White Fly
White Fly
White Fly
White Fly
White Fly
टोमॅटो किंवा इतर पिकांतील पांढरीमाशी नियंत्रणात आणणे का कठिण जाते, तसेच त्यामुळे पसरणारे व्हायरस का घातक ठरतात - (तापमान आणि आर्द्रता यांच्या दृष्टीकोनातुन)
पांढरी माशीची मादी, पानांच्या वर किंवा खालच्या बाजुला अंडी देते. अंडींची संख्या ही तापमानावर आधारीत असते, ज्यात 28 डि.से. तापमान हे सर्वात पोषक ठरते. पांढरी माशीच्या अंड्यातुन 5 ते 9 दिवसांत पिल्ले बाहेर येतात. त्यानंतर 4 निफ्मल (अळी) अवस्थांतुन जावुन प्रौढ तयार होतो. पांढरी माशी चा जीवन क्रम हा 16 ते 31 दिवसांत पुर्ण होतो. बिकानेर कृषी विद्यापिठात केलेल्या प्रयोगातुन 7.1 डि.से. (min) ते 20.5 डि.से. (max) तापमानात किडीचा प्रादुर्भाव सुरु झाल्याचे आढळुन आले. किडीचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा 35 डि.से. तापमानात आणि आर्द्रता 17 ते 55 टक्के असतांना आढळुन आला. पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर, दिवसाचे कमी तापमानात होणारी घट ही किडीच्या संख्येवर काही अंशी विपरित परिणाम करते.
पंत नंगर येथील संशोधनात किडीच्या
वाढीसाठी 4 ते 42 डि.से. तापमान आणि 93 टक्के पर्यंत आर्द्रता ईतकी मोठी
रेंज योग्य ठरते असे आढळुन आले. याठिकाणी टोमॅटो पिकातील (खरिप टोमॅटो)
ऑगस्ट महिन्यात सुरु झालेला पांढरी माशीचा प्रार्दुभाव हा फेब्रुवारी
महिन्या पर्यंत आढळुन आला, जसे तापनात कमी आणि आर्द्रता वाढत गेली तसा काही
प्रमाणात किडीच्या संख्ये वर विपरित परिणाम दिसुन आला.
तर शेजारील पाकिस्तान देशात कापुस पिकावरिल अभ्यासात 55 टक्के आर्द्रता आणि 49.7 डि. से. तापमाना पर्यंत किडीचा प्रादुर्भाव आढळुन आला.
एंकदर रिसर्च रिपोर्ट बघता, तापमान व आर्द्रता यांचा खुप जास्त असा परिणाम पांढ-या माशीच्या वाढीवर प्रत्यक्ष पणे दिसुन येत नाही, ज्यातुन ठोस असा काही निष्कर्ष काढता येईल.
किडीच्या अंडी देण्याच्या काळात, योग्य वेळी करण्यात आलेली फवारणी ही किडीची संख्या नियंत्रित करण्यास मदत करु शकते. तसेच पिकाची व्हरायटी, व लागवडीचा हंगाम यात महत्वाची भुमिकी पार पाडतो.
खरिप हंगामातील लागवडीवरिल जुलै ते ऑगस्ट महिन्यात किडीचा
प्रादुर्भाव सुरु होतो, तर रब्बी पिकातील लागवडीत जानेवारी-फेब्रुवारी
महिन्यात किडीचा प्रादुर्भाव सुरु होतो असे एकंदर निरिक्षण काही प्रयोगात
नोंदविले गेले आहे.
टोमॅटो पिकांत मुख्यत्वे करुन फुलोरा अवस्थेच्या आसपास किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरवात दिसुन येते.पांढ-या माशी मुळे लिफ कर्ल व्हायरस चा प्रसार होतो.
सिल्व्हर व्हाईट फ्लाय चे आयुष्य हे साधारणपणे उबदार वातावरणात 18 ते 28 दिवसांचे असते तर थंड वातावरणात 30 ते 48 दिवसांचे असते. पांढ-यामाशीने व्हायरस ग्रहण केल्यानंतर सादारणपणे 24 तासात तो व्हायरस किडीच्या शरिरात प्रवास करुन तीच्या लाळे मध्ये एकत्र होवुन पिकामध्ये प्रादुर्भाव करण्यासाठी तयार होतो. एकदा अशी क्रिया घडल्यानंतर पांढरी माशी पुर्ण आयुष्यभर प्रादुर्भाव करु शकते. पांढ-यामाशी मुळे विविध पिकांवर जे व्हायरस पसरतात त्यांची नावे पुढील प्रमाणे - टोमॅटो लिफ कर्ल व्हायरस, ककुंबर यलो व्हायरस.
संदर्भ - Denis Persley and Cherie Gambley (DEEDI) as part of the Horticulture Australia Limited project VG0 7128-Integrated management of viral diseases in vegetables.