logo

मातीच्या कणांचा आकार व मातीतील त्यांचे प्रमाण

माती जरी आपणास डोळ्यांनी एकसमान अशी दिसत असली, किंवा त्यात आपणास कमी अधिक प्रमाणात जाड, बारीक कण, वाळु, खडे असे दिसत असले तरी, मातीचे वर्गिकरण करित असतांना त्याचे मात्र तिन प्रकारात केले जाते.

स्लिट

म्हणजे मातीचे असे कण जे आकाराने ०.०५ ते ०.००२ मिमी असतात.

सॅण्ड

म्हणजे मातीचे असे कण जे आकाराने ०.१ ते २ मिमी असतात.

क्ले

म्हणजे मातीचे असे कण जे आकाराने ०.००२ मिमी पेक्षा कमी असतात.

मातीचे वर्गिकरण तिच्यातील मातीच्या कणांच्या आकारनुसार, क्ले सॉईल, स्लिट सॉईल, आणि सॅण्ड सॉईल असे केले जाते. यांस आपण मातीचा पोत (Texture) संबोधततो. मातीतील या प्रत्येक कणांच्या प्रमाणानुसार मातीचे प्रकार पडतात. या प्रत्येक कणांचे स्वतःचे काही गुणधर्म आहेत, आणी मातीतील त्यांच्या प्रमाणानुसार ते त्यांच्या गुणधर्मांनुसार मातीचे मुलभुत भौतिक गुणधर्म ठरवत असतात.

गुणधर्म

सॅण्ड

स्लिट

क्ले

पाणी धरुन ठेवण्याची क्षमता

कमी

मध्यम ते जास्त

जास्त

हवेशीर पणा

चांगला

मध्यम

कमी

सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण

कमी

मध्यम ते जास्त

जास्त ते मध्यम

पाणी मुरण्याचा वेग

जास्त

हळु ते मध्यम

अत्यंत सावकाश

हिवाळ्यात गरम होण्याचा वेग

जास्त

मध्यम

सावकाश

सेंद्रिय पदार्थ कुजण्याचा वेग

जास्त

मध्यम

सावकाश

कडक होण्याचा गुणधर्म

कमी

मध्यम

जास्त

वा-याच्या वेगाने माती वाहुन जाणे

जास्त जर बारीक कण असतिल

जास्त

कमी

पाण्याने माती वाहुन जाणे

जास्त जर बारीक कण असतिल

जास्त

कमी (कण एकमेकांस घट्ट चिकटलेले असतिल तर)

आकुंचन व प्रसरण पावणे

अत्यंत कमी

कमी

मध्यम ते जास्त

पावसानंतर मशागतीस योग्यता

उत्तम

मध्यम

वाईट

हानीकारक क्षार वाहुन जाणे

वेगात

मध्यम

सावकाश (तडे गेले असतिल तर वेगात)

अन्नद्रव्ये साठवुन ठेवणे

कमी

मध्यम ते जास्त

जास्त

सामु बदलास प्रतिकार

कमी

मध्यम

जास्त

या कणांचे प्रत्येक मातीतील प्रमाण हे कमी अधिक असते.

Soil textural group

Soil textural class

Feel

Coarse to very coarse (more than 70 percent sand)

Sand, loamy sand

Feels gritty, does not ribbon or leave smear on hand.

Moderately coarse

Sandy loam

Feels gritty, leaves smear on hand, does not ribbon, breaks into small pieces.

Medium

Silt, loam, silt loam

Feels smooth and flourlike, does not ribbon, breaks into pieces about 1/2 inch long or less.

Moderately fine

Sandy clay loam, clay loam, silty clay loam

Forms ribbon that breaks into pieces about 3/4 inch long, sandy clay loam will feel gritty.

Fine (more than 40 percent clay)

Sandy clay, silty clay, clay

Forms long, pliable ribbon more than 2 inches long; sandy clay will feel gritty.

आपणास हि माहीती या परिच्छेदापर्यंत अजिबात नविन नाही. कारण आपण सर्वच जण मातीचे, सुपिक, नापिक, पाणी धरुन ठेवणारी, पाणी न धरुन ठेवणारी, जाड, बारीक असे वर्णन करतच असतो. याठिकाणी केवळ यांचे आपण शास्रिय नाव शिकुन उगाचच डोक्यात एक वेगळा गोंधळ माजवलेला आहे, असेच कदाचित आपणास वाटत असेल. पण तसे नाही. कारण मातीचा हा प्रत्येक कण आपली समस्या वाढवणे किंवा कमी करणे यात हातभार लावत असतो किंवा किंबहुना असे म्हणणे गैर होणार नाही कि, त्यामुळेच मातीच्या उत्पादकतेवर अथवा समस्येत आणि त्या समस्येच्या उपाययोजनेत फार मोठा बदल होत असतो.

आपण मातीच्या कणांचे प्रकार बघितलेत आणि एका तक्त्यात त्यांचे गुणधर्म देखिल बघितले. आता आपण एक प्रयोग करुया आणि आपल्या शेतातील मातीत या कणांचे प्रमाण किती ते शोधुन काढुया.

1 लि. मापाची काचेची बरणी जीला घट्ट झाकण लावता येईल आणि जीचे तोंड ब-यापैकि मोठे असेल अशी बरणी घ्या.

शेतातील पिकाच्या मुळांच्या परिसरातील, जे पिक लागवड केलेले असेल किंवा लागवड केले जाणार असेल त्या पिकाची मुळे किती खोल वर जातात तितक्या खोली वरिल माती उकरुन काढा, मातीच्या प्रत्येक थरातुन त्यात माती एकत्र केली गेली पाहीजे. तसेच ज्या ठिकाणी पिक नाही, अशा भागातील माती देखिल अशाच पध्दतीने घ्या. उकरत असतांना मातीच्या प्रत्येक थरातील माती कमी अधिक प्रमाणात एकसमान यायला हवी.

अशी साधारणतः अर्धी बरणी भरेल अशा अंदाजाने माती घ्या, त्या मातीतील मोठे खडे, शेणखताचे तुकडे वै काढुन टाका.

ही माती ओली असेल तर ती सावलीत वाळवुन घ्या.

नंतर तिला जास्त शक्ती प्रयोग न करता थोडी एकसामान अशी बारिक करा.

Soil Texture and Classification

नंतर हि माती बरणीत अर्ध्या उंची पर्यंत भरा.

त्यानंतर त्या बरिणीत बरणी पुर्ण भरण्यास थोडी जागा शिल्लक राहील ईतकी पाण्याने भरा.

बरिणास झाकण घट्ट लावुन, ती बरणी ५-१० मिनीट जोराने हलवा. जर पाण्याने मातीचा गोळा झाला असेल तर त्यात डिश वॉश लिक्विड किंवा लिक्विड हॅण्ड व़ॉश चे दोन थेंब टाकुन जोराने हलवा.

असे हलवल्या नंतर पुर्ण पाणी गढुळ होते का ते बघा. असे पाणी गढुळ झाल्यानंतर ती बरणी एका ठिकाणी ठेवुन द्या. त्या बरणीस पुन्हा हलवु नका.

बरणी ठेवल्यानंतर १ मिनीटांनी बरणीतील सॅण्ड च्या थराची उंची मोजा. हे करित असतांना बरणी अजिबात हलवु नका.

आणि २ तासांनी त्यातील स्लिट ची उंची मोजा. स्लिट म्हणजे सॅण्ड पेक्षा थोडे बारिक कण असतात.

बरणी अशा प्रकारे ठेवल्या नंतर तिला २-३ दिवस तशीच ठेवा. जर मातीत क्ले चे प्रमाण जास्त असेल तर आपणास कदाचित १-२ आठवडे देखिल लागतील.

बरणी अशा प्रकारे स्थिर ठेवल्यानंतर त्यातील गढुळपणा जाईल, आणि पाण्याचा वरिल थर पुर्णपणे स्वच्छ असा दिसेल आणि त्याच्या खालि क्ले, स्लिट व सॅण्ड या क्रमाने मातीचे कण दिसतील.

आता या क्ले च्या थराची उंची मोजा. व मातीच्या एकुण थराची उंची मोजा.

समजा सॅण्ड चा थर हा ३ सें.मी. आहे, स्लिट चा थर हा ४ सें.मी. आहे आणि क्लेचा थर हा ३ सें.मी. इतका आहे. आणि मातीच्या या सर्व थरांची उंची हि १० सें.मी. इतकी आहे.

तर या माती मध्ये सॅण्ड ची टक्केवारी ही ३० टक्के, स्लिट ची ४० टक्के आणि क्ले ची ३० टक्के इतकी आहे असे होते.

मातीच्या कोणत्याही एका कणाचे प्रमाण जर मातीत इतर कणांच्या तुलनेत सर्वाधिक असेल, तर ते शेतीसाठी हानीकारक ठरते.

समजा क्ले चे प्रमाण हे ७०-९० टक्के आहे, तर त्या जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची शक्ती ही खुप जास्त असेल ज्यामुळे ती मशागतीसाठी आणि मुळांच्या वाढीसाठी देखिल योग्य नसेल, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जरी जास्त असले तरी पिकांस उपबल्ध होतील अशा स्वरुपात अन्नद्रव्ये कमी असतील कारण ती क्ले कणांनी धरुन ठेवलेली असतिल. अशा प्रकारच्या मातीत सामु बदलणे, हानीकारक क्षारांचे प्रमाण कमी करणे, या क्रिया देखिल फार मंद गतिने होतील.

या ऊलट जर तिच्यात सॅण्ड चे प्रमाण हे सर्वाधिक असेल तर ती शेतीसाठी कोणत्याच अंगाने योग्य ठरत नाही.

अतिरेक कशाचाही असो तो जास्तच ठरतो. ज्या जमिनीतील माती या तिनही कणांच्या योग्य मिश्रणाने बनलेली असते तिच्यात सुपिकता आणि उत्पादकता हे दोन्ही असतात.

सोबत जो चार्ट दिलेला आहे त्यानुसार वरिल प्रयोगात जी टक्केवारी आली त्यानुसार माती कोणत्या वर्गीतील आहे हे कळेल,

फिल्ड कॅपेसिटी – शेतात पाणी दिल्यानंतर, गुर्त्वाकर्षणाच्या शक्तीने खोलवर पाणी वाहुन गेल्यानंतर मातीच्या कणांतील मोकळ्या जागेत पाणी साचुन राहते त्यात फिल्ड कॅपेसिटी म्हणतात. हे पाणी पिकांस तोवर उपलब्ध असते जोवर मातीच्या अति सुक्ष्म कणांच्या दरम्यान जी जागा शिल्लक राहते तिच्यात केवळ पाणी असते. अशा अवस्थेस विल्टिंग पॉईंट म्हणतात, यानंतर जर पिकांस पाणी दिले नाही तर पिक सुकुन जाते. या दोन्ही अवस्थांच्या दरम्यान चे पाणी हे पिकास उपलब्ध पाणी असते. खालिल तक्त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत पाणी किती प्रमाणात पिकांस उपलब्ध होईल ते दिलेले आहे. यात जमिनीतल सेंद्रिय पदार्थ, तेथे लागवड केलेले पिक, गवत वै. यानुसार बदल होतो. ज्या जमिनीची फिल्ट कॅपेसिटी जास्त असते ती साहजीकच जास्त प्रमाणात पाणी धरुन ठेवते, आणि पिकांस जास्त काळ पाणी उपलब्ध करुन देत असते. खालिल तक्त्यासोबत प्रत्येक जमिन किती वेगात (Infiltration rate) पाणी मुरवते याची माहीती जोडल्यास आपणास विविध पिकांसाठी किती आणि केव्हा पाणी द्यावे याचा अंदाज बांधण्यास सोपा जाईल. विशेष करुन अशी पिके ज्यांस बहार येण्यासाठी ताण द्यावा लागतो किंवा अशी पिके ज्यांस विशिष्ट अवस्थेत पाणी न मिळाल्यास उत्पादनावर विपरित परिणाम होवु शकतो.

मातीचा प्रकार

फिल्ड कॅपेसिटी

विल्टिंग पॉईंट

उपलब्ध पाणी

उपलब्ध पाण्याची टक्केवारी

सॅण्ड

0.6 mm/cm

0.2 mm/cm

0.4 mm/cm

66.67%

फाईन सॅण्ड

1.0 mm/cm

0.4 mm/cm

0.6 mm/cm

60.00%

लुमी सॅण्ड

1.4 mm/cm

0.6 mm/cm

0.8 mm/cm

57.14%

सॅण्डी लुम

2.0 mm/cm

0.8 mm/cm

1.2 mm/cm

60.00%

लाईट सॅण्डी क्ले लुम

2.3 mm/cm

1.0 mm/cm

1.3 mm/cm

56.52%

लुम

2.7 mm/cm

1.2 mm/cm

1.5 mm/cm

55.56%

सॅण्डी क्ले लुम

2.8 mm/cm

1.3 mm/cm

1.5 mm/cm

53.57%

क्ले लुम

3.2 mm/cm

1.4 mm/cm

1.8 mm/cm

56.25%

क्ले

4.0 mm/cm

2.5 mm/cm

1.5 mm/cm

37.50%

Source: Australia Department of Agriculture Bulletin 462, 1960

 

वरिल तक्त्यात दिसुन येते की ज्या जमिनीत क्ले चे प्रमाण ७० टक्के पेक्षा जास्त आहे, त्या जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची भरपुर क्षमता असुन देखिल ती माती पिकांस उपलब्ध होईल असे पाणी देण्यात ईतर प्रकारच्या मातींपेक्षा कमी सक्षम ठरते. क्ले मधे पाणी हे मातीच्या सुक्ष्म कणांव्दारा अत्यंत घट्ट स्वरुपात धरुन ठेवलेले असते ज्यामुळे ते पिकास उपलब्ध होत नाही. अशा प्रकारच्या मातील पिकापेक्षा जमिनीलाच जास्त पाणी द्यावे लागते. मातीत पाणी किती वेगाने मुरते, किंवा आत शिरते – एका तासात पाणी जमिनीत कीती खोलवर जाऊ शकते. यामधे जमिनातील सेंद्रिय पदार्थ, पिक, गवत, आच्छादन यानुसार बदल संभवतो.

मातीचा प्रकार

पाणी मुरण्याचा वेग

२ लि. क्षमतेचे ड्रिप व्दारे १८ इंच पाणी देण्यासाठी जास्तीत जास्त तास किती लागतिल?

सॅण्ड

१.५ पेक्षा जास्त इंच प्रती तास

9 तास

सॅण्डी लुम

१ – १.५ इंच प्रती तास

12 तास

लुम

०.५ ते १.० इंच प्रती तास

18 तास

क्ले लुम

०.२५ ते ०.५ इंच प्रती तास

36 तास

क्ले

०.०५ ते ०.२५ इंच प्रती तास

72 तास

वरिल माहीतीच्या आधारे हे लक्षात येते की, मातीच्या प्रकारानुसार त्यास किती तास पाणी दिल्यानंतर ते कीती खोलवर जाणार आहे.

पिकाच्या अशा महत्वाच्या अवस्था ज्यात पाणी कमी पडल्यास उत्पादनात कमालीची घट येईल, त्याची माहीती पुढे दिलेली आहे.

पिकाचे नाव

महत्वाची अवस्था

ब्रोकोली

पुर्न लागवड, फुलकळी अवस्था

गाजर

मुळांची वाढ

काकडी

परगीभवन, फळाचा आकार वाढणे

खरबुज

परगीभवन, फळाचा आकार वाढणे

वटाणे

शेंगा भरणे

बटाटा

कंद पोसणे

मधुमका

तुरा येणे व कणिस पोसणे

कलिंगड

परगीभवन, फळाचा आकार वाढणे

ढोबळी मिरची

फळ पक्वता

गहु

मुळे फुटणे, फुटवे येणे, फुलोरा, दुधाळ अवस्था

ऊस

उगवण, फुटवे येणे, लांबी वाढणे

ज्वारी

फुलोरा, दाणे भरतांना

सुर्यफुल

लागवडी पुर्वी, फुलोरा, बीज तयार होतांना

डाळींब

फळाचा आकार वाढत असतांना.

कोबी

पुर्नलागवड, गड्डा तयार होणे

फुलकोबी

पुर्नलागवड, फुल तयार होणे

वांगी

पुर्नलागवड, फुलोरा, फळ तयार होणे

कांदा

पुर्नलागवड, कंद तयार होणे

मिरची

फळ तयार होणे

पालक

पिकाच्या सर्व अवस्था

टोमॅटो

पुर्नलागवड, फुलोरा, फळ पक्वता

स्ट्रॉबेरी

लागवड, रनर वाढतांना, फुलोरा व फळ पक्वता.

भात

फुटवे येणे, फुलोरा, दुधाळ अवस्था

कडधान्ये

फुलोरा, शेंगा भरतांना

मका

तुरे येणे, कणिस भरतांना

कापुस

फांद्या येतांना, फुलोरा, बोंड पोसतांना.

केळी

शाकिय वाढ, फुलोरा येतांना, घड पोसतांना