ज्याकाळी मुघलांच्या आक्रमणानंतर स्वराज्य हि संकल्पना शेकडो वर्षात विस्मृतीत गेली होती, त्याच काळी एका तरुणाने स्वराज्याची कल्पना करुन त्यासाठी गरजेची असलेली सर्व यंत्रणा ज्यात मनुष्यबळ, गडकोट, आर्थिक गरजा या सर्व अक्षरशः शुन्यातुन उभ्या केल्यात. स्वामी विवेकानंद म्हणतात तसे माणसाने पैसा निर्माण केला, पैशाने माणुस निर्माण नाही केला. स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक वेळा उदाहरण देत. शुन्यातुन विश्व निर्मिती करणारे महाराज आज शेकडो वर्षांनंतर ही जनसामान्यांच्या मनावर राज्य करत आहे, देवत्व प्राप्त करुन आहे. महाराजांनी या सर्व गोष्टी आपल्याला मिळतील हा विचार सुध्दा मनात कधी आणला नसेलच, अगदी राज्याभिषेकांसही त्याचां विरोधच होता. आपले भाग्य थोर कि अशा राजांच्या राज्यात मराठी म्हणुन जन्म मिळाला.
महाराजांची हेर निती आणि कार्य पद्धती फार महत्वाची होती. त्या विषयावर अनेक तज्ञांनी सखोल माहीती देखिल दिलेली आहे. राजांचे शत्रु हे नक्किच बलाढ्य, बक्कळ सैन्यबळ असलेले असे होते. शेकडो मावळ्यांच्या सोबत राजांनी हजारांनी शत्रु येवुन गेलेत आणि महाराजांनी लिलया ते शिवधनुष्य पेलेले.
राजांनी जेव्हा तोरणा जिंकला होता तेव्हा अगदी बोटावर मोजता येतील ईतक्या सहका-यांच्या सोबत तोरणा सर केला होता. त्यानंतर स्वराज्याचा पाया रचत रचत राजांनी शेकडो गड किल्ले जिंकुन मुहुर्तमेढ रोवली. या सुरवातीच्या काळात राजांसाठी जीवाची बाजी लावणारी मंडळी राजांच्या सोबत होती. कोणत्याही कामात सुरवात हि कठिण असते. राजांच्या कडे मावळ्यांना पगार देता येतील ईतके आर्थिक बळ देखिल कदाचित त्यावेळी नसेल. स्वराज्याची निर्मिती झाल्यानंतर जसे स्वराज्य मोठे होत गेले तसे राजांनी सुरत स्वारी करुन राज्याच्या कारभारासाठी धन जमा केले. वाढलेले स्वराज्य आणि काम करणा-या प्रत्येकाला योग्य मोबदला हे धोरण राजांनी उदाहरण म्हणुन समोर ठेवले आहे.
टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची आणि जवळपास सर्वच पिकांच्या बाबतीत यांच्या आधारे आपण म्हणु शकतो की, पिकाच्या बाबतीत देखिल हाच नियम लागु होतो.
टोमॅटो सारख्या पिकात, नत्र, स्फुरद आणि पालाश ची गरज ही पिकांस फळ धारणा झाल्यानंतरच वाढत वाढत जाते. सुरवातीच्या काळात कमी गरज असते. त्यामुळे याआधीच्या लेखात आपण ज्या पध्दतीने खत व्यवस्थापन बघितले तसेच कदाचित अधिक योग्य ठरु शकेल असे वाटते. या बाबतीत आपण सर्कल या वेबसाईट वर माती आणि खत व्यवस्थापन या कोर्स मधे सविस्तर माहीती दिलेली आहे.
राजांची गुप्त हेर यंत्रणा हि स्वराज्याच्या आत्म्याचा एक महत्वाचा भाग होती. शत्रुच्या गोटातुन माहीती काढुन आणुन शत्रुची जमेची-कमजोर बाजु अचुक पणे हेरुन त्यानुसार नियोजन करणे या यंत्रणेमुळे शक्य होत गेले असेल यात संशय नाही.
पिकाच्या वर येणा-या विविध किड व रोगांच्या बाबतीत देखिल आपण आता नविन तंत्रज्ञानामुळे गुप्त माहीती मिळवु शकतो. याआधी आपण बघितले की, किडीची लक्षणे आणि रोगाची लक्षणे पिकावर प्रत्यक्षपणे दिसण्यासाठी 3 ते 45 दिवस लागतात. आज आपल्या कडे हवामान आधारित, सॅटेलाईट आधारित यंत्रणा अशा उपलब्ध आहेत की, कोणत्या किड व रोगासाठी वातावरण पोषक तयार होते आहे हे आपण आधीच जाणून घेवुन त्यानुसार नियोजन करु शकतो. शिवाय किटकनाशके आणि बुरशीनाशके यांच्यात आता अनेक असे पर्याय उपलब्ध आहेत जे प्रतिबंधकात्मक म्हणुन कार्य करु शकतात. एकात्मिक किड नियंत्रण पध्दतीतुन आपणांस चिकट सापळे, फेरोमोन ट्रॅप्स यांची देखिल उपलब्धता आता आहे.
अनेक ठिकाणी पिकावर नियमित फवारणी घेण्याची पध्दत आहे. तर काही ठिकाणी 7 ते 15 दिवसांतुन एकदा फवारणी घेण्याची पध्दत आहे. या दोन्ही पध्दतीत राजांची गुप्तहेर निती जर अवलंबली तर फायदा होणार आहे.
ज्या ठिकाणी नियमित फवारणी घेतली जाते तेथे अधिक योग्य किटकनाशक, बुरशीनाशक निवडता येईल, तर ज्या ठिकाणी कमी फवारणी केली जाते, तेथे कोणता रोग अथवा किड येणार आहे याची आधीच माहीती मिळुन नेमके गरजेची उपाययोजना करता येणे शक्य होईल असे वाटते.
महाराजांनी त्यांच्या आयुष्यात किती लढाया आणि युध्द लढले असतिल याची मोजपाम शक्य नाही. शिवाय त्यांच्या मनातील जे विचारांचे युध्द असेल त्याची तर आपण कल्पना देखिल करु शकत नाही. म्हणजे अस तर होत नाही ना की, गुप्तहेर यंत्रणा, शुर मावळे, गनिमिकावा हे सगळ असल्याने राजांच्या वर नंतर कधीच संकट आले नाही. महाराज शेवटच्या क्षणा पर्यंत स्वराज्यासाठी लढतच राहीले. एक संपले की दुसरे संकट समोर उभे ठाकत होते. आज शेतकरी देखिल याच अशा प्रकारच्या समस्यांना तोंड देवुन ठामपणे उभा आहे.
महाराजांच्या या सर्व कुशल नियोजनाचा नेमका उपयोग काय असेल याचा विचार केला तर लक्षात येते की, राजे जितके शुत्र मारत होते त्याच्या तुलनेत मावळे फार कमी शहिद होत होते. शत्रु अनेक प्रयत्न करुन देखिल स्वराज्यावर त्याची सत्ता स्थापन करु शकला नाही. संभाजी महाराज आणि त्यानंतर देखिल शत्रुला तसे करणे शक्य झाले नाही. औरंगजेब तर दिल्ली सोडुन महाराष्ट्रात येवुन जिवनाचा अंत करुन बसला. शत्रु जेव्हा फक्त विजय मिळवायचा आणि त्याच्या सैन्याचे काहीही होवो याचा विचार करत नव्हता तेव्हा महाराजांचे नियोजन हे कमीतकमी नुकसान आणि जास्तीत जास्त शत्रु नाश असे होते असे आपण म्हणु शकतो.
अगदी त्याच पध्दतीने, जेव्हा आपण प्रतिबंधकात्मक उपाययोजना करुन देखिल पिकावर किड व रोग दिसुन येतात तेव्हा आपले नियोजन चुकले असे होत नाही. योग्य वेळी केलेली प्रतिबंधकात्मक उपाययोजना ही नंतरचे महागडे स्प्रे वाचवते. हि बचत केवळ दुस-याशी तुलना केल्यानंतर लक्षात येते, ज्याठिकाणी अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत.
हवामानाच्या आधारे नियोजन करत असतांना, पिकावर रोगाची लागण झालेली असतांना केली जाणारी फवारणी करत असतांना, आपणांस दिवसागणिक हे कळु शकते की, कोणत्या काळात रोगाच्या वाढीसाठी पोषक वातावरण दिसुन येत नाही. नेमक्या त्या काळात जेव्हा रोगाच्या वाढीसाठी पोषक वातावरण नसते तेव्हा उपाययोजना केल्यास रोगाचा प्रभाव कमी होण्यात वातावरणाची देखिल सोबत मिळुन, जास्त काळासाठी नियंत्रण मिळणे शक्य होते.
जीवाणूजन्य रोग जे विशेष करुन रसशोषक किडिंच्या आक्रमणानंतर, पिकांस जखमा झाल्यानंतर वाढतात त्यांच्या नियंत्रणासाठी रसशोषक किडी केव्हा जास्त हल्ला कऱणार आहेत हे वेळीच कळुन आपण त्यासोबत जीवाणूनाशक गुणधर्म असलेले एखादे प्रतिबंधकात्मक बुरशीनाशक देखिल वापरु शकतो.
हवामान आधारित रोग व किडिंचे अलर्ट येत असतांना देखिल जर त्या प्रकारची लक्षणे जर पिकावर दिसत नसतिल तर आपण केलेल्या उपाययोजना ह्या योग्य आहेत हे तर स्पष्ट होते. आणि त्या तशा नोंद करुन ठेवल्या तर पुढिल वर्षी देखिल त्याबाबत आपण माहीती मिळवु शकतो.
सॅटेलाईट आधारित सेवा ही आकाशातुन शेताचा फोटो बघण्यासारखे आहे. यात सॅटेलाईट, मायक्रोव्हेव यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करुन शेताची इनफ्रारेड सारखी ईमेज मिळवली जाते. शेतातील नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय कर्ब आणि पीएच बाबत मातीचा परिक्षण अहवाल मिळतो. शेतात कोणत्या भागात नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रिय कर्ब, पीएच कमी अथवा जास्त आहे ईतकी बारिक माहीती याच्या आधारे मिळते. तसेच ठराविक दिवसांतुन शेताच्या कोणत्या भागात किती पाणी साचुन राहते आहे, किंवा मातीत किती पाणी आहे हे कळते. ज्या भागात जास्त काळ पाणी साचुन राहते किंवा मातीतील पाण्याची पातळी जास्त राहते अशा भागाकडे शेतात फेरफटका मारत असतांना जास्त लक्ष देता येवुन तेथुन किड व रोगांचा प्रादुर्भाव सुरु होतो का, किंवा तेथिल रोपांना काही विशेष समस्या आहे का हे कळु शकते.
बदलते वातावरण आणि मार्केट मधुन असलेला दबाव लक्षात घेता, येणा-या काळात किड व रोगांच्या लक्षणांच्या बाबतीतच केवळ माहीती असुन चालणार नाही अशी एकंदर परिस्थिती आहे. किड व रोग नियंत्रणात खत व्यवस्थापन, वातावरण आणि अपारंपारिक बुरशीनाशके, किटकनाशके यांचा समावेश करुन घेणे गरजेचे ठरणार आहे. प्रतिबंधकात्मक उपाययोजना या योग्य वेळेत होण्यासाठी हवामान आधारित सेवा एग्रीप्लाझा कडुन मोफत उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ सर्व शेतकरी बांधव घेवु शकतात. या सेवेचा लाभ घेत असतांना पिक म्हणजेच होस्ट, हवामान आणि किड किंवा रोगाचा ईनॉक्युलम असेल तरच किड किंवा रोगाची लागण होवु शकते. यापैकी एक जरी नसेल तर किड, किंवा रोगाचा प्रादुर्भाव होवु शकत नाही. त्यामुळे हवामान आधारित सेवा वापरत असतांना किंवा सॅटेलाईट आधारित सेवा वापरत असतांना पिकावरिल लक्षणे, आधीचे पिक, सध्याचे पिक यापुर्वी केव्हा घेतले होते, तसेच आसपासच्या शेतातील परिस्थिती यांचा देखिल विचार करणे गरजेचे ठरते.
प्रिसिजन फार्मिंग करत असतांना, शेती शी निगडित जास्तीत जास्त पैलुंचा उलगडा होत जातो, आणि आपण नेमलेले गुप्तहेर एक एक माहीती आपल्या समोर ठेवत जातात.
छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि मराठी अस्मिता हा शब्द आपण बोलु शकतो तो स्वाभिमान मिळवुन दिला त्या बद्दल नतमस्तक होवुन त्रिवार वंदन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातुन काही गोष्टी या लेख मालेत निवडल्या, ज्यांचा उद्देश केवळ हा विषय समजण्यास सोपा व्हावा यासाठी आहे. या लेखा व्दारा कोणत्याही उत्पादनाची अथवा सेवेची जाहीरात केली जात नाही. शेतकरी बांधवांना शेती करण्यात यापैकी ज्या सेवेची गरज असेल ते तशी सेवा त्यांच्या आवडीच्या संस्थेकडुन घेवु शकतात. धन्यवाद.
Welcome to Agriplaza. India's first and only comprehensive digital platform dedicated to agriculture and farmers. Explore widest range of related data our figures speaks a lot.
Visitors
Diseases
Pests