श्री छत्रपतींची नियोजन शैली आणि शेती.
श्री छत्रपतींची नियोजन शैली आणि शेती.

श्री छत्रपतींची नियोजन शैली आणि शेती.

श्री छत्रपतींची नियोजन शैली आणि शेती.
श्री छत्रपतींची नियोजन शैली आणि शेती.

महाराष्ट्र म्हणजे, छत्रपती शिवरायांची भुमी हेच चित्र डोळ्या समोर येते. महाराजांची गुप्तहेर यंत्रणा, युध्द शास्रातील गनिमी कावा, शत्रु बेसावध कधी असतो हे माहीत करुन त्यावर केलेला हल्ला. आपण सगळ्यांनी हा ईतिहास वाचलेला आहे. महाराजांच्या राज्यात एक शेतकरी म्हणुन काम करत असतांना, महाराजांची हि रणनिती शेतीत उपयोगी ठरु शकते का...?
नक्कीच उपयोगी ठरु शकते. किड, रोग नियंत्रण असो किंवा खत व्यवस्थापन या सर्वच क्षेत्रात महाराजांची रणनिती लाभदायी ठरु शकते.

प्रत्येक सजिवाच्या जीवनासाठी ठराविक तापमान आणि आर्द्रता हि गरजेची असते. सुक्ष्मजीवांच्या बाबतीत देखिल हि बाब सुटलेली नाही. पिकावर रोग येण्यासाठी हवामान + पिक (होस्ट) + रोग किंवा किडीचे ईनॉक्युलम (सुप्तावस्था, प्रौढ, अंडी वै.) या तिघांचा जेव्हा संगम होतो त्याच वेळी पिकावर किड व रोगाचा हल्ला होत असतो. या तिघांपैकी एक जरी घटक नसला तरी देखिल पिकावर किड अथवा रोगाचा प्रकोप होत नाही.

प्रत्येक अन्नद्रव्याचे दुस-याशी संबध आहेत. प्रत्येकाला विरघळण्यासाठी वेगवेगळा पीएच लागतो. पिकानुसार आणि वाढीच्या अवस्थेनुसार प्रत्येक अन्नद्रव्याची वेगवेगळी अशी गरज असते.

पिकावर किडीचा हल्ला झाल्यानंतर अंडी अवस्था पुर्ण होवुन त्याची पिल्ले बाहेर येवुन उपद्रव करणे या दरम्यानचा जो काळ असतो तो, 3 ते 7 दिवसांचा असतो.

अनेक रोगांची लागण झाल्यानंतर पहिले लक्षण दिसण्यासाठी 7 ते 45 दिवसांचा कालावधी लागतो. आपण या बाबतीत सविस्तर माहीती घेणार आहोतच तुर्तास या लेखाचा उद्देश आहे कि, छत्रपति शिवाजी महाराजांच्या कुशल तंत्रज्ञानाचा आपण अवलंब करु शकतो का?

वातावरण खराब असते तेव्हा रोगाची लागण ही होत असते. रोगाची लागण होण्यासाठी पिक आणि हवामान हि दोन परिमाणे आपणांस माहीत असतात. पैकी हवामान आणि त्यावर आधारित सुविधा या एग्रीप्लाझा कडुन मोफत पुरविल्या जातात. पिक अगदिच नविन सहसा नसते आणि योग्य ती पिक फेरपालट करुन घेणे आता अनेकदा होत नाही. हि गोष्ट तशी चांगली देखिल आहे, की एकसारखे पिक किंवा एकाच वर्गातील पिक वारंवार सतत घेतले जात असल्याने आपण अचुकपणे रोग व किड कधी येईल हे हमखास सांगु शकतो. पिक आणि रोग किंवा किडीचा ईनॉक्युलम हा शेतात आहेच हे या अशा पिक पद्धतीतुन समजणे शक्य होते.

जेव्हा कळाले की शत्रु आता परिसरात येतो आहे तेव्हा महाराजांची हेर यंत्रणा शत्रुची इथ्यंभुत माहीती गोळा करुन आणायचे. तशातलाच हा काहीसा प्रकार आहे. पिक कोणते आहे आणि जर ते शेतात वारंवार होते आहे, किंवा त्या परिसरातील ते एक मुख्य पिक आहे तर त्या पिकावर रोग, किड कोणते येतिल हे आता माहीत झालेले आहे. त्याच प्रमाणे, प्रत्येक किड व रोगासाठी गरजेचे योग्य तापमान देखिल आपणास आता एग्रीप्लाझा तर्फे कळते आहे. शत्रुच्या गोटातील माहीती आता हाताशी आहे.

महाराज ज्या प्रमाणे शत्रु वर गनिमी कावा करुन हल्ला करायचे त्याच प्रमाणे आपण देखिल पिकांच्या किड व रोग या शत्रुंवर गनिमि कावा करुन हल्ला करु शकतो. या बाबत सविस्तर आपण पुढिल भागात बघणार आहोतच.

महाराजांकडे मर्यादित मावळे, मर्यादित शस्रे, आणि शत्रु ईतकी सुविधा नसल्याने, जगातील हि गनिमी कावा युध्द शैेली महाराजांनी सर्वप्रथम शोधुन काढली. अशा पध्दतीने छापा टाकुन शत्रु बेजार करता येवु शकतो, आणि युध्द जिंकता येते हे महाराजांनी जगाला शिकवले. आपले भाग्य थोर की आपण हा वारसा आपला वारसा आहे हे छातीठोकपणे सांगु शकतो.

मर्यादीत आर्थिक बळ, महागडी झालेली मजुरी ही अगदी राजांच्या सारखीच अवस्था आज आपली देखिल आहे. राजांचे मावळे आहोत अस आपण अभिमानाने म्हणत असतो. मग राजांच्या कडुन हि युध्द निती शिकल्यानंतर त्याचा वापर आपण शेतात करु शकतो का? नक्किच करु शकतो.

जेव्हा पिक सुरवातीच्या वाढीच्या काळात असते तेव्हा त्या पिकांस जोमदार वाढ होईल हा विषय जिव्हाळ्याचा असतो. यात होणारी वाढ अजुन जास्त वेगात कशी करता येईल हा विषय जास्त संवेदशील ठरतो. पिक लहान असतांना, त्याचा वाढीचा वेग हा प्रचंड असतो. अशा वेळी, पिकांत जास्तीत जास्त प्रमाणात सुक्रोज साखर तयार झाली तर ती साखर वेगात वाढीसाठी खर्च केली जाते. हि सुक्रोज साखर पिकाव्दारा जो नायट्रेट रुपातील नत्र शोषुन घेतला जातो त्याचा वापरातुन तयार केली जाते.

या अशा प्रसंगी सरकारी खते मदतलीा असतात. यात अनेक प्रश्न आणि शंका मनात असतील त्या थोड्या बाजुला ठेवुन आपण बघुया कि यातुन नेमका काय फायदा होवु शकतो. पिक लागवडीपुर्वी जर बेसलडोस भरलेला असेल तर तो राजांच्या गुप्तहेरांसारखा काम करत असतो. त्यातुन दिली जाणारी सिंगल सुपर फॉस्फेट, डि ए पी, एम ओ पी, 10-26-26 सारखी खते हि एका दृष्टीने स्लो रिलिझ अशी खते असतात. ती पाण्यात झटकन विरघळत नाहीत हे त्यांचे वैशिष्ट्य कुशल मनुष्यबळ जसे राजांनी उभे केले अगदी त्या सारखे आहे. हि खते पाण्यात झटकन विरघळत नसल्याने पिकांस हळु हळु खते मिळत असतात. ज्यामुळे होते काय की पिकाची अतिरिक्त अशी जोमदार वाढीस अटकांव घातला जातो. पर्यायी रस शोषक किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळता येणे शक्य होते. आपणांस जर आधीपासुन माहीती आहे कि, अमुक पिकावर सरुवातीच्या काळात रसशोषक किडी आणि त्यामुळे व्हायरसची समस्या हि मोठी असते तर अशा प्रसंगी केलेली ही उपाययोजना चांगली ठरते. शिवाय बदलत्या वातावरणात कधी किती पाऊस किती दिवस पडेल याचा आता भरवसा राहिलेला नाही. अशा बिकट परिस्थितीत पिकांस पावसाच्या माध्यमातुन मिळणारा फुकटचा नत्रच केवळ न मिळता, आपण ड्रिप ने वॉटर सोल्युबल जरी देवु शकत नसलो तरी पिकांस आधीपासुन जमिनीत असलेली खते स्फुरद व पालाश देत राहतात. सरुवातीचे 30 ते 40 दिवस अशांत निघुन जातात. अनेक शेतकरी जीवाणू वै वापरत असतात त्यातुन जो फायदा होतो तो वेगळा.

जेव्हा गरज भासते तेव्हा फवारणीतुन वॉटर सोल्युबल घेतले तर त्याला पिकांकडुन जास्त उत्साहवर्धक असा रिस्पॉन्स दिला जातो. कारण नेमकी गरज असते तेव्हा ती जावुन पोहचतात. राजे कसे योग्य वेळ साधुनच शत्रुवर हल्ला करत अगदी तसेच.

असही वॉटर सोल्युबल फक्त किंवा सबसिडी खते (सिंगल सुपर फॉस्फेट, एम ओ पी, 10-26-26-12-32-16 या सारखी खते जी 45-50 किलो मधे मिळतात आणि ज्यांस सरकार सबसिडि देते म्हणुन सबसिडी वाली खते किंवा सरकारी खते असे आपण येथुन पुढे संबोंधत जावु), किंवा फक्त सेंद्रिय पदार्थ असे एकटेच वापरुन ईकॉनॉमिकल उत्पादन मिळत नाही असाच सर्व संशोधन केंद्रांचा अहवाल आहे. मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ, 60-80 टक्के सरकारी खते आणि त्यानंतर जेव्हा पिकाची महत्वाची वाढीची अवस्था असेल तेव्हा ब्रह्म्रास्रा सारखी अचुक वेध घेणारी विद्राव्य खते वापरुन खर्च तर कमी होतोच मात्र सोबत उत्पादन देखिल ईकॉनॉमिकल मिळते.

खत व्यवस्थापनात हा गनिमी कावा अनेक पिकांत फायदेशीर ठरु शकतो. शिवाय शेतकरी बांधवांनी या सरकारी खतांची शेणखत, गांडुळ खत यांचे सोबत भट्टी लावुन खते देण्याची जी पध्दत विकसित केली आहे ती खरे तर राजांच्या शुर आणि हुशार मावळ्यांना शोभेशी अशीच आहे. गरज हि शोधाची जननी असते, आणि त्यानुसार शास्रा म्हणजेच सायन्स ला धरुन विकसित करण्यात आलेली हि पध्दती जास्त सुरक्षित, कोणत्याही जमिनीत अवलंबता येईल आणि फायदेशीर ठरेल अशीच आहे.

शिवाय झिंक, फेरस, कॉपर सारखी सुक्ष्म अन्नद्रव्ये पिकावरिल रोग नियंत्रणात देखिल फार मदतची ठरतात. हि अशी अन्नद्रव्ये आहेत जी पिकाची शक्ती वाढवतात, पिकांस पोषण देवुन प्रत्यक्ष उत्पादन वाढविण्यात सहभाग घेतात, आणि रोगावर देखिल काही प्रमाणात हल्ला करु शकतात. योग्य निर्णय घेतला तर रोग नियंत्रणावरिल खर्च काही अंशी कमी होवुन तो खर्च पिकाचे उत्पादन खरोखर वाढवतात अशा गोष्टींवर कऱण्यासाठी हात मोकळा राहतो.

Blog

Explore Our Blog

श्री छत्रपतींची नियोजन शैली आणि शेती.

4 weeks ago

श्री छत्रपतींची नियोजन शैली आणि पिक संरक्षण

4 weeks ago

Management of Ginger Bacterial Wilt

2 months ago

Bacterial Wilt - Zinc and Water Management

2 months ago

Combined Role of Zinc and Ferrous and Bacterial Wilt

2 months ago

Watermelon Rind Necrosis

2 months ago

About Us

Welcome to Agriplaza

Welcome to Agriplaza. India's first and only comprehensive digital platform dedicated to agriculture and farmers. Explore widest range of related data our figures speaks a lot.

167871

Visitors

164

Diseases

20

Pests

Explore More

Data Driven Agriculture

Explore With Agriplaza