Soybean

Aphids

Aphis spp.
Aphis spp.

Aphids

Aphis spp.
Aphis spp.

Aphids

Aphis spp.
Aphis spp.

Aphids

Aphis spp.
Aphis spp.

Aphids

Aphis spp.
Aphis spp.

Aphids

Aphis spp.
Aphis spp.

Aphids

Aphis spp.
Aphis spp.

Aphids

Aphis spp.
Aphis spp.

Aphids

Aphis spp.
Aphis spp.

Aphids

Aphis spp.
Aphis spp.

Aphids

मावा किड हि जवळपास सर्वच पिकांवर दिसुन येते. लैंगिक आणि अलैंगिक अशा दोन्ही प्रकारे पुर्नुत्पादन करण्याची क्षमता या किडीत असते. उबदार वातावरणात मादी किड अलैंगिक पध्दतीने दिवसाला जवळपास १२ पिल्लांना जन्म देते. मावा किड चार अवस्थांतुन जाते, आणि या प्रत्येक अवस्थेतुन पुढील अवस्थेत जाण्यापुर्वी कात टाकते. या किडीत सुप्त अशी कोषावस्था नसते. पिल्लु ते प्रौढ अशी अवस्था ५ ते ८ दिवसांत पुर्ण होते. काही जाती या अंडी देखिल देतात. पार्थिनोजेनेसिस (अलैंगिक)पध्दतीने जन्मलेली मादी २० दिवस पर्यंत जगु शकते, मादीने जन्म दिलेली पिल्ले १० डि.से. तापमानात २० दिवसांत प्रौढ होते, तर ३० डि.से. तापमानात ४ दिवसांत प्रौढ होते. मादी जीवन क्रमात ८५ पिल्लांना जन्म देते.

उबदार आणि काहीशा उष्ण वातावरणात मावा किड पंख असलेले प्रौढ अवस्थेत जाते, तर थंड वातावरणात प्रौढ हे पंख नसलेले असतात.

मावा किड पिकातील रस शोषण करते. हा रस शोषत असतांनाच हि किड मधासारखा गोड द्रव देखिल स्रवत असते. या चिकट द्रवावर सुटी मोल्ड ही बुरशी देखिल वाढते ज्यामुळे पान काळसर दिसते.

मावा किड  - यलो व्हायरस, लिफ कर्ल व्हायरस, अल्फा मोझॅक व्हायरस, बिन मोझॅक व्हायरस, कार्नेशन मोटल व्हायरस, चाईनिज याम नेक्रॉटिक मोझॅक व्हायरस, सिट्रस ट्रिस्टेझा व्हायरस, सिट्रस वुली गॉल व्हायरस, चवळी वरिल मोझॅक व्हायरस, कंकुबर मोझॅक व्हायरस, गार्लिक मोझॅक व्हायरस, ईन्फेक्शियस क्लोरोसिस ऑफ बनाना, लिफ क्रिंकल ऑफ सलफ्लॉवर, लिलि सिप्टंमलेस व्हायरस, मस्कमेलॉन यलो स्टंट व्हायरस, औनियन यलो डार्फ व्हायरस, पपया रिंग स्पॉट व्हायरस, पेपर व्हेनियल मोटल व्हायरस, पोटॅटो लिफ रोल व्हायरस, शुगरकेन मोझॅक व्हायरस, वॉटर मेलॉन मोझॅक १ आणि २, याम मोझॅक व्हायरस, सनफ्लॉवर यलो ब्लॉच व्हायरस, यलो व्हेन मोझॅक व्हायरस, झुकीनी यलो व्हायरस, कॉटन अन्थोसायनोसिस व्हायरस, कॉटन कर्लीनेस व्हायरस, कॉटन ब्लु डिसीस, कॉटन लिफ रोल आणि पर्पल विल्ट, या सारखे व्हायरस देखिल पसरतात. सोयाबीन पिकावरिल मावा किड ही, सोयाबीन वरिल अल्फा मोझॅक व्हायरस,सोयाबीन मोझॅक व्हायरस,सोयाबीन डार्फ व्हायरस या व्हायरस चा प्रसार देखिल करते..

 ककुंबर मोझॅक व्हायरस ग्रहण करण्यासाठी मावा किडीस ५ ते १० सेकंद लागतात, तर व्हायरस संक्रमित करण्यास १ मिनीट लागतो, २ मिनीट कालावधी नंतर व्हायरस संक्रमित करण्याची क्षमता कमी होते, आणि २ तासंनी ती नाहीशी होते.

मावा किड हि शाश्वत (Persistent)- पुर्नउत्पादक (प्रोपोगेटिव्ह)  किंवा अशाश्वत (Non-Persistent) या पैकि केवळ एकाच पद्धतीने व्हायरस चा प्रसार करु शकते. शाश्वत पद्धतीमध्ये मावा किडीचे केवळ काही वेळ रस शोषण करणे व्हायरसच्या प्रसारास पुरेसे ठरते. मात्र अशाश्वत पद्धतीमध्ये मावा किडीस पानावर जास्त काळ घालवावा लागतो. अशाश्वत पद्धतीत मावा किडीस एका पानावर प्रादुर्भाव केल्यानंतर पुन्हा प्रादुर्भाव करण्यासाठी चार्ज घ्यावा लागतो (स्टायलेट भागात पुन्हा व्हायरस येण्यासाठी), तर शाश्वत पद्धतीत मावा किडीमध्येच व्हायरस वाढत असल्याने किडीस जास्तीत जास्त काळ प्रादुर्भाव करणे शक्य होते.

वॉटर मेलॉन १ आणि २, तसेच झुकीनी यलो मोझॅक व्हायरस, पपया रिंग स्पॉट व्हायरस, सेलेरी मोझॅक व्हायरस हे नॉन परसिसटंट पध्दतीने संक्रिमीत केली जातात. कॉटन अन्थोसायनोसिस व्हायरस, कॉटन कर्लीनेस व्हायरस, कॉटन ब्लु डिसीस, कॉटन लिफ रोल आणि पर्पल विल्ट हे व्हायरस परसिसटंट पध्दतीने संक्रमित केले जातात.

 मावा किड काहि मिनीटातच व्हायरस चे संक्रमण करते, तर किटकनाशकांस मावा किड मारण्यास काही तास लागतात त्यामुळे व्हायरस चे संक्रमण थांबवणे कठिण जाते.

उबदार, दमट वातावरणात किडीची वाढ जोमात होते.

Blog

Explore Our Blog