Jassids
शेती क्षेत्रातील सर्वाधिक रंगबीरंगी किड म्हणजे जसिडस किंवा तुडतुडे किंवा लिफ हॉपर्स. आंब्या वरिल विशालकाय आकारापासुन तर कापुस पिकातील लहान आकारपर्यंत हि किड असते.
बुध्दीबळातल्या उंटासारखी तिरपी तिरपी चाल हि ह्या किडीची खासियत.
खुपसणे आणि रस शोषण करणे ह्या दोन्ही क्रिया हि किड करते, ज्यामुळे पिकातील रस शोषुन घेणे सहज शक्य होते.
अतिशय चपळ आणि उडता येत असल्याने हि किड निंयत्रणात आणणे जड जाते.
मादी पानांच्या पृष्ठभागात अर्धवट घुसवलेली अंडी देते. या अंड्यातुन बाहेर येणारी पिल्ले ४ ते ५ वेळेस कात टाकतात आणि २ ते ७ आठवड्यात प्रौढ बनतात. मादी १७ ते ३८ अंडी देते. या अंड्यातुन ८ ते १० दिवसांत पिल्ले बाहेर येतात. साधारणतः दर ३ ते ५ दिवसांनी ४ ते ५ वेळेस कात टाकल्यानंतर हि किड प्रौढ बनते.
या किडीच्या अनेक प्रजाती आहेत, अनेक नाव आहेत आणि प्रत्येक पिकानुसार त्यांचे स्वभाव, जीवनक्रम देखिल बदलतात. येणा-या काळात या किडीचे पिकानुसार माहीती घेणे गरजेचे ठरेल.
२९ डिग्री पेक्षा कमी तापमान आणि ७८ टक्क्यांपेक्षा जास्त आद्रता असल्यास निफ्म (थोडक्यात अळी) आणि प्रौढ नैसर्गिक रित्या मरण्याचे प्रमाण जास्त असते. जोराचा पाऊस झाल्यास देखिल किड मरते.