logo

कोळी किटक (Mites)

ज्या जमिनीत शेणखत किंवा कुजणारे पदार्थ मुळे त्यांच्या कुजण्याच्या प्रक्रियेत कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो अशा शेतातील अगदी १ मीटर खोलीवरील वायर वर्म देखिल त्या कार्बन डाय ऑक्साईड च्या आकर्षणामुळे जमिनीच्या वरिल थरात येतात.

किडीचे प्रौढ जरी पिकांस हानीकारक नसले तरी त्यांची उपस्थीति ही शेतात वायर वर्म ची समस्या वाढवेल हे दर्शविण्यास पुरेसी ठरते. प्रौढ हे काळसर रंगाचे असतात. अळी अवस्था हि 1 ते 6 वर्षाची असु शकते त्यानंतर प्रौढ तयार होतात. अंडी हि जमिनीत दिली जातात. अळी पिकाच्या मुळांवर तसेच खोडावर जगते. आले, बटाटा, गहु, मका पिकांवर हि किड दिसुन येते.

हि किड जमिनीत जर ईतर ठिकाणाहुन अन्न मिळाले तर कदाचित पिकांर येणार पण नाही, हे मात्र नक्की कि एकदा किड जमिनीत स्थिरावली तर ती पुर्ण पणे नियंत्रणात कधीच येत नाही. किडीला खायला काही नसले तर ती जमिनीत १ मीटर खोली पर्यंत जावुन तेथे केवळ ह्युमस वर जगु शकते आणि जेव्हा केव्हा पिकाच्या मुळांतुन किंवा कुजणा-या पदार्थातुन कार्बन डाय ऑक्साईड चा गंध येईल तेव्हा पिकावर हल्ला करेल. शेतात वायर वर्म आहे किंवा नाही हे जाणुन घेण्यासाठी शेतात लागवडपुर्वीची मशागत करण्याच्या पुर्वी १ ते १.५ कप गव्हाचे पिठ घ्या त्यात दोन चमचे मध टाका आणि पाणी थोडे थोडे टाकुन त्याचे कणिक बनवा. असे मध्यम आकाराचे बॉल्स ज्यातुन कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो ते शेतात किमान २० ठिकाणी ४ ते ५ इंच खोलीवर टाका, जमिनीतील वायर वर्म वर येतिल त्यावरुन जमिनीत लागवडी पुर्वीच वायरवर्म आहेत कि नाही ते कळते.

किडीच्या नियंत्रणासाठी काही शिफारस केलेली किटकनाशके –बायफेनथ्रीन (इम्पेरियल, टालस्टार,अथेना, मार्कर), क्लोरोपायरिफॉस, सायफ्लुथ्रीन, थोडक्यात सर्व पायरेथ्राईडस, इमिडीक्लोप्रीड, थायमेथॉक्झाम चा वापर केला जावु शकतो. मात्र यातुन फार चांगले असे नियंत्रण मिळत नाही.

Wire Worm
Wire Worm Adult (Img source: Pioneer)