Papaipema nebris
Papaipema nebris
Papaipema nebris
टोमॅटो व इतर पिकांवरिल खोड पोखरणारी अळी असे आपण म्हणु शकतो. हि अळी शक्यतो शेतात वाढलेल्या गवतांवर, ओढा-नदी-पाणवठाच्या जवळ गवताच्या पानांवर अंडी देते. अळी अंड्यातुन बाहेर आल्यानंतर खोडात प्रवेश करुन खोड आतुन पोखरते. खोडाच्या जमिनीलगत असलेल्या भागाजवळ सहसा अळी आत जाण्यासाठी खोडांत जे छिद्र करते ते दिसुन येते.
सहसा अळी एकाच खोडात राहते, मात्र तिचा आकार वाढल्यानंतर खोडातुन बाहेर येवुन नविन मोठ्या आकाराच्या खोडात देखिल जाते. या किडीची जीवन अवस्था हि ५ ते ६ महिन्यांची असते.
खोडावर एकदा अळीने हल्ला केल्यानंतर खोड वाचवणे सोपे राहत नाही. शेतात गवताची जास्त वाढ होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.