logo

पपई वरिल स्टेम रॉट किंवा फुट रॉट

पपई पिकात पिथियम अफॅनिर्माटम ह्या बुरशीमुळे, खोड सडणे हा रोग होतो.

रोगाच्या पहिल्या लक्षणात, जमिनीलगत असलेल्या खोड नरम पडते, त्यात जास्त ओसलर पणा येतो, तसेच खोडास तडे देखिल जातात. खोडाचा रोगग्रस्त भाग हा तपकिरी, काळसर दिसुन येतो.

रोपाच्या शेंड्या कडिल पाने खाली वाकता, पिवळी पडतात, आणि खाली देखिल गळुन पडू शकतात.

रोगाच्या पुढिल अवस्थेत पुर्ण रोप कलंडुन पडते.

रोगाची बुरशी मातीत असलेल्या पपई च्या अवशेषांवर जीवंत राहु शकते.

अनेक वेळेस नर्सरी मधे देखिल रोगाची लागण होवुन, डॅपिंग ऑफ सारखी लक्षणे दिसुन येतात.

रोग नियंत्रण –

रोप लागवडीनंतर ट्रायकोडर्मा, सुडोमोनास ह्या सारख्या जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा.

खोडा जवळ पाणी साचुन राहणार नाही ह्याची काळजी घ्यावी. पिकास गरजेपेक्षा जास्त पाणी देणे टाळावे.

रोगाची लागण सुरवातीस लक्षात आल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईड चा ड्रेचिंग च्या माध्यमातुन वापर करावा.