005, Corteˆs et al. 1998, Hsu et al. 2010, Golnaraghi et al. 2007, Gopal et al. 2010, Iwaki et al. 1984, Tsuda et al. 1996, de Bordo´ n et al. 1999, Ohnishi et al. 2006, Meena et al. 2005)

Blog

Explore Our Blog

श्री छत्रपतींची नियोजन शैली आणि शेती.

4 weeks ago