logo

पपई वरिल फायटोप्थोरा ब्लाईट /span>

पपईच्या रोपाच्या खोडावर हा रोग प्रामुख्याने दिसुन येतो. जमिनीलगत खोडावरिल भाग हलक्या रंगाच्या होतो, जसे संक्रमण वाढत जाते, तसे हि बुरशी संक्रमित भाग पुर्णपणे नष्ट करत जाते, ज्यामुळे त्या ठिकाणी खड्डा पडल्यासारखे किंवा हत्याराने इजा झाल्यासारखे भासते.

जमिनी लगतच्या खोडाच्या भागास इजा झाल्याने झाडास अन्नपुरवठा नियमित होत नाही, ज्यामुळे झाड मरुन जाते. फळ धारणा झालेले किंवा मोठे झाड कोलमडुन पडुन जाते. अशा झाडांना नविन सशक्त फुट देखिल येते, मात्र पावसाळ्याच्या वातावरणात मरुन जाते.

फळांवर देखिल हि बुरशी हल्ला करते. फळे आकुंचन पावतात, त्यांचा रंग गर्द तपकिरी हातो, अशी फळे तपकिरी काळी होतात.

बागेस पाणी देतांना, पाणी खोडास स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यावी.

रोगाच्या प्रतिबंधासाठी डायथेन एम ४५, झिनेब, मॅनेब, कॉपर हायड्रॉक्साईड, कॉपर ऑक्सिक्लोराईड ची फवारणी घ्यावी.

   फायटोप्थोरा ब्लाईट   

फायटोप्थोरा ब्लाईट
फायटोप्थोरा ब्लाईट
फायटोप्थोरा ब्लाईट
फायटोप्थोरा ब्लाईट
फायटोप्थोरा ब्लाईट
फायटोप्थोरा ब्लाईट