पानांच्या खालील बाजुस बारीक, अनियमित, गर्द हिरव्या रंगांच्या रेषा तयार होतात. अशा रेषा पानांवरिल शिरांना लागुन तयार होतात. नविन पाने लहान तयार होतात. पानांवर ठिकठीकाणी अर्धपारदर्शक असे तेलकट डाग दिसुन येतात. पाने पिवळी पडतात. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव राहील्यास पानगळ होते, केवळ शेंड्या कडे लहान पानांचा झुपका शिल्लक राहतो.
ोगग्रस्ता रोपांच्या खोडावर पिन पॉईंटच्या आकाराचे ठिपके पडतात. हे ठिपके रेषा किंवा मोठ्या ठिपक्यांत रुपांतरीत होतात. अशाच रेषा किंवा ठिपके पानांच्या देठावर दिसुन येतात. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास पानांचे देठ खालील बाजुस जमिनीच्या दिशेने वाकतात. लहान किंवा २ आठवड्यांच्या फळांवर रिंग स्पॉट तयार होतात.
पपई वरिल मोझॅक व्हायरस हा मावा किडी द्वारे होतो. मावा किड पानांवरिल रस शोषुन घेत असतांना पानांत व्हायरस सोडत असते. केवळ एक मावा किड देखिल रोगाचा प्रार्दुभाव करण्यास सक्षण असते. मावा किड हा रोग केवळ १० सेकंदाच्या काळात संक्रमित करत असते. पानांवर लक्षणे लागण झाल्यापासुन १८ ते २४ दिवसांत दिसतात.
पपई वर मोझॅक व्हायरस संक्रमीत करणारी मावा किड, काकडी, टरबुज (कलिंगड), व इतर वेलवर्गिय पिकांवर देखिल उपजीविका करत असते.
मावा किडीमुळे रोगाचा प्रसार होवु नये म्हणुन, पपई लागवड केलेल्या शेताच्या चारी बाजुस एक किंवा दोन रांगा मका, ज्वारी, यासारखी पिके लावावीत. ज्यावेळेस मावा किड प्रथम मका किंवा ज्वारी पिकावर उपजिविका करेल त्यावेळेस, त्यातील व्हायरस सदरिल पिकांत संक्रमित होवुन जाईल, यानंतर जरी मावा किडीने पपईच्या पानांवर उपजीविका केली तरी पपई पिकावर व्हायरस संक्रमित होण्याचे प्रमाण कमी होते, किंवा अजीबात राहत नाही.
प्रादुर्भाव ग्रस्त रोपांपासुन नविन रोपांस त्वरित लागण होते, त्यामुळे अशी रोपे नष्ट करावीत, किंवा सर्व पाने काढुन टाकावीत. पपईच्या शेताच्या जवळपास वेलवर्गिय पिकांची लागवड करु नये. मावा किड नियंत्रणात ठेवावी.